Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drishyam 3: ‘धुरंधर’नंतर वाढली फीस अन् ‘दृश्यम 3’मधून अक्षय खन्नाचा पत्ता कट? जयदीप अहलावतने सांगितलं खरं सत्य

Drishyam 3: ‘दृश्यम 3’मध्ये जयदीप अहलावत अक्षय खन्नाच्या पात्राची जागा घेणार असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होती. आता याबद्दल अभिनेत्याने स्वत: याबद्दल खुलासा केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 10, 2026 | 11:10 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Drishyam 3: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित ‘दृश्यम 3’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून, ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, यावेळी कथेत काही नवे चेहरेही पाहायला मिळणार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता जयदीप अहलावत. त्याच्या एन्ट्रीमुळे अक्षय खन्नाच्या एक्झिटची चर्चा पुन्हा रंगली आहे.

‘दृश्यम 3’मध्ये जयदीप अहलावत अक्षय खन्नाच्या पात्राची जागा घेणार असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होती. विशेष म्हणजे अक्षय खन्नाने ‘धुरंधर’च्या यशानंतर मानधन वाढवल्यामुळे तो ‘दृश्यम 3’मधून बाहेर पडल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, आता खुद्द जयदीप अहलावतने या चर्चेवर भाष्य करत संपूर्ण चित्र स्पष्ट केलं आहे.

‘मी अक्षयच्या पात्राची जागा घेत नाहीये’

९ सप्टेंबरला गोव्यात ‘दृश्यम 3’च्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जयदीप अहलावतला अक्षय खन्नासोबत होणाऱ्या तुलनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्ट केलं की, जेव्हा त्याला या भूमिकेबद्दल सांगण्यात आलं, तेव्हा आपण अक्षयच्या पात्राची जागा घेत आहोत, असं त्याला कधीही सांगण्यात आलं नव्हतं.

जयदीपच्या मते, एका पात्राची कथा संपते आणि त्यानंतर दुसऱ्या पात्राची कथा सुरू होते. त्याच्या व्यक्तिरेखेचा स्वतःचा वेगळा प्रवास, स्वतंत्र ओळख आणि वेगळी नाती आहेत. त्यामुळे अक्षय खन्नाने साकारलेल्या पात्राशी त्याची तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही.

तब्बूसोबतही वेगळं नातं

जयदीप अहलावतने त्याच्या व्यक्तिरेखेच्या नात्यांबद्दलही भाष्य केलं. चित्रपटात तब्बूने साकारलेल्या मीरा या पात्रासोबत त्याचं नातंही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे याआधी साकारलेल्या पात्राशी तुलना करण्याचा कोणताही दबाव आपल्यावर नसल्याचं जयदीपने सांगितलं.

‘दृश्यम 3’मध्ये जयदीप अहलावत पोलीस अधीक्षक (गुन्हे शाखा) राजवीर सिंग तोमर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये त्याची एन्ट्री अजय देवगणच्या विजय साळगावकरच्या आयुष्यातील अडचणी वाढवणारी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जयदीपची व्यक्तिरेखा कथेत नेमकी काय भूमिका बजावणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Rani Mukerji: मराठमोळ्या लूकमध्ये राणी मुखर्जीने वेधलं लक्ष; पुरस्कार स्वीकारताना मराठीत केली भाषणाची सुरुवात

अक्षय खन्ना सिनेमातून का बाहेर पडला?

दरम्यान, डिसेंबर २०२५मध्ये अक्षय खन्ना ‘दृश्यम 3’मधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी निर्माते कुमार मंगत पाठक यांनी करार झाल्यानंतर अक्षयसोबत काही मुद्द्यांवर मतभेद झाल्याचा दावा केला होता. यामध्ये मानधन आणि चित्रपटातील त्याच्या भूमिकेशी संबंधित मुद्द्यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात होतं.

यानंतर निर्मात्यांनी जयदीप अहलावतला सिनेमात घेतलं. मात्र, त्यावेळीही दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी जयदीप हा अक्षय खन्नाची जागा घेत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. जयदीपसाठी स्वतंत्र आणि नवीन पात्र लिहिण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

Tejaswini Lonari: थाटात पार पडलं तेजस्विनी -समाधान सरवणकरांच्या लेकाचं बारसं; चार अक्षरी ठेवलं राजेशाही नाव

त्यामुळे ‘धुरंधर’नंतर अक्षय खन्नाची वाढलेली फीस आणि त्यातून ‘दृश्यम 3’मधून त्याचा पत्ता कट झाला, या चर्चांपेक्षा जयदीप अहलावतची भूमिका स्वतंत्र असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे विजय साळगावकरसमोर राजवीर सिंग तोमर कोणतं नवं आव्हान उभं करणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समोर येईल.

Web Title: Drishyam 3 jaideep ahlawat akshaye khanna role truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Ajay Devgn
  • bollywood movies
  • Entertainement News

संबंधित बातम्या

Pooja Sawant: ‘अधीर मन झालं’साठी २ दिवस भिजलेल्या साडीत शूटिंग; पूजा सावंतने सांगितली पडद्यामागची गोष्ट
1

Pooja Sawant: ‘अधीर मन झालं’साठी २ दिवस भिजलेल्या साडीत शूटिंग; पूजा सावंतने सांगितली पडद्यामागची गोष्ट

Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, कलाकार-तंत्रज्ञांच्या सुखासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं!
2

Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, कलाकार-तंत्रज्ञांच्या सुखासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं!

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव
3

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

‘Majha Chhakula Hasya Jatra Frame: ‘माझा छकुला’ मधला तो हमाल आठवतोय का? दुसरा तिसरा कोणी नसून ‘हास्यजत्रा’ फेम ‘हा’ कलाकार
4

‘Majha Chhakula Hasya Jatra Frame: ‘माझा छकुला’ मधला तो हमाल आठवतोय का? दुसरा तिसरा कोणी नसून ‘हास्यजत्रा’ फेम ‘हा’ कलाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.