Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deool Band 2: स्वामींची भक्ती अपरंपार, देऊळ बंद २ च्या कलेक्शनमध्ये १० व्या दिवशी मोठी वाढ! रितेश देशमुखच्या चित्रपटाला टाकलं मागं

Deool Band 2 Box Office Collection: ‘देऊळ बंद २’ने १०व्या दिवशी ५ कोटींहून अधिक कमाई करत एकूण ४० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सॅकनिल्कच्या माहितीनुसार चित्रपटाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 31, 2026 | 10:56 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

रिेतेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटानंतर आता देऊळ बंद २ चित्रपटाची चर्चा सध्या संपूर्ण जगभरात सुरू आहे. देऊळ बंद २१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गेल्या दहा दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने ४० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. त्यामुळे २०२६ हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टी साठी सकारात्नक असल्याचं पाहायला मिळतोय.या ऐतिहासिक कामगिरीनंतर सर्व स्तरांतून प्रवीण तरडे आणि संपूर्ण टीमचे भरभरून कौतुक केले जात आहे.

११ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘देऊळ बंद’ चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या ९ दिवसांत या चित्रपटाने तब्बल ३९.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

पहिल्याच आठवड्यात ‘देऊळ बंद २’ने अनेक चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. विशेष म्हणजे या काळात या चित्रपटाने एकूण पाच चित्रपटांवर आघाडी घेतली आहे.

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वामीभक्त प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरमध्ये गर्दी करत असून, चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या जोरदार कमाईमुळे ‘देऊळ बंद २’ चर्चेत आला असून, बॉक्स ऑफिसवर त्याचा प्रवास अजूनही मजबूत दिसत आहे.

या चित्रपटांना टाकलं मागं
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी 3.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘सॅकनिल्क’च्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच तब्बल 30.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवत दमदार सुरुवात केली होती.या जोरदार कामगिरीमुळे ‘देऊळ बंद २’ने रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटाच्या कलेक्शनलाही मागे टाकलं आहे. तसेच ‘पावनखिंड’ या लोकप्रिय मराठी चित्रपटाचाही रेकॉर्ड मोडला आहे.

सध्या ‘देऊळ बंद २’ सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला असून त्याने ‘टाइमपास’, ‘ठाकरे’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘लय भारी’ आणि ‘पावनखिंड’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकत आपली मजबूत छाप उमटवली आहे.

”30-40 पोरं मारहाण करण्यासाठी…”, मराठी अभिनेत्यावर टोळक्यांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न,पोस्ट करत सांगितला धक्कादायक अनुभव

चित्रपटाच्या कमाईत १०व्या दिवशी मोठी वाढ
‘देऊळ बंद २’च्या कलेक्शनमध्ये दुसऱ्या शनिवारी म्हणजेच १०व्या दिवशी मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने दहाव्या दिवशी ५ कोटींहून अधिक कमाई केली आहे.‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचं १० दिवसांचं एकूण कलेक्शन ४० कोटींच्या पुढे गेलं आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा जोरदार प्रतिसाद अजूनही कायम असून मध्यरात्रीचे शोही हाऊसफुल्ल सुरू असल्याचं दिसत आहे.

Famous Actress :  एकेकाळी इंडस्ट्रीवर राज्य करणारी अभिनेत्री आज रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का

दरम्यान, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नुकतीच साताऱ्यातील सिटी प्राइड थिएटरला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मध्यरात्रीचा शो हाऊसफुल्ल असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत प्रेक्षकांच्या उत्साहाची झलक दाखवली.मुंबई, पुण्यासह राज्यभरात चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता ‘देऊळ बंद २’ची घोडदौड अजूनही मजबूत सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे.

Web Title: Deool band 2 box office collection day 10 40 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • pravin tarade
  • ritesh deshmukh
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

”पैशांची बॅग हरवली…”, ओळख नसतानाही सई ताम्हणकरने दिला मदतीचा हात, प्रवीण तरडेंनी सांगितला परदेशातला न विसरता येणारा प्रसंग
1

”पैशांची बॅग हरवली…”, ओळख नसतानाही सई ताम्हणकरने दिला मदतीचा हात, प्रवीण तरडेंनी सांगितला परदेशातला न विसरता येणारा प्रसंग

”तू, मी आणि देऊळ बंद 2….”,  Pravin Tarde यांच्या पत्नीची भावनिक पोस्ट चर्चेत! म्हणाल्या, ”स्वामींनी आपल्याला…”
2

”तू, मी आणि देऊळ बंद 2….”, Pravin Tarde यांच्या पत्नीची भावनिक पोस्ट चर्चेत! म्हणाल्या, ”स्वामींनी आपल्याला…”

Raja Shivaji Box Office Collection : मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा; ‘राजा शिवाजी’ची 100 कोटींची कमाई
3

Raja Shivaji Box Office Collection : मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा; ‘राजा शिवाजी’ची 100 कोटींची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.