
Madhuri Dixit On Gautami Patil (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सध्या मराठी टिव्हीवर ‘कोण होणार करोडपती’ या शोची चांगलीच चर्चा आहे. केबीसीच्या धर्तीवरचा हा शो लोकांना खूप आवडतोय. यंदा प्रथमच या शोचे सुत्रसंचालन एक महिला करत आहेत. सगळ्यांची लाडकी धकधक गर्ल माधुरी दीक्षित करतेय. आतापर्यंत अनेक मोठे स्टार या शोमध्ये येऊन गेले. आता या शोमध्ये सबसे कातील गौैतमी पाटील येत आहे. त्याचबरोबर तिच्यासोबत बिग बॉस फेम शिव पाटील सुद्धा येणार आहे. हा एपिसोड लवकरच टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. या एपिसोडच्या शूटिंग दरम्यान गौतमीने एका जुन्या वादावर पहिल्यांदाच मनमोकळं भाष्य केलं आहे. Madhuri Dixit On Gautami Patil:
गौतमीचा काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. तिने जाहीर माफी मागितली होती, तरी पण लोक तिला त्याच गोष्टीवरून बोलत होते. आजही काही लोक तिला त्याच व्हिडिओवरून टार्गेट करतात. यावरच तिने या शोमध्ये भाष्य केलं.
गौतमी म्हणाली, “मी त्या प्रोग्रैममध्ये डान्स करायला केली होती. तो संपवून घरी जात असताना माझ्या लक्षात आले की, माझा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. मला कळताच मी लगेच स्पष्टीकरण दिलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागितली.”
ती पुढे म्हणाली की जे काही घडलं ते चुकून घडलं होतं. अनावधानाने झालं होतं. पण तरीही मी त्याची जबाबदारी घेतली. मी चूक मान्य केली. त्यानंतर मी स्वतःमध्ये खूप बदल केले. खूप मेहनत घेतली की पुन्हा अशी चूक होणार नाही.”
“गौतमीला सगळ्यात जास्त खंत याच गोष्टीची आहे की लोक आजही तिला त्याच जुन्या व्हिडिओने ओळखतात. ती म्हणाली, एकदा का एखाद्या माणसाचे कानफाट्या नाव पडले की, ते पुसणं जाणं खूप कठीण जातं.” आज मी चांगलं काम करतेय, माझे शो चांगले होत आहेत, पण लोक अजूनही जुनीच चर्चा करतात. त्यामुळे लोकांना वाटतं मी अजूनही तसंच काम करतेय. पण खरं तर मी खूप बदलले आहे. माझं पूर्ण लक्ष माझ्या कामावर आहे,” असं गौतमी भावुक होऊन म्हणाली.
Gautami Patil: वादग्रस्त गाण्यानंतर गौतमीचा नवा धमाका! सुपरहिट गाण्यावरच्या डान्सने वेधलं लक्ष
ती म्हणाली, “जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की मी चुकीचं काम करतेय, तर एकदा माझा लाइव्ह शो बघायला या. माझं काम बघा. जर त्यात काही चुकीचं दिसलं तर जरूर बोला. पण मला जज करण्याआधी माझं आजचं काम एकदा बघा, एवढीच माझी इच्छा आहे.”गौतमीच्या या बोलण्याने तिथे बसलेले सगळेच शांत झाले.
गौतमीने अजून एक छान गोष्ट सांगितली. ती म्हणाली की आधी तिच्या कार्यक्रमांना फक्त पुरुष प्रेक्षक जास्त यायचे. पण आता चित्र बदललंय. आता तिच्या शोला महिला आणि फॅमिली पण मोठ्या संख्येने येते. हे ऐकून तिला खूप बरं वाटतं.
तिचं हे सगळं ऐकून माधुरी दीक्षितने पण तिला समजून घेतलं. माधुरी म्हणाली, “एखाद्या व्यक्तीने आपली चूक मान्य केली आणि ती सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असेल, तर त्याला सारखं सारखं त्याच गोष्टीवरून बोलणं चुकीचं आहे.” माधुरीने गौतमीला पाठिंबा दिला. गौतमीचा हा एपिसोड आल्यावर नक्कीच लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असं वाटतंय.