Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘आताची स्त्री ही स्वतःसह कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी आहे…’, अनघा ठाकूरचं परखड मत

Exclusive: कलर्स मराठीवरील ‘मोहिनी’ मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अनघा ठाकूरचा अभिनय सर्वांनाच आवडतो आहे. नवराष्ट्रच्या माझ्यातील दुर्गा या सिरीजमध्ये तिने आपली मतं परखडपणे मांडली आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 14, 2026 | 07:49 AM
Exclusive: 'मोहिनी' फेम अनघा ठाकूरने व्यक्त केल्या भावना, माझ्यातील दुर्गा खास मुलाखत

Exclusive: 'मोहिनी' फेम अनघा ठाकूरने व्यक्त केल्या भावना, माझ्यातील दुर्गा खास मुलाखत

Follow Us
Follow Us:

Exclusive: कलर्स मराठीवरील ‘मोहिनी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अनघा ठाकूर ही कमी कालावधीमध्येच प्रेक्षकांच्या आवडीची झाली आहे. गालावर खळी आणि आपला लाघवी अभिनय यामुळे तिची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. ‘माझ्यातील दुर्गा’ या नवराष्ट्रच्या खास सिरीजच्या निमित्ताने आम्ही तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि तिच्या दृष्टीने दुर्गाशक्ती म्हणजे नेमके काय हे जाणून घेतले. 

फायनान्शियल अनालिस्ट म्हणून कामाला सुरूवात केली आणि नंतर अशा क्षेत्रात आलीस जिथे शाश्वती नाही? तर कसा आहे हा प्रवास? यावर अगदी मनमोकळेपणाने हसत अनघा म्हणाली की, ‘नोकरी करत होते तेव्हा FOMO नव्हता. रुपारेल कॉलेजला होते त्यानंतर थिएटर, डान्स त्यामुळे या क्षेत्रात काही करावं असं वाटत होतं. पण कोरोना आला आणि त्यानंतर अचानक सर्व थांबलं. सोशल मीडिया तेव्हा खूप उत्साहात चालू होतं. पण त्यावेळी आपण काहीच करत नाहीये असं वाटत होतं. पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो आणि मग ऑडिशन कशी द्यायची हे सर्व डोक्यात विचार होते. यामुळे आपण काहीही करत नाही असं वाटत होतं हे मात्र नक्की. ५ वर्ष मी नोकरी केली. पण कलाक्षेत्रात काहीच करत नाही याचा नक्कीच त्रास होत होता. 

पण एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की, मी प्रचंड आशावादी आहे. नोकरी करतानाही मी कॉन्टॅक्ट शोधत राहिले. ऑडिशनची माहिती, प्रोफाईलची माहिती घेतली. सोशल मीडियावर जाऊन प्रॉडक्शन हाऊसना डीएम करून खूप प्रयत्न केले. २-३ वर्ष खूप प्रयत्न केले आणि मग जेव्हा ऑडिशन्स दिल्या त्यानंतर मला मोहिनीची भूमिका मिळाली आणि प्रयत्नांना यश आलं.’

Exclusive: ‘RK म्हणजे हिरोपासून माणूस होण्याच्या प्रवासाची गोष्ट’, सांगतोय सर्वांचा लाडका समीर परांजपे

तुझा टर्निंगपॉईंट नेमका काय ठरला आणि स्पर्धा/मैत्री अशा सर्व गोष्टी तू कशा सांभाळल्यास? यावर गोड हसून अनघा म्हणाली की, ‘श्रावणक्वीन ही स्पर्धा हा माझ्या आयुष्याचा टर्निंगपॉईंट होता. १५-२० दिवस हातात हवे होते पण नोकरी करताना या स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन राहणं शक्य नव्हतं. २५ व्या वर्षी काहीही करून भाग घ्यायचा हे ठरवलं आणि चक्क ऑफिसमध्ये सिक लिव्ह टाकून गेले होते. ४०० मुलींच्या ऑडिशनमध्ये १६ मध्ये निवड झाली आणि त्यानंतर रॅम्प वॉक, ४ इंच हिल्स घालून चालणं हे सर्व नवं होतं. 

टॅलेंडेट होत्या सर्व मुली, इनसिक्युरिटीही होती ती मी नाकारणार नाही. स्पर्धा होती तेव्हा ५-६ हिल्स घालून फिजिकली थकवणारं होतं पण एक उर्जा होती आणि मनात जिंकण्याची जिद्द होती, संपूर्ण १०० टक्के माझं योगदान दिलं. शेवटचा प्रश्न होता की, आजची आधुनिक स्त्री नक्की कशी आहे हे तुमच्या शब्दात सांगा आणि स्वतःला रिलेट करून उत्तर दिलं होतं. परिक्षकांना आवडलं आणि मी विजेती झाले होते.’ 

सध्या मोहिनी मालिकेत तलवारबाजी, दांडपट्टा असे थरारक सीन देत आहेस, तर पडद्यावरच्या या दुर्गासाठी स्वतःला कसं तयार केलंस? यावर अनघाने अगदी मनापासून उत्तर दिलं ती म्हणाली की, ‘टफ सिक्वेन्स, फाईट सिक्वेन्स, तलवारबाजी, दांडपट्टा, ढाली खूप वेगळा अनुभव आहे. बेसिक गोष्टीपासून याची मला तयारी करावी लागली. सध्या तर ऑक्टोबर हिटमुळे त्रासही झाला, याचा सराव करताना हाताला खूप लागलं आहे. कष्ट करायची सवय नसते. पण हे सर्व करताना मला खूप मज्जा आली आणि प्रचंड मेहनत घेतली आहे. सकाळी ९.३० ला सुरू करून ३-४ वाजेपर्यंत तेच करत होतो. 

मला फार अभिमान वाटला. अंगावर काटा आला आणि त्यात एनर्जीने सुरु केलं. जिजाऊ, ताराराणी, झाशीची राणी डोळ्यासमोर आले. अशी भूमिका मला खऱ्या आयुष्यात करायला मिळावी आणि ऐतिहासिक स्त्री पात्र मला करायला मिळावं अशी खूप इच्छा आहे.’

तू पण Gen Z आहेस, नाती जपताना स्वतःचा स्वाभिमान सांभाळून आजची दुर्गा कशी आहे असं तुला वाटतं? यावर एका क्षणाचीही उसंत न घेता अनघा म्हणाली की, ‘स्वाभिमान नक्कीच आजची मुलगी जपते. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याला आजची स्त्री नक्कीच महत्त्व देते. पूर्वीच्या महिला स्वतःला मागे ठेऊन नवरा-मुलगा पुढे जाऊ दे असं म्हणणाऱ्या होत्या. पण आताची स्त्री मी स्वतःसकट कुटुंबाला जपणारी आहे असं मला वाटतं आणि यामध्ये काहीही चुकीचं नाही. प्रत्येक मुलीला पुढे जाण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी ही मिळायलाच हवी.’ 

Exclusive: ‘मोहिनी’ मधील महेंद्र आणि माझ्या स्वभावात खूपच साम्य, भूमिका करणं सोपं झालं – शंतनू मोघे

मुलगी ही नेहमीच सुपरवुमन मानली गेली आहे तर तू स्वतःला सर्व गोष्टीत कसं संतुलित ठेवतेस? यावर अनघा म्हणाली की, ‘सुरूवातीला माझी शारीरिक आणि मानसिक खूपच दमछाक झाली. कारण सवयच नव्हती. ८-९ महिन्यापासून मी १२ तास शिफ्ट करतेय. १-२ आठवडे पायातून गोळे यायचे उभं राहून आता ती सवय झाली आहे शारीरिक आणि मानसिक दोन्ही. कामातूनच मी स्वतःला कसं सावरायचं आणि कसं संतुलन ठेवायचं हे शिकत गेले. स्वतःला जपायला वेळच नाही मिळाला सुरूवातीला. ६ महिने कोणतीही सुट्टी नाही घेतली. पण आता सगळं सोपं जातं. मोहिनी कशी आहे कळले आहे त्यामुळे आता स्वतःमधील अनघाला जपायला सुरू केली आहे. आता मला आई-बाबांना वेळ द्यायलाही जमतोय’ असं तिने अगदी मनापासून सांगितलं. 

पुढे ती म्हणाली की, ‘मी सर्व नियोजन करते, योजना आखते. वर्षातून हेल्थ चेक अप हे करायला पाहिजेच. प्लानिंग आणि मॅनेजमेंट हे करायलाच पाहिजे असं मला वाटतं. मोहिनीमध्ये सुद्धा सांगितलं आहे की, आपणच सगळ्या जगाचा भार घेऊन वाहतोय तर असं करून सर्वांनी एकत्र येऊन कामं करावं आणि हे मी मोहिनी या पात्रातूनच शिकतेय.’ 

एक स्त्री आणि दुर्गा म्हणून इंडस्ट्रीत काय बदलावं वाटतं? यावर अगदी साधेपणाने अनघाने सांगितले की, ‘मी अगदीच न्यूकमर आहे. या क्षेत्रात पीएफ, मेडिक्लेम असं काहीच नाहीये. आपण रोज मालिका करतोय तर ही एकप्रकारची नोकरीच झाली असं मला वाटतं. ऑफिसमध्ये सिक्युरिटी असते. पण इथे या इंडस्ट्रीत असं काहीच नाही. बाकीचा विचारही आपल्यालाच करायचा आहे. इंडस्ट्रीत हे असायला हवं अशी इच्छा आहे. कॉर्पोरेट आणि इंडस्ट्रीमधील हा फरक आहे आणि हा बदल व्हायला हवा असं मनापासून वाटतं.’ 

दुर्गेचं ‘शक्ती’ रूप म्हणजे अन्याय सहन न करणे, तुझ्या आयुष्यातील असा कोणता अनुभव सांगावा वाटतो? यावर अनघा म्हणाली की, ‘१५ वर्षांची असल्यापासून मुंबईत एकटी राहतेय. पण कधीतरी असा अनुभव येतोच आयुष्यात. माटुंग्याला राहायला आले होते. यशवंत नाट्यगृहाच्या बाजूलाच बिल्डिंग होती. टीशर्ट ट्रॅकपँट घालूनच खाली बिस्किट आणायला गेले. पण एक माणूस बघत होता, मी तेव्हा लक्ष दिलं नाही. पण अचानक तो माणूस पाठलाग करत आला आणि त्यावेळी मी घाबरले, नशेत असलेल्या त्या माणसाला जोरात ढकललं आणि आरडाओरडा केला. तिथेच त्याला पकडून मारू शकत होते पण तेव्हा सुचलं नाही. त्यामुळे प्रत्येक मुलीने शारीरिक आणि मानसिकरित्या अत्यंत मजबूत असलं पाहिजे. आपल्याला कोणत्याही क्षणी दुर्गेचं रुप घ्यावं लागतंच असं मला वाटतं.’ 

तुझ्या आयुष्यात दुर्गा कोण आहे? यावर पटकन अनघा म्हणाली की, ‘दुर्गा बऱ्याच आहेत पण आईचं नाव घेईन कारण ती प्रचंड आशावादी आहे. ती खूप सकारात्मक आहे आणि तेच तिच्यातून माझ्यात आलंय. कमााच्या बाबतीत हयगय नाही करायची. तिचं कामावरचं प्रेम बघून मला असंच काम करायचं आहे. ती माझ्यासाठी दुर्गा आहे.’ दुर्गा होण्यासाठी काही वेगळं करण्याची गरज नाही. मस्त रहा आणि कायम स्ट्राँग रहा असा चाहत्यांना संदेश देत अनघाने या गप्पांना पूर्णविराम दिला.  

Web Title: Colors marathi mohini fame actress anagha thakur shared thought on navaratri durga and stri shakti exclusive dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 07:49 AM

Topics:  

  • colors marathi
  • entertainment
  • navarashtra special

संबंधित बातम्या

Hema Malini: वयाच्या ७७व्या वर्षी हेमा मालिनींचा दुर्गा अवतार! नृत्यातून साकारलं देवीचं रौद्ररूप
1

Hema Malini: वयाच्या ७७व्या वर्षी हेमा मालिनींचा दुर्गा अवतार! नृत्यातून साकारलं देवीचं रौद्ररूप

Ramayana Movie: ‘रामायणम्’मध्ये जटायूची दमदार एंट्री! अनुपम खेर देणार आवाज; नवे पोस्टर प्रदर्शित
2

Ramayana Movie: ‘रामायणम्’मध्ये जटायूची दमदार एंट्री! अनुपम खेर देणार आवाज; नवे पोस्टर प्रदर्शित

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच
3

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच

Jui Gogri: आईपण, करिअर अन् कुटुंबाची जबाबदारी; मराठी अभिनेत्री जुई गोगरीने सांगितली स्त्रीशक्तीची खरी व्याख्या
4

Jui Gogri: आईपण, करिअर अन् कुटुंबाची जबाबदारी; मराठी अभिनेत्री जुई गोगरीने सांगितली स्त्रीशक्तीची खरी व्याख्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.