
Suraj Chavan New Born Baby: सूरज चव्हाणचं जंगी स्वागत, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
4 सप्टेंबर 2026 रोजी संजनाने एका गोड मुलीला जन्म दिला. योग बघा, त्या दिवशी कृष्णजन्माष्टमी होती. कृष्णाच्या जन्मदिवशीच घरी राधा आली, असं सगळे म्हणतायत. बाळाला आणि आईला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून बाळाला मामाच्या घरी नेण्यात आलं आहे. तिथे अगदी थाटात तिचं स्वागत झालं.
या गोड बातमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये संजना म्हणतेय, “घरी राधा आली आहे.” हे ऐकून सूरजच्या डोळ्यात पाणी आलं. तो खूप भावूक झाला. त्याने लगेच संजनाला मिठी मारली, तिच्या कपाळावर किस केलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तो क्षण बघून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. नवरा म्हणून आणि आता बाप म्हणून सूरजची ही बाजू लोकांना खूप आवडली.
नंतर धुळ्यात एका दहीहंडीच्या कार्यक्रमात सूरजने स्वतः ही बातमी सगळ्यांना सांगितली. तो म्हणाला, “त्या दिवशी कृष्णाचा वार होता, जन्माष्टमी होती. त्याच दिवशी माझ्या घरी लक्ष्मी आली, राधा आली. मला मुलगी झाली आहे. मी खूप खुश आहे. बाप झाल्यावर कळतं की या भावना शब्दात सांगता येत नाहीत. आता माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे.”
बाळाला घरी आणल्यानंतरचा पण एक व्हिडिओ आला आहे. संजनाच्या माहेरी म्हणजे मामाच्या घरी बाळाला नेण्यात आलं. तिथे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आलं. जमिनीवर फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या, त्या पायघड्यांवरून बाळाला घरात आणलं. घरात फुगे आणि छान सजावट केली होती. अगदी छोट्या राजकुमारीसारखं तिचं स्वागत झालं.
सूरज आणि संजनाचं लग्न डिसेंबर 2025 मध्ये पुण्यात मोठ्या थाटात झालं होतं. लग्नानंतर काही महिन्यांनीच संजना गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली. लोक फोटोंवरून अंदाज लावत होते. पण दोघांनी सुरुवातीला काहीच सांगितलं नाही.
नंतर संजनाने एक व्हिडिओ टाकला, त्यात फक्त आवाज होता आणि त्यातून तिने प्रेग्नेंसीची हिंट दिली. त्यानंतर त्यांची मैत्रीण जान्हवीने मार्चमधील चोरओटीचा व्हिडिओ शेअर केला आणि शिक्कामोर्तब केलं की संजना आई होणार आहे. जूनमध्ये सूरजने त्याच्या खास शैलीत ही बातमी सांगितली. तो म्हणाला होता, “तुमचा टॉपचा किंग बाबा होणार आहे, देणार धब्बा, टॉपचा किंग होणार पप्पा.” त्याचा हा डायलॉग खूपच गाजला होता.
त्यानंतर दोघे सतत रील्स टाकत होते. संजनाचे वेगवेगळ्या लूकमधले व्हिडिओ येत होते. पण गेल्या एक महिन्यापासून दोघांनी सोशल मीडियावर काहीच पोस्ट केलं नव्हतं. त्यामुळे लोकांना शंका येत होती. आणि मग अचानक हॉस्पिटलमधला बाळासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सगळ्यांना समजलं की घरी छोटी पाहुणी आली आहे.
Baahubali: ‘बाहुबली’ युनिव्हर्सचा ग्लोबल विस्तार; ड्रीम थिएटरसोबत मोठी पार्टनरशिप
सूरजच्या चाहत्यांसाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे. सोशल मीडियावर सगळे त्याचं अभिनंदन करतायत आणि छोट्या राधाला आशीर्वाद देतात.