Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?

Dharmendra Pradhan Resignation: देशभरात शिक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 25, 2026 | 06:09 PM
Dharmendra Pradhan Resignation (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Dharmendra Pradhan Resignation (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Reactions from celebrities following Dharmendra Pradhan Resignation: देशभरात शिक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने अखेर मोठे लक्ष वेधून घेतले. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीसह विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद झाला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. सामान्य नागरिकांसोबतच बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीही या घडामोडींवर आपली मतं व्यक्त केली.

कोण काय म्हणाले?

अभिनेत्री रिद्धी डोगर

अभिनेत्री रिद्धी डोगराने आपल्या पोस्टमधून लोकशाहीची ताकद अधोरेखित केली. तिच्या मते, कोणताही बदल एका दिवसात घडत नाही. नागरिक सतत जागरूक राहिले, प्रश्न विचारले आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाले तरच व्यवस्था अधिक मजबूत होते. आजचा दिवस तरुणांच्या आवाजाची ताकद दाखवणारा असल्याचेही तिने म्हटले. देश घडवण्याची खरी जबाबदारी युवकांवर असल्याचे सांगत तिने सकारात्मक सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले.

गायक अरमान मलिक

गायक अरमान मलिकनेही विद्यार्थ्यांच्या एकतेचे कौतुक केले. मोठा संदेश न देता त्याने काही शब्दांतच युवकांच्या सामर्थ्याचा उल्लेख केला. त्याची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाली.

मराठमोळ्या अभिजीत दिपकेसाठी दाक्षिणात्य अभिनेत्रीची खास पोस्ट! ज्योतिका म्हणते, “मला माझ्या मुलाला तुझ्यासारखा…”

अभिनेता सनी हिंदुजा

अभिनेता सनी हिंदुजाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत एकजुटीची ताकद अधोरेखित केली. लोक एकत्र आले तर बदल शक्य होतो, हे या आंदोलनातून पुन्हा एकदा दिसून आल्याचे त्याने म्हटले. संघर्ष दीर्घकाळ चालला असला तरी संयम आणि सातत्य यामुळेच यश मिळते, असेही त्याने नमूद केले.

अभिनेत्री राशी खन्ना

अभिनेत्री राशी खन्नाने आपल्या प्रतिक्रियेत प्रत्येक आंदोलनाला तात्काळ प्रसिद्धी मिळत नाही, असे सांगितले. अनेक वेळा शांतपणे आणि सातत्याने केलेले प्रयत्नच मोठे परिणाम घडवतात. विद्यार्थ्यांनी दाखवलेला संयम आणि चिकाटी कौतुकास्पद असल्याचे तिने लिहिले.

निर्माती आणि सूत्रसंचालिका शिबानी अख्तर

निर्माती आणि सूत्रसंचालिका शिबानी अख्तरनेही तरुणांच्या निर्धाराचे स्वागत केले. आजची पिढी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास मागेपुढे पाहत नाही, ही सकारात्मक बाब असल्याचे तिने म्हटले. समाजातील बदलांसाठी युवकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही तिने अधोरेखित केले.

“My Dear Cockroach….” म्हणत प्रकाश राज यांनी पोस्ट टाकत cjpचे केले अभिनंदन

अभिनेता अभिषेक बॅनर्जी

अभिनेता अभिषेक बॅनर्जीने सोशल मीडियावरील आपला प्रोफाइल फोटो बदलत नव्या पिढीचे अभिनंदन केले. त्याने एकजुटीचा संदेश देत तरुणांनी दाखवलेल्या ऐक्याचे कौतुक केले. त्याचप्रमाणे विनोदी कलाकार पारितोष यांनीही सकारात्मक विचार आणि शांततापूर्ण आंदोलनाचा सन्मान केला पाहिजे, असे मत व्यक्त केले.

अभिनेता विजय वर्मा

दरम्यान, अभिनेता विजय वर्माने आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली. त्याने धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेअर करत चित्रपटातील लोकप्रिय संवादाचा वापर केला. त्याच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले. काहींनी ती विनोदी शैलीत घेतली, तर काहींनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

कॉमेडियन वीर दास

कॉमेडियन वीर दासने कोणतीही मोठी टिप्पणी न करता प्रार्थना, भारतीय ध्वज आणि हृदयाचे इमोजी पोस्ट केले. कमी शब्दांतही त्याने आपली भावना व्यक्त केली. अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही या घडामोडीशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करत चर्चेत सहभाग नोंदवला.

या संपूर्ण प्रकरणानंतर सोशल मीडियावर विद्यार्थी आंदोलन, शिक्षण व्यवस्था आणि तरुणांच्या सहभागाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेकांच्या मते, या आंदोलनाने विद्यार्थ्यांचा आवाज राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला. तर काहींचे मत आहे की, शिक्षण व्यवस्थेतील उर्वरित प्रश्नांवरही आता ठोस पावले उचलली जाणे आवश्यक आहे.

एकूणच, या घडामोडींनंतर सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया चर्चेचा भाग बनल्या आहेत. मात्र या सर्वांमध्ये एक गोष्ट समान दिसून आली, ती म्हणजे तरुणांच्या एकजुटीचे आणि लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाचे अनेकांनी कौतुक केले. पुढे या आंदोलनाचे परिणाम काय होतात, याकडे देशाचे लक्ष लागून राहणार आहे.

 

Web Title: Celebrities react to dharmendra pradhans resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Dharmendra Pradhan Resignation
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
1

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
2

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार
3

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी
4

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.