
Udta Teer Box Office Collection Day 2: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Udata Teer Saturday Collection: आयुषमान खुराना आणि सारा अली खानचा नवा सिनेमा ‘उडता तीर’ रिलीज झाला आहे.
रिलीज झाल्यावर चित्रपटाची सुरुवात थोड्या कमी वेगाने झाली आहे. दुसऱ्या दिवशी मात्र चित्रपटाने मोठी झेप मारली. शनिवारी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष रविवारच्या कलेक्शनकडे लागलं आहे. Udta Teer Box Office Collection Day 2:
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार ‘उडता तीर’ ने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार, 24 ऑक्टोबरला 7.25 कोटी रुपये कमावले. पहिल्या दिवशी शुक्रवारी सिनेमाने फक्त 4.10 कोटी कमावले होते. म्हणजे एका दिवसात कमाईत 76.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही खूप मोठी वाढ आहे. दोन दिवसात सिनेमाने भारतात एकूण 11.35 कोटी रुपये कमावले आहेत. जर ग्रॉस कलेक्शन बघितलं तर दोन दिवसात 13.53 कोटी झाले आहेत. तर जगभरात सिनेमाने 16.28 कोटींचा गल्ला जमवला आहे.
पहिल्या दिवशी लोकांना वाटलं होतं की सिनेमा फसला, पण शनिवारी झालेल्या वाढीने मेकर्सना थोडा दिलासा मिळाला आहे. तोंडी प्रसिद्धीमुळे लोक सिनेमा बघायला जात आहेत असं दिसतंय.
आकाश ए. कौशिकने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हा एक स्पाय-कॉमेडी सिनेमा आहे. याची गोष्ट एकदम वेगळी अनोखी गोष्ट आहे. एका पाकिस्तानी हेराची असतो. त्यावेळी तो एका मिशनवर असताना त्याची बुद्धीमत्ता जाते. त्याला वाटू लागतं की तो भारताचा दहशतवाद विरोधी ऑफिसर आहे. मग पुढे काय गोंधळ होतो, हेच या सिनेमात दाखवलं आहे.
आयुषमान खुराना आणि सारा अली खान या दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. आयुषमानचा कॉमेडी टायमिंग नेहमीच भारी असतो आणि साराने पण चांगलं काम केलं आहे.
यांच्यासोबत राहुल बोस, राम कपूर आणि गुलशन ग्रोव्हर पण आहेत.सिनेमा 23 ऑक्टोबरला रिलीज झाला. सोशल मीडियावर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांना सिनेमा खूप आवडला, तर काहींनी याला वन टाईम वॉच म्हटलं आहे. म्हणजे एकदा बघायला हरकत नाही असा सिनेमा आहे.
खरा खेळ आता रविवारी आहे. शनिवारी चित्रपटाने कमाई चांगली केली, पण रविवारी जर अशीच कमाई झाली तर, सिनेमा सुपरहिट होईल. जर रविवारी 9 ते 10 कोटींचा आकडा पार केला, तर सिनेमा आठवडाभर चांगला चालेल.
रजनीकांतचा ‘जेलर 2’. ‘जेलर 2’ अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शनिवारी ‘जेलर 2’ ने 24.15 कोटी कमावले आहेत. भारतात त्याचं एकूण कलेक्शन 373 कोटी झालं आहे आणि ग्रॉस 436.80 कोटी आहे. जगभरात त्याने 666.30 कोटी कमावले आहेत.
इतक्या मोठ्या सिनेमासमोर ‘उडता तीर’ सारख्या छोट्या सिनेमाला टिकणं खूप कठीण आहे. तरी पण आयुषमानच्या सिनेमाला एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे. ज्यांना कॉमेडी आणि वेगळी गोष्ट आवडते, ते लोक हा सिनेमा नक्की बघतील.सोमवार ते शुक्रवार सिनेमा कसा चालतो, यावरूनच तो हिट आहे की फ्लॉप हे कळेल.