
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
यंदाच्या सीझनमध्ये टीव्ही कलाकार आणि सोशल मीडिया स्टार्ससोबतच भारतीय हिप-हॉप विश्वातील एका मराठमोळ्या रॅपरनेही ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केली आहे. हा रॅपर म्हणजे Yung DSA. ‘Yeda Yung’ या गाण्यामुळे चर्चेत आलेल्या Yung DSAच्या एन्ट्रीने पुणेकरांचंही लक्ष वेधून घेतलं आहे. पण नेमका कोण आहे हा रॅपर? जाणून घेऊया त्याची रंजक कहाणी.
Yung DSAचं मूळ नाव हर्ष विजय माचरे आहे. तो पुण्यातील येरवडा परिसरातील असून, आपल्या शहराशी आणि मुळांशी असलेलं नातं त्याच्या संगीतामधूनही प्रकर्षाने दिसून येतं. मराठी प्रभाव, ट्रॅप बीट्स आणि भारतीय संगीताच्या विविध शैलींचा संगम करत त्याने हिप-हॉपच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Yung DSAच्या गाण्यांमध्ये पुणे आणि तिथली स्थानिक संस्कृती यांचा प्रभाव अनेकदा जाणवतो. त्यामुळे त्याच्या संगीताला एक खास ‘देसी’ आणि स्थानिक बाज मिळते. भारतीय हिप-हॉपच्या स्वतंत्र विश्वात त्याची शैली वेगळी ठरते.
Yung DSAला मोठी प्रसिद्धी मिळवून देणारं गाणं म्हणजे ‘Yeda Yung’. Gully Gang Records अंतर्गत प्रदर्शित झालेलं हे गाणं २०२४ मध्ये रिलीज झालं होतं. मात्र २०२५ मध्ये या गाण्याने सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली आणि Yung DSA मोठ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचला.
पुण्याच्या मातीतून आलेल्या या रॅपरने आपल्या गाण्यातील खास शब्दरचना, देसी अंदाज आणि आधुनिक ट्रॅप बीट्सच्या माध्यमातून श्रोत्यांचं लक्ष वेधून घेतलं. ‘Yeda Yung’ हे त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या गाण्यांपैकी एक ठरलं.
वयाच्या १२व्या वर्षापासून रॅपिंग
Yung DSAचा संगीतप्रवासही तितकाच रंजक आहे. तो वयाच्या अवघ्या १२व्या वर्षापासून रॅपिंग करत असल्याचं सांगितलं जातं. मात्र सुरुवातीपासूनच त्याने संगीताला पूर्णवेळ करिअर म्हणून स्वीकारलं नव्हतं.
रॅपिंगसोबत त्याने काही काळ BPOमध्ये नोकरीदेखील केली. नोकरी आणि संगीताची आवड यांचा समतोल साधल्यानंतर त्याने अखेर पूर्णवेळ संगीत क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज तो भारतीय हिप-हॉप विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे.
आता ‘बिग बॉस’च्या घरात काय करणार Yung DSA?
संगीतविश्वात आपल्या देसी आणि मराठमोळ्या अंदाजाने ओळख निर्माण केल्यानंतर आता Yung DSA ‘बिग बॉस २०’च्या घरात आपला जलवा दाखवणार आहे. आतापर्यंत त्याची ओळख रॅपर म्हणून होती; मात्र बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना त्याचा वैयक्तिक स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि इतर स्पर्धकांसोबतचं नातं जवळून पाहायला मिळणार आहे.
पुण्याच्या येरवड्यातून सुरू झालेला त्याचा प्रवास आता ‘बिग बॉस’च्या घरापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या सीझनमध्ये Yung DSA किती धमाल करतो आणि त्याचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना किती भावतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Bigg Boss 20 Contestants: ‘बिग बॉस २०’च्या स्पर्धकांची यादी समोर; १८ चेहरे गाजवणार सलमान खानचा शो!