Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravi Prakash: मराठी शिकण्यासाठी रवि प्रकाशने लावली ‘ही’ मालिका; आता ‘दशमी’मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला

Ravi Prakash: दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता रवि प्रकाश आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. आगामी ‘दशमी’ या मराठी सिनेमात तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. मराठी संवाद आणि स्थानिक लहेजा सहज आत्मसात करण्यासाठी रवि प्रकाशने विशेष मेहनत घेतली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 09, 2026 | 03:15 PM
Ravi Prakash: मराठी शिकण्यासाठी रवि प्रकाश (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ravi Prakash: मराठी शिकण्यासाठी रवि प्रकाश (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रवि प्रकाशचा मराठी चित्रपटात पदार्पण.
  • ‘दशमी’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका.
  • मराठी भाषा आणि लहेजासाठी विशेष तयारी.
 

South Star Ravi Prakash: दक्षिणेतील चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता रवि प्रकाश आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. आतापर्यंत त्याला प्रामुख्याने साऊथच्या सिनेमांमध्ये पाहिलं गेलं आहे. मात्र तो थेट मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दशमी या आगामी सिनेमात रवि प्रकाश महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आधीपासूनच वाढली आहे. मराठी चित्रपटात काम करण्यापूर्वी रवि प्रकाशचे भाषेवर विशेष मेहनत घेतल्याचं समोर आलं आहे. मराठी संवाद सहज बोलता यावेत, स्थानिक भाषेचा लहेजा समजावा आणि भूमिकेत कृत्रिमपणा जाणवू नये, यासाठी त्याने चक्क मालिकेचा आधार घेतला. विशेष म्हणजे शिकवणारी ही मालिका अनेक घरांमध्ये लोकप्रिय आहे.

लॅपटॉपवर ‘ही’ मालिका पाहायचा

रवि प्रकाशने ‘लग्नानंतर होईलच प्रेम‘ ही मालिका पाहून मराठी समजून घेण्याचा प्रयत्न केला. सेटवर वेळ मिळेल तेव्हा तो लॅपटॉपवर ही मालिका पाहायचा. संवाद ऐकून त्यातील शब्द लक्षात ठेवण्याचा आणि मराठी बोलण्याची समजून घेणं अधिक सोपं जातं, असंच काहीसं त्याच्या बाबतीत झालं. या मालिकेशी जोडलेला एक मजेशीर प्रसंगही रवि प्रकाशने सांगितला.तो शूटिंगच्या ठिकाणी लॅपटॉपवर मालिका पाहत असताना त्याच मालिकेतील अभिनेता प्रसन्न केतकर अचानक सेटवर आला. पडद्यावर ज्याला पाहत होता. तोच कलाकार समोर उभा असल्याचं पाहून रविला क्षणभर आश्चर्य वाटलं. हा किस्सा सांगताना त्याने आपला अनुभवही शेअर केला.

‘दशमी’च्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांसमोर

इतकंच नाही तर एका कार्यक्रमात त्याची मालिकेतील अभिनेता विजय आंदळकरसोबतही भेट झाली होती. त्यामुळे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका रवि प्रकाशसाठी केवळ मनोरंजनाचा भाग राहिली नाही, तर मराठी भाषेशी जवळीक निर्माण करण्याचं एक साधन ठरली. आता रवि प्रकाश ‘दशमी’च्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश भोसले यांनी केलं आहे. यापूर्वी त्यांनी ‘मंगलाष्टक रिटर्न्स’, ‘बाजार’ आणि ‘आम्ही जरांगे’ यांसारख्या चित्रपटांवर काम केलं आहे. त्यामुळे ‘दशमी’मध्ये नेमकी कोणती कथा पाहायला मिळणार, याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक, ३३ वर्षीय अभिनेत्रीने केला बलात्काराचा आरोप, मुंबई पोलिसांची कारवाई

चित्रपटामध्ये ‘हे’ कलाकार दिसणार…

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला रवि प्रकाशसह चित्रपटातील इतर कलाकारही उपस्थित होते. पोस्टर समोर आल्यानंतर सिनेमातील कलाकारांची निवडही चर्चेचा विषय ठरली. ‘दशमी’मध्ये रवि प्रकाशसोबत महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, देवेंद्र गायकवाड, प्रसन्न केतकर आणि गौरी इंगवले यांसारखे कलाकार दिसणार आहेत.

अनुभवी कलाकार आणि नव्या चेहऱ्यांचा हा मेळ चित्रपटासाठी खास ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची माहिती आहे. सणाच्या काळात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Govinda Affair: गोविंदांसोबत दिसली मिस्ट्री गर्ल; मुंबई विमानतळावर दोघेही एकत्र, पत्नी सुनीता आहुजांनी केले होते अफेअरचे आरोप

दक्षिणेतील अभिनेता मराठी चित्रपटात दिसणार, ही गोष्ट स्वतःमध्येच उत्सुकता वाढवणारी आहे. त्यातही भूमिका साकारण्यासाठी रवि प्रकाशने मराठी भाषा शिकण्याचा घेतलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. आता त्याने मालिकेतून शिकलेली मराठी पडद्यावर किती सहजपणे वापरली आहे, त्याचा अभिनय कसा आहे आणि ‘दशमी’ची कथा प्रेक्षकांना किती भावते, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समोर येईल.

Web Title: South star ravi prakash makes marathi debut with dashami learns marathi from tv serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Job vs Business : नोकरी की व्यवसाय? कोणता पर्याय तुम्हाला वेगाने बनवू शकतो श्रीमंत; हे आहे फायद्या-तोट्याच गणित?
1

Job vs Business : नोकरी की व्यवसाय? कोणता पर्याय तुम्हाला वेगाने बनवू शकतो श्रीमंत; हे आहे फायद्या-तोट्याच गणित?

Chandrapur News: रेल्वेच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू; बल्लारशाह-काजीपेठ मार्गावर वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2

Chandrapur News: रेल्वेच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू; बल्लारशाह-काजीपेठ मार्गावर वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Crime News: ऑनलाइन मैत्री… मग गुप्त माहितीचा खेळ! हवाई दलाच्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप
3

Crime News: ऑनलाइन मैत्री… मग गुप्त माहितीचा खेळ! हवाई दलाच्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप

Raigad News: कर्जतच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा? तालुका ओला-उबरसाठी खुला करण्याची भूमिपुत्र संघटनेची मागणी
4

Raigad News: कर्जतच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा? तालुका ओला-उबरसाठी खुला करण्याची भूमिपुत्र संघटनेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.