फोटो सौजन्य - Social Media
काय आहे ती पोस्ट?
अभिनेत्री ज्योतिका लिखिते की, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. पद सोडावे. मी विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या देशाच्या भविष्याच्या पाठीशी उभी आहे! मी उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेच्या बाजूने आहे! मी लोकशाही भारताच्या बाजूने आहे! मी शिक्षण क्षेत्रातील सुधारणांच्या बाजूने आहे! सोनम वांगचुक, अभिजित दीपके आणि सौरव दास : एक आई म्हणून आम्हाला वाटतं की आमची मुलंही तुमच्यासारखीच घडली पाहिजेत! जेन्-झी (Gen Z) च्या तरुणाईचा अभिमान वाटतो, जे जसे आहेत तसे बिनधास्त आणि स्पष्ट मांडतात. तुम्ही हे सिद्ध केलंत की एकत्र आलो, तर “आपण”च भारत आहोत! दबाव मोडून काढल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला निर्भय बनवल्याबद्दल CJP चे मनापासून आभार! जय हिंद! – ज्योतिका”
ज्योतिकाने या पोस्टच्या शेवटी ‘जय हिंद’ असे नमूद केले आहे. तर तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत “आपण जिंकलो!” अशा कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी “तुम्ही अगदी जिंकण्याच्या थोड्या वेळेच्या आधीच CJP ला पाठिंबा दिला आहे,” असे कमेंट्समध्ये लिहिले आहे.






