Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र

Bandhu Marathi Movie Upendra Limaye Jitendra Joshi: राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये आणि इफ्फी विजेते जितेंद्र जोशी पहिल्यांदाच ‘बंधू’ या मराठी चित्रपटातून एकत्र झळकणार असून, दोन भावांच्या अतूट नात्याची हृदयस्पर्शी कहाणी साकारताना दिसणार आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 27, 2026 | 09:20 PM
Bandhu Marathi Movie

Bandhu Marathi Movie

Follow Us
Follow Us:
  • राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू
  • उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र
  • २० नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित
 

राम प्राण, लक्ष्मण काया,
बंधुप्रेमाची अतूट छाया

प्रभू श्रीरामासाठी लक्ष्मण फक्त भाऊ नव्हे, तर विश्वासाचा, कर्तव्याचा आणि आयुष्यभराच्या साथीचा जणू आधार! भावा-भावामधलं नातं शब्दांत मांडता येत नाही… प्रत्येक भावाच्या नात्यात असतो असाच एक न बोलता जाणवणारा जिव्हाळा, संकटात खंबीरपणे पाठीशी उभं राहण्याची ताकद आणि सुख-दुःखात कायम सोबत राहण्याचं वचन. दोन भावांच्या अतूट बंधाची आणि नात्यांच्या कसोटीची हृदयस्पर्शी कहाणी घेऊन ‘बंधू’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी आणि विशेषतः भारतीय चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका वठविण्यात हातखंडा असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये आणि नामांकित इफ्फी विजेते जितेंद्र जोशी ‘बंधू’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र. आपल्या सहज, वास्तववादी आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही जोडी ‘बंधू’ मधून एका वेगळ्या आणि भावनिक नात्याची कहाणी मोठ्या पडद्यावर साकारताना दिसणार आहे.

निरागस हास्याने खुलली राखीपौर्णिमा; विशेष मुलांसोबत ‘सन मराठी’च्या कलाकारांनी साजरा केला प्रेमाचा सण

हिंदीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन पिढ्यांचा वारसा पुढे नेणारे अभिनेता रजत बेदी ‘बंधू’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीशी जोडले गेले आहेत. आगामी ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचे ते प्रस्तुतकर्ते आहेत. रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने ‘बंधू’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई, कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे.

‘आटपाडी नाईट्स’, ‘सरला एक कोटी’ सारख्या यशस्वी, मनोरंजक आणि आशयघन चित्रपटांबरोबरच भावनिक प्रसंगांची उत्कृष्ट मांडणी करण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी ‘बंधू’ चित्रपटाच्या लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्याचबरोबर जनमाणसात लोकप्रिय होऊ पाहणाऱ्या ‘बंधू’ च्या संगीताची आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी विजय नारायण गवंडे यांनी सांभाळली असुन त्यांच्या भावनिक, मधुर आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या सुश्राव्य गाण्यांची मेजवानी ‘बंधू’ चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार यात काही शंका नाही.

एका छोट्याशा गावात घडणारी ही गोष्ट पडद्यावर दोन भावांचं नातं उलगडताना कुठेतरी आपल्या घरातल्या, आपल्या भावाची आठवण करून देणारी ठरणार आहे. भावाच्या सुखासाठी स्वतःच्या वाट्याचे काटे दूर करणारा भाऊ, नात्यांमधला विश्वास, मनात दडलेला अहंकार आणि परिस्थितीसमोर उभी ठाकणारी भावनिक परीक्षा…या सगळ्यांचा वेध ‘बंधू’ घेणार आहे. नाती, भावना आणि संघर्षांची ही कहाणी पडद्यावरची न वाटता कुठेतरी आपल्या घरातलीच वाटते. प्रेम, संघर्ष, अहंकार, त्याग आणि भावनांची गुंतागुंत यांचा सुरेख मिलाफ असलेली ही कथा प्रेक्षकांना २० नोव्हेंबरपासून एका हृदयस्पर्शी आणि भावनिक प्रवासावर घेऊन जायला सज्ज होत आहे.

Rashmika-Vijay च्या ‘रणबाली’साठी आणखी प्रतीक्षा; 11 सप्टेंबरला नाही, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज

Web Title: Bandhu marathi movie upendra limaye jitendra joshi release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Entertainment News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
1

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
2

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?
3

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.