Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनिकेत-छवीच्या नात्यात वाढतोय गोडवा, पण शांभवीच्या कारस्थानांनी वाढली चिंता; ‘Mi Jinkun Ghein Saara’मध्ये रंगणार नवा संघर्ष

Mi Jinkun Ghein Saara: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका मी जिंकून घेईन सारं मध्ये सध्या राजगुरू कुटुंबातील अंतर्गत राजकारण आणि रहस्यांनी कथेला रोमांचक वळण मिळाले आहे. अनिकेत आणि छवी नव्या आयुष्याची सुरुवात करत असतानाच अनिकेतला धोकादायक सापळ्यात अडकवण्याचा डाव रचला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 11, 2026 | 06:03 PM
अनिकेत-छवीच्या नात्यात वाढतोय गोडवा, पण शांभवीच्या कारस्थानांनी वाढली चिंता; ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये रंगणार नवा संघर्ष

अनिकेत-छवीच्या नात्यात वाढतोय गोडवा, पण शांभवीच्या कारस्थानांनी वाढली चिंता; ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये रंगणार नवा संघर्ष

Follow Us
Follow Us:
  • राजगुरूंच्या घरात मानाने परतण्याचं छवीने दिलं शांभवीला चॅलेंज!
  • ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये रंगणार नवा संघर्ष
  • शांभवीला छवीचं सडेतोड प्रत्युत्तर; अनिकेतवरही मोठं संकट
Mi Jinkun Ghein Saara : कलर्स मराठीवरील ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेच्या आगामी भागांमध्ये राजगुरू कुटुंबातील संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. कुटुंबातील अंतर्गत राजकारण, एकमेकांविरोधात रचली जाणारी कारस्थानं आणि अचानक समोर येणाऱ्या संकटांमुळे मालिकेच्या कथानकाला वेग आला आहे.

एकीकडे अनिकेत आणि छवी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या मार्गातील अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. शकुंतलाला सोडवण्यासाठी अनिकेतने उचललेलं पाऊल त्याच्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यातच अचानक निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे अनिकेतसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्याला एका धोकादायक सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याने आगामी भागांमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Independence Day Special: स्वप्नांसाठी उभं राहा, पण इतरांचा आदरही करा; ‘कमळी’ आणि ‘ज्योती’चा स्वातंत्र्यदिन विशेष संदेश

दरम्यान, शांभवीच्या प्रत्येक आव्हानाला छवीने दमदार आणि सडेतोड उत्तर दिलं आहे. शांभवीसमोर छवीने आत्मविश्वासाने उभं राहत, “आजचा दिवस तुझा होता, पण लवकरच आम्ही मानाने या घरात परत येऊ,” असं म्हणत तिला थेट चॅलेंज दिलं आहे. छवीच्या या वक्तव्यामुळे राजगुरू कुटुंबातील संघर्षाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. या सगळ्या तणावाच्या वातावरणात अनिकेत आणि छवीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वासही अधिक घट्ट होताना दिसत आहे. संकटाच्या प्रत्येक टप्प्यावर अनिकेत छवीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहे. त्यामुळे दोघांमधील नात्याचा गोडवा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

दुसरीकडे, बाईजींना छवी आणि अनिकेतची लागलेली काळजी आणि शांभवीच्या कारस्थानांमागचं सत्य समोर येण्याची शक्यता यामुळे कथानक अधिक उत्कंठावर्धक बनलं आहे. आता छवी खरंच राजगुरूंच्या घरात मानाने परतणार का? शांभवी तिचं चॅलेंज स्वीकारून कोणता नवा डाव खेळणार? अनिकेतवर आलेलं आर्थिक संकट नेमकं काय आहे आणि तो या संकटातून कसा बाहेर पडणार? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांत मिळणार आहेत. ‘मी जिंकून घेईन सारं’ दररोज संध्याकाळी ७ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर पाहता येईल.

Madhuri Dixit Comeback : २४ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक; ‘धकधक गर्ल’च्या रिअॅलिटी शोची घोषणा

Web Title: Chhavi challenges shambhavi to return to rajguru housemi jinkun ghein saara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Independence Day Special: स्वप्नांसाठी उभं राहा, पण इतरांचा आदरही करा; ‘कमळी’ आणि ‘ज्योती’चा स्वातंत्र्यदिन विशेष संदेश
1

Independence Day Special: स्वप्नांसाठी उभं राहा, पण इतरांचा आदरही करा; ‘कमळी’ आणि ‘ज्योती’चा स्वातंत्र्यदिन विशेष संदेश

Ravi Prakash: मराठी शिकण्यासाठी रवि प्रकाशने लावली ‘ही’ मालिका; आता ‘दशमी’मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला
2

Ravi Prakash: मराठी शिकण्यासाठी रवि प्रकाशने लावली ‘ही’ मालिका; आता ‘दशमी’मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला

पडद्यावरची लेक झाली खऱ्या आयुष्यातही खास; अभिनेत्रीच्या लग्नात अभिनेत्याने निभावली वडिलांची भूमिका
3

पडद्यावरची लेक झाली खऱ्या आयुष्यातही खास; अभिनेत्रीच्या लग्नात अभिनेत्याने निभावली वडिलांची भूमिका

Kamli-Tarini Serial: ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये रंगणार अन्यायाविरुद्धची लढाई; नायिकांसमोर उभी राहणार नवी आव्हानं
4

Kamli-Tarini Serial: ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये रंगणार अन्यायाविरुद्धची लढाई; नायिकांसमोर उभी राहणार नवी आव्हानं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.