Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा

Chhatrapati Shivaji Maharaj: Chhatrapati Shivaji Maharaj Movie: दिग्दर्शक अमित राय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका घटनेवर आधारित ऐतिहासिक चित्रपट बनवणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 10, 2026 | 09:03 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Chhatrapati Shivaji Maharaj: ‘रोड टू संगम’, ‘ओएमजी २’ आणि ‘ओह माय डॉग’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे अमित राय आता एका नव्या ऐतिहासिक चित्रपटाच्या तयारीत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका विशेष मुलाखतीत अमित राय यांनी आपल्या आगामी प्रोजेक्टबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांचा हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका महत्त्वाच्या घटनेवर आधारित असणार आहे.

या मुलाखतीदरम्यान अमित राय यांनी इतिहासाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही भाष्य केले. इतिहास नेमका कोण लिहितो, यावर त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. आपला इतिहास अनेकदा दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला गेला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

‘इतिहास कोण लिहितो हे आपण विसरतो’

अमित राय यांनी सांगितले की, त्यांच्याकडे एका ऐतिहासिक दस्तऐवजातील एक कथा आहे. या कथेचा संदर्भ देताना त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचे उदाहरण दिले.

त्यांच्या मते, एखाद्या घटनेचा इतिहास कोणी लिहिला आहे, यावर त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. ब्रिटिशांनी जालियनवाला बागचा इतिहास लिहिला असता, तर जनरल डायरला कदाचित खलनायक म्हणून दाखवले गेले नसते. मात्र, अमृतसरमधील लोकांनी तो इतिहास लिहिला असता, तर निःशस्त्र लोकांवर झालेल्या गोळीबाराची कहाणी वेगळ्या पद्धतीने मांडली गेली असती, असे त्यांनी म्हटले.

‘आपला इतिहास लिहायला आपल्याला वेळच नव्हता’

भारताच्या इतिहासाबाबत बोलताना अमित राय म्हणाले की, भारतीयांनी अनेकदा आपला इतिहास लिहिण्याऐवजी आपल्या संस्कृतीच्या आणि देशाच्या रक्षणासाठी संघर्ष केला. त्यामुळे इतिहास लिहिण्याचे काम दुसऱ्यांच्या हातात गेले.

भारतीय इतिहासाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. इतिहासातील अनेक घटना एका विशिष्ट दृष्टिकोनातून मांडल्या गेल्या असून, त्यातील काही गोष्टी विकृत स्वरूपातही समोर आल्या असण्याची शक्यता असल्याचे अमित राय यांनी म्हटले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ‘त्या’ घटनेवर चित्रपट

आपल्या आगामी चित्रपटाबद्दल अमित राय यांनी सांगितले की, त्यांच्याकडे एका ऐतिहासिक दस्तऐवजातील एक कथा आहे. ही घटना ज्या पद्धतीने आजवर शिकवली किंवा दाखवली जाते, त्यापेक्षा प्रत्यक्षात वेगळी घडली असल्याचा त्यांचा दावा आहे.

ही कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका घटनेशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेवर चित्रपट बनवण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे अमित राय यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, हा प्रोजेक्ट वेब सीरिज नसून चित्रपटच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील नेमकी कोणती घटना या चित्रपटातून पडद्यावर येणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Amruta Khanvilkar Divorce Rumors : अमृता खानविलकरचा मोठा निर्णय! दिला थेट कायदेशीर कारवाईचा इशारा; नेमकं काय घडलं?

‘ओह माय डॉग’नंतर ऐतिहासिक चित्रपट

अमित राय यांचा ‘ओह माय डॉग’ हा चित्रपट ३१ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, पवन मल्होत्रा, राजेश कुमार, गीता अग्रवाल शर्मा आणि माही राय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका घटनेवर आधारित चित्रपटाच्या माध्यमातून अमित राय इतिहासाकडे कोणत्या नव्या दृष्टिकोनातून पाहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Nikita Rawal Kiss Controversy: फॅनने अचानक केलं लिप-लॉक किस;अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं? व्हिडिओवर दिली पहिली प्रतिक्रिया

Web Title: Chhatrapati shivaji maharaj historical film director amit rai makes a big revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Entertainemnt News
  • Maharaj movie

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.