Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका

पश्चिम रेल्वेवरील वाढत्या गर्दीला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सोपा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बोरिवली, अंधेरी आणि विरार स्थानकांत चार नवे फलाट उभारले जाणार असून, पाचव्या व सहाव्या मार्गिकेच्या कामानंतर विरारपर्यंत सुमारे ३० ते ४० अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 09, 2026 | 11:16 AM
मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका

Follow Us
Follow Us:
  • ४ नवे फलाट अन् ४० अतिरिक्त लोकल गाड्या सुरु होणार.
  • अंधेरीतील गर्दीवर विशेष उपाययोजना
  • लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरीय लोकलची वाहतूक पूर्णपणे स्वतंत्र होईल
पश्चिम रेल्वेवरील वाढती गर्दी आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी बोरिवली, अंधेरी आणि विरार स्थानकांत चार नव्या फलाटांची उभारणी करण्यात येणार आहे. बोरिवलीत दोन, तर अंधेरी आणि विरारमध्ये प्रत्येकी एक फलाट उभारला जाणार आहे. या कामांमुळे रेल्वेच्या परिचालनात लवचिकता वाढून विरारपर्यंत ३० ते ४० अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय

पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक स्वतंत्रपणे हाताळता येणार आहे. त्यामुळे गाड्यांच्या मार्गातील अडथळे कमी होऊन अतिरिक्त लोकल चालविण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील. बोरिवली-विरार पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाचा भाग म्हणून बोरिवलीत एका नव्या फलाटाची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गाच्या विस्तारासाठी स्थानकाच्या दक्षिण बाजूस आणखी एक फलाट बांधण्यात येणार आहे. दोन्ही फलाटांची लांबी सुमारे ३३० मीटर आणि रुंदी सात मीटर असेल. विरारमध्येही पाचव्या आणि सहाव्या मार्गिकअंतर्गत अतिरिक्त फलाट उभारला जाणार आहे. नव्या फलाटामुळे पादचारी पुलांवरील गर्दी कमी होऊन जिन्यांवरील प्रवाशांचा ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे.

पाचवी-सहाव्या मार्गिकेनंतर सेवाविस्तार

नवे फलाट आणि पाचवी-सहावी मार्गिका उपलब्ध झाल्यानंतर उपनगरीया सेवांची संख्या वाढविण्यास पश्चिम रेल्वेला अधिक वाव मिळणार आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर परिचालनाच्या गरजांचा आढावा घेऊन विरारपर्यंतच्या अतिरिक्त सेवांचे। नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे ३० ते ४० अतिरिक्त लोकल सुरू होण्याची शक्यता आहे.

अंधेरीत दोन टप्प्यांत विस्तार

दररोज सुमारे साडेचार लाख प्रवाशांची वर्दळ असलेल्या अंधेरी स्थानकावर एक हजारांहून अधिक उपनगरीय गाड्यांची ये-जा होते. त्यामुळे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी दोन टप्प्यांत विस्तार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात फलाट क्रमांक ४ आणि ५ दक्षिणेकडे वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे फलाट क्रमांक ५ वरून विरारच्या दिशेने गाड्या वळविणे अधिक सुलभ होणार आहे. फलाट क्रमांक ६ आणि ७ दक्षिणेकडे २० मीटर, तर उत्तरेकडे १० मीटरने वाढविण्यात येणार आहेत. सिग्नल एस-४९ दक्षिणेकडे हलविण्यात येणार आहे.

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

अंधेरीतील फलाट ९वरील गर्दीला लगाम

दुसऱ्या टप्प्यात सहाव्या मार्गिकेला लागून स्थानकाच्या उत्तरेकडील बाजूस १२ डब्याचा नवा होम फलाट उभारण्यात येणार आहे. या फलाटावर दोन्ही बाजूंनी प्रवाशांना बाहेर पडता येणार आहे. त्यामुळे फलाट क्रमांक ९ वर येणाऱ्या प्रवाशांना अंधेरी पूर्वेकडील रस्त्याच्या दिशेनेही थेट बाहेर पडता येईल, सध्या फलाट क्रमांक ९ वर गाडी आल्यानंतर प्रवाशांना प्रामुख्याने पादचारी पूल आणि अरुंद जिन्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मोठी कोडी होते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai western railway 4 new platforms 30 40 additional local trains borivali andheri virar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Local Trains
  • Mumbai News
  • Western Railway

संबंधित बातम्या

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार
1

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

निलंबित एपीआयच्या  आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?
2

निलंबित एपीआयच्या आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव
3

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव

Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी
4

Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.