Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhootam Bhayam Movie : आता बहरणार प्रेमपुष्प! आली आली ‘सरोजिनी’, GenZ साठी स्पेशल लव्ह सॉंग

'भूतम भय्यम' चित्रपटातील 'सरोजिनी' हे नवं लव्ह सॉंग प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. करण सोनावणेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत "Romantic song for the GenZ" असे म्हणत गाण्याच्या रिलीजची माहिती दिली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 17, 2026 | 05:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • आता ‘सरोजिनी’ नावाचा लव्ह सॉंग प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे.
  • “भूतम् भयम्” २४ जुलै पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!”
  • नील साळेकर आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सोशल मीडियावर दबदबा असणारे कलाकार करण सोनावणे, नील सालेकर तसेच त्याच्या सवंगड्यांनी सिनेगृहात राज्य करण्याचा बेतही आखला आहे. त्यांचा आगामी सिनेमा ‘भूतम भयम’ 24 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित करता येणार आहे. परंतु, अशामध्ये त्यांचे आणखीन एक गाणे समोर आले आहे. या आधी पैशांचा रॅप त्यांनी लाँच केला होता. आता ‘सरोजिनी’ नावाचा लव्ह सॉंग प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे.

Bol Bol Rani Movie Review : ही गुंतागुंतं कधी सुटणार का? ‘बोल बोल राणी’ आज सिनेमागृहात! सईच्या अभिनयाने प्रेक्षक दंग

सिनेमाचा अभिनेता करण सोनावणेने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. सिनेमाचे गाणे लाँच झाले असल्याची बातमी त्याने पोस्ट शेअर करत दिली आहे. पोस्टखाली त्याने कॅप्शन देत नमूद केले आहे की “Romantic song for the GenZ from our film @bhootambhayyam is out now! नयन तिचे गोल गोल, नजर जाई खोल खोल… सरोजिनीच्या तालावर थिरकायला तयार आहात? गाणं आऊट झालंय! K2kMuzicOfficial च्या YouTube चॅनेल वर.” तसेच सिनेमाची माहिती देत त्याने लिहिले आहे की, “झी स्टुडिओज् आणि @kyrakumarkreations घेऊन येतायत हॉरर कॉमेडी विश्वातला गेमचेंजर मराठी सिनेमा “भूतम् भयम्” २४ जुलै पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!”

सरोजिनी गाण्याचे काम्पोजिशन श्रीनाथ म्हात्रे याने केले आहे. तसेच प्राजक्त देशमुखने या गाण्याचे बोल लिहले आहेत. गायक जसराज जयंत जोशीने हे गीत गायले आहे. तर चिन्मय सावंत, केतन चौधरी आणि वेदांत मोरे यांनी या गाण्याचे बॅकग्राउण्ड गायले आहे. सिनेमात छाया कदम, करण सोनवणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मनमीत पेम, प्रताप फड, किशोर चौघुले, सोबिता कुडतरकर, सुहिता थत्ते, निनाद लिमये हे कलाकार झळकणार आहेत.

The Odyssey Review: Christopher Nolanचा आणखी एक मास्टरपीस; वर्षातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव

‘भूतम भय्यम’ (किंवा ‘भुतान भय्यम’) हा मराठी कॉमेडी-हॉरर-थ्रिलर चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रामचंद्र गावंकर यांनी केले आहे. सात बेरोजगार मित्र एका ओसाड आणि शापित वाड्यात राहायला जातात. सहज पैसे कमावण्याच्या प्रयत्नात ते एका गूढ नाण्याचा वापर करतात आणि नकळत प्राचीन आत्म्यांना जागे करतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या थरारक आणि विनोदी घटनांवर चित्रपटाचे कथानक आधारित आहे. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या छाया कदम, करण सोनावणे (श्रीमन लिजेंड), नील साळेकर आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Bhootam bhayam movie new song sarojini out now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • hit movies
  • horror story
  • Indian Music

संबंधित बातम्या

धाडस असेल तरच एकट्याने पाहा! 8 एपिसोडची ही हॉरर सीरिज देईल अंगावर काटा आणणारा थरार
1

धाडस असेल तरच एकट्याने पाहा! 8 एपिसोडची ही हॉरर सीरिज देईल अंगावर काटा आणणारा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.