Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Emraan Hashmi Accident: शूटिंगदरम्यान क्रेनमधून कार निसटली; इम्रान हाश्मी आत होता? अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Emraan Hashmi Accident: इम्रान हाश्मीच्या ‘गनमास्टर जी९’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान SUV हवेत पलटी होऊन व्हॅनवर आदळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अभिनेता सुरक्षित असल्याची माहिती आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 14, 2026 | 09:24 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Emraan Hashmi Accident: बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरील एका थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटातील धोकादायक अ‍ॅक्शन स्टंटच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याच्या SUVचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. स्टंटसाठी हवेत उचललेली SUV अचानक पलटी होऊन एका व्हॅनवर आदळली. सुदैवाने, या घटनेत इम्रान हाश्मी सुरक्षित असल्याची माहिती आहे. या व्हिडीओमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

इम्रान हाश्मीच्या चित्रपटाच्या सेटवर नेमकं काय घडलं?

इम्रान हाश्मी सध्या त्याच्या आगामी ‘गनमास्टर जी९’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनचं चित्रीकरण सुरू असताना ही घटना घडली. चित्रपटातील एका अ‍ॅक्शन सीक्वेन्ससाठी SUVला क्रेनच्या साहाय्याने हवेत उचलण्यात आलं होतं.

शूटिंग सुरू होताच क्रेनला जोडलेली SUV अचानक हवेत पलटी झाली आणि समोर असलेल्या काळ्या व्हॅनवर जाऊन आदळली. या घटनेमुळे सेटवर उपस्थित असलेल्या टीममध्ये घबराट पसरली. या थरारक प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का

व्हायरल व्हिडीओमध्ये चित्रपटाची टीम, गाड्या आणि कॅमेरे अ‍ॅक्शन सीनच्या शूटिंगसाठी तयार असल्याचं दिसतं. स्टंट सुरू झाल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने हवेत उचललेली SUV अचानक पलटी होते आणि खाली उभ्या असलेल्या व्हॅनला धडकते. हा प्रसंग पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

या घटनेत इम्रान हाश्मी गंभीर जखमी होऊ शकला असता. मात्र, तो सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गाडी पलटी होण्याची घटना चित्रपटातील नियोजित स्टंटचा भाग होती की शूटिंगदरम्यान काही तांत्रिक बिघाड झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांकडूनही या घटनेबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

MTDC Guhagar Film City : कोकणात तयार होणार नवी ‘फिल्म सिटी’! गुहागरच्या पालशेतमध्ये प्रकल्प उभारणार; आशिष शेलार यांचे निर्देश

‘गनमास्टर जी९’मध्ये इम्रानसोबत दिसणार हे कलाकार

‘गनमास्टर जी९’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य दत्त करत आहेत. इम्रान हाश्मीबरोबरच जेनेलिया डिसूझा आणि अपारशक्ती खुराना हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अ‍ॅक्शन, रोमान्स आणि ड्रामा यांचा मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात इम्रान हाश्मी ‘ईश्वर’ नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. आपल्या प्रेमाचा शोध घेण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असलेला हा व्यक्तिरेखा चित्रपटाच्या कथानकाचा महत्त्वाचा भाग आहे. ‘गनमास्टर जी९’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

चित्रपटाच्या सेटवरील या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्टंटच्या सुरक्षिततेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हा नियोजित स्टंट होता की प्रत्यक्षात घडलेली दुर्घटना, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच नेमकं चित्र स्पष्ट होईल.

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड

Web Title: Emraan hashmi accident car slips from crane shooting video viral ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • Car Accident
  • Emraan Hashmi
  • entertainment

संबंधित बातम्या

Marathi Actress: ‘तू सेक्स वर्कर झाली आहेस का?’ वेगळ्या पद्धतीने साडी नेसल्याने अभिनेत्री झाली ट्रोल; सांगितला धक्कादायक अनुभव
1

Marathi Actress: ‘तू सेक्स वर्कर झाली आहेस का?’ वेगळ्या पद्धतीने साडी नेसल्याने अभिनेत्री झाली ट्रोल; सांगितला धक्कादायक अनुभव

Exclusive: ‘आताची स्त्री ही स्वतःसह कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी आहे…’, अनघा ठाकूरचं परखड मत
2

Exclusive: ‘आताची स्त्री ही स्वतःसह कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी आहे…’, अनघा ठाकूरचं परखड मत

Hema Malini: वयाच्या ७७व्या वर्षी हेमा मालिनींचा दुर्गा अवतार! नृत्यातून साकारलं देवीचं रौद्ररूप
3

Hema Malini: वयाच्या ७७व्या वर्षी हेमा मालिनींचा दुर्गा अवतार! नृत्यातून साकारलं देवीचं रौद्ररूप

Ramayana Movie: ‘रामायणम्’मध्ये जटायूची दमदार एंट्री! अनुपम खेर देणार आवाज; नवे पोस्टर प्रदर्शित
4

Ramayana Movie: ‘रामायणम्’मध्ये जटायूची दमदार एंट्री! अनुपम खेर देणार आवाज; नवे पोस्टर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.