
‘देवसखा’मधून रंगणार भक्ती आणि देवाच्या नात्याचा सुरेल प्रवास, भक्ती, श्रद्धा, संगीताचा संगम
Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?
भक्त आणि देव यांच्यातील नाते जितके वैयक्तिक, तितकेच वैश्विक आहे. या नात्यातील भावभावना, श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाचे विविध पैलू संतांच्या रचनांमधून व्यक्त होतात. या सुंदर नात्याचे भावविश्व उलगडत त्यातील भावसंपदा जतन करण्याचा सांगीतिक प्रवास म्हणजे ‘देवसखा’. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई आणि संत नामदेव महाराज यांच्या संतपरंपरेतील भक्तिभाव या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहे.
या कार्यक्रमात प्राची कोकीळ-मराठे या सादरकर्ती असून, दत्ता मेस्त्री सहगायक म्हणून सहभागी होणार आहेत. संगीत संयोजन विनय चेऊलकर यांचे आहे. अक्षय कावळे (कीबोर्ड), हिमांशु गिंडे (बासरी), मयुरेश शेर्लेकर आणि आदित्य आठल्ये (तबला), जयंत बगाडे (पखवाज) आणि चेतन परब (तालवाद्य) हे कलाकार संगीतसाथ करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन सिद्धार्थ देशपांडे करणार असून, लेखन प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील संतसाहित्य, भक्तिसंगीत आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतसाहित्य आणि भक्तिसंगीताच्या या भावपूर्ण मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.