Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेल्या भूमिगत मेट्रोच्या ‘ॲक्वा लाईन’ने मोठा टप्पा गाठला आहे. संपूर्ण मार्गावरील सेवा सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत असताना प्रवासी संख्येने ७ कोटींचा आकडा पार केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 09, 2026 | 09:30 AM
‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

Follow Us
Follow Us:
  • ‘ॲक्वा लाईन’वर आतापर्यंत ७ कोटींहून अधिक प्रवासी प्रवासांची नोंद झाली आहे.
  • वर्षपूर्तीनिमित्त MMRC कडून ‘टाइम कॅप्सूल’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे.
  • मेट्रोप्रेमींना निवडक स्थानकांचे वैशिष्ट्यपूर्ण शिक्के गोळा करता यावेत, यासाठी ‘ॲक्वा लाईन पासपोर्ट’ उपक्रमही सुरू होणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC) च्या ‘ॲक्वा लाईन’ने ७ कोटी प्रवासी प्रवासांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. आरे जेव्हीएलआर ते कप परेड या संपूर्ण मार्गावर सेवा सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत असताना, ‘ॲक्वा लाईन’वर आतापर्यंत ७,१८,५२,४७३ प्रवासी प्रवासांची नोंद झाली आहे. मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिकेला मिळत असलेला वाढता प्रतिसाद यामुळे अधोरेखित होतो.

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय

‘ॲक्वा लाईन’ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सप्टेंबर २०२६ मध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज सरासरी २,२४,६०२ प्रवाशांनी, तर शनिवार आणि रविवार या दिवशी दररोज सरासरी १,३१,१३८ प्रवाशांनी ‘ॲक्वा लाईन’ने प्रवास केला. मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील ‘अॅक्वा लाईन’चे वाढते महत्त्व यावरून स्पष्ट होते. या महत्त्वपूर्ण टप्प्याच्या निमित्ताने MMRC तर्फे ‘ॲक्वा लाईन time capsule आणि ‘ॲक्वा लाईन पासपोर्ट व शिक्का हे दोन विशेष उपक्रम करण्यात येणार आहेत.

‘ॲक्वा लाईन time capsule’ हा भारतातील मेट्रो क्षेत्रातील अशा स्वरूपाचा पहिलाच उपक्रम आहे. ‘ॲक्वा लाईन’च्या उभारणीपासून ते तिच्या कार्यान्वयनापर्यंतच्या प्रवासातील महत्त्वाची कागदपत्रे, छायाचित्रे, महत्त्वाचे टप्पे आणि आठवणी यात जतन केल्या जाणार आहेत. सन २०२६ मधील ‘ॲक्वा लाईन’ आणि मुंबईचे एक चित्र पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा हा प्रयत्न आहे.

प्रवाशांना ‘ॲक्वा लाईन’चा प्रवास अधिक आनंददायी आणि वेगळ्या पद्धतीने अनुभवता यावा यासाठी ‘ॲक्वा लाईन पासपोर्ट व शिक्का’ हा उपक्रमही सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रवासी आणि मेट्रोप्रेमींना मार्गिकेवरील निवडक स्थानकांना भेट देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण स्थानक- शिक्का संग्रहित करता येणार आहेत.

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी

यावेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक, श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या, “‘ॲक्वा लाईन’च्या संपूर्ण मार्गावरील सेवेला एक वर्ष पूर्ण होत असताना, तिला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारल्याबद्दल मी मुंबईकरांचे मनापासून आभार मानते. ७ कोटी प्रवासी प्रवासांचा टप्पा गाठणे हा मुंबईकरांचा ‘ॲक्वा लाईन’वरील विश्वास आणि पाठिंबा दर्शवणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. Time capsule आणि पासपोर्ट व शिक्का संग्रह हे उपक्रम या सामूहिक प्रवासाचा आनंद साजरा करण्यासोबतच त्याच्या आठवणी पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

मुंबईकरांनी त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी यापुढेही ‘ॲक्वा लाईन’ची निवड करत राहावी, अशी MMRC ची अपेक्षा आहे.( समाप्त )

 

Web Title: Mumbai metro aqua line crosses 7 crore passenger mark first anniversary time capsule passport stamp nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Mumbai Metro
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

निलंबित एपीआयच्या  आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?
1

निलंबित एपीआयच्या आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
2

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव
3

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाहतूक-लॉजिस्टिक्ससाठी स्वतंत्र प्राधिकरण, १० वर्षांचा मास्टर प्लॅन होणार तयार
4

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाहतूक-लॉजिस्टिक्ससाठी स्वतंत्र प्राधिकरण, १० वर्षांचा मास्टर प्लॅन होणार तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.