Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Big Boss 20 Contestants: ‘बिग बॉस 20’चा प्रीमियर 6 सप्टेंबरला होणार आहे. माही विज, अर्शिफा खान, ईशा रिखी, कनिका मानसह अनेक सेलिब्रिटींची नावं संभाव्य स्पर्धक म्हणून चर्चेत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 04, 2026 | 02:45 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Big Boss 20 Contestants: सलमान खानच्या बहुचर्चित ‘बिग बॉस 20’ या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 6 सप्टेंबरपासून या शोला सुरुवात होणार असून, यंदाच्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून घरात प्रवेश करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रीमियरपूर्वी अनेक सेलिब्रिटींची नावं चर्चेत आहेत.

चला जाणून घेऊया, कोणते चेहरे ‘बिग बॉस 20’मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

माही विज

‘बालिका वधू’ आणि ‘लागी तुझसे लगन’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री माही विज ‘बिग बॉस 20’मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. माहीला टेलिव्हिजन क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. तिचे पती जय भानुशाली ‘बिग बॉस 15’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.

अर्शिफा खान

सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री अर्शिफा खान हिचे नावही ‘बिग बॉस 20’साठी चर्चेत आहे. बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात करणाऱ्या अर्शिफाने ‘एक वीर की अरदास: वीरा’, ‘उत्तरन’, ‘जिनी और जुजू’ आणि ‘मेरी दुर्गा’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Raja Shivaji TV Premiere: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ आता टीव्हीवर येणार; हिंदी-मराठीत पाहता येणार चित्रपट

ईशा रिखी

पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी हिच्या नावाचीही शोसाठी चर्चा आहे. ‘जट्ट बॉईज पुत्त जट्टन दे’ या पंजाबी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय ती ‘हॅप्पी गो लकी’ आणि ‘अरदास’मध्येही दिसली आहे. मात्र, तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या दाव्यांना अधिकृत पुष्टी मिळालेली नसल्याने ते सध्या केवळ चर्चेपुरतेच मर्यादित आहेत.

रिया अहिर

‘बिग बॉस 20’साठी चर्चेत असलेलं आणखी एक नाव म्हणजे रिया अहिर. मॉडेल, इन्फ्लुएन्सर आणि नाट्यकलाकार म्हणून रिया ओळखली जाते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांची व्हॅन थांबवल्याच्या घटनेनंतर ती चर्चेत आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती अभिनय क्षेत्राशी जोडलेली आहे.

काझी तौकीर

गायक काझी तौकीर याचं नावही ‘बिग बॉस 20’च्या संभाव्य स्पर्धकांमध्ये आहे. 2005 मध्ये ‘फेम गुरुकुल’चा विजेता ठरल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. रूपरेखा बॅनर्जीसोबत त्याने हा शो जिंकला होता. गायकासोबतच काझीने अभिनय क्षेत्रातही काम केले आहे.

Mirzapur The Movie Review: मुन्ना भैयावर प्रेक्षक फिदा; ‘मिर्झापूर’मध्ये पुन्हा लुटली महफिल, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

कनिका मान

‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री कनिका मान हिचे नावही ‘बिग बॉस 20’साठी चर्चेत आहे. ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी झाल्यामुळेही ती चर्चेत राहिली आहे. ‘बढो बहू’मधून तिने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. याशिवाय ती काही पंजाबी चित्रपटांमध्येही दिसली आहे.

गुल्लू आणि लव गिल यांचीही चर्चा

माही विज, अर्शिफा खान, ईशा रिखी, रिया अहिर, काझी तौकीर आणि कनिका मान यांच्यासोबतच गुल्लू उर्फ कुशल तंवर आणि लव गिल यांची नावंही ‘बिग बॉस 20’साठी चर्चेत आहेत.

या सेलिब्रिटींच्या नावांचीही अफवा

प्रीमियरच्या आधी संभाव्य स्पर्धकांची आणखी एक मोठी यादी चर्चेत आहे. अभिनेत्री मौनी रॉय हिचं नावही या यादीत असल्याचं बोललं जात आहे. ‘नागिन’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेली मौनी शोमध्ये सहभागी झाल्यास ही एक मोठी स्टार एंट्री ठरू शकते.

याशिवाय अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती, अभिनेता फैसल खान आणि यूट्यूबर नितीश राजपूत यांचीही नावं संभाव्य स्पर्धक म्हणून चर्चेत आहेत.

दरम्यान, ‘बिग बॉस 20’च्या स्पर्धकांबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत ही नावं केवळ मीडिया रिपोर्ट्स आणि चर्चांपुरतीच आहेत. 6 सप्टेंबरच्या ग्रँड प्रीमियरनंतरच कोणते सेलिब्रिटी सलमान खानच्या शोमध्ये प्रत्यक्ष प्रवेश करणार, हे स्पष्ट होणार आहे.

Web Title: Big boss 20 contestants salman khan show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Entertainemnt News
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Sayani Gupta: ‘आसमानी’ कॉपीराइट वादात सयानी गुप्ताला मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात कोर्टाचा अंतरिम आदेश
1

Sayani Gupta: ‘आसमानी’ कॉपीराइट वादात सयानी गुप्ताला मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात कोर्टाचा अंतरिम आदेश

Raja Shivaji TV Premiere: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ आता टीव्हीवर येणार; हिंदी-मराठीत पाहता येणार चित्रपट
2

Raja Shivaji TV Premiere: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ आता टीव्हीवर येणार; हिंदी-मराठीत पाहता येणार चित्रपट

Mirzapur The Movie Review: मुन्ना भैयावर प्रेक्षक फिदा; ‘मिर्झापूर’मध्ये पुन्हा लुटली महफिल, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
3

Mirzapur The Movie Review: मुन्ना भैयावर प्रेक्षक फिदा; ‘मिर्झापूर’मध्ये पुन्हा लुटली महफिल, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

The Traitors 2 Winner: क्रिस्टल-रिदाने मारली बाजी, एका मास्टरस्ट्रोकने जिंकली इतक्या लाखांची रक्कम
4

The Traitors 2 Winner: क्रिस्टल-रिदाने मारली बाजी, एका मास्टरस्ट्रोकने जिंकली इतक्या लाखांची रक्कम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.