Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Actress: ‘तू सेक्स वर्कर झाली आहेस का?’ वेगळ्या पद्धतीने साडी नेसल्याने अभिनेत्री झाली ट्रोल; सांगितला धक्कादायक अनुभव

Marathi Actress: मराठी अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकरला वेगळ्या पद्धतीने साडी नेसल्यामुळे ट्रोल करण्यात आलं. ‘तू सेक्स वर्कर झाली आहेस का?’ अशी टिप्पणी आणि धमक्या मिळाल्याचा खुलासा तिने केला.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 14, 2026 | 08:40 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऊर्मिला निंबाळकरला मिळाल्या जीवे मारण्याच्या धमक्या
  • व्हिडिओ शेअर करत सांगितला अनुभव
  • वेगळ्या पद्दतीने साडी नेसल्याने केलं ट्रोल
Marathi Actress: मराठी अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर ऊर्मिला निंबाळकर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ती स्वतःच्या यूट्यूब चॅनेलवरून दैनंदिन आयुष्य, फॅशन आणि आरोग्याशी संबंधित विविध विषयांवरील व्हिडीओ शेअर करत असते. याशिवाय तिने स्वतःची कंपनीही सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी ऊर्मिलाने ‘पुरुषांवर बोलू काही’ हा लाइव्ह शो सुरू केला. तिच्या या शोला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, याच कार्यक्रमादरम्यान तिने नेसलेल्या साडीवरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इतकंच नव्हे, तर तिला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.

वेगळ्या पद्धतीने साडी नेसल्यामुळे ट्रोलिंग; मिळाल्या धमक्या

ऊर्मिलाने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तिच्यासोबत घडलेला हा प्रकार सांगितला. या व्हिडीओमध्ये तिने शोदरम्यान नेसलेल्या गुलाबी साडीतील काही फोटो दाखवले. या साडीच्या नेसण्याच्या पद्धतीवरून सोशल मीडियावर तिला अश्लील टिप्पण्या आणि धमक्यांना सामोरं जावं लागल्याचं तिने सांगितलं.

याबद्दल बोलताना ऊर्मिला म्हणाली, “ही साडी नेसल्यामुळे आणि अशा पद्धतीने साडी नेसल्यामुळे मला गँगरेप, डोमेस्टिक व्हायोलन्स आणि ‘तुझा मर्डर करू’ अशा थेट धमक्या आल्या आहेत. कमेंट्समध्ये, डीएममध्ये, यूट्यूबवर, इन्स्टाग्रामवर आणि फेसबुकवरही अशा प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे मला ती पोस्ट आणि ते रील अर्काइव्ह करावं लागलं.”

‘भारतीय संस्कृतीत साडी नेसण्याच्या १०० हून अधिक पद्धती’

साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ऊर्मिलाने भारतीय संस्कृतीतील विविधतेचा मुद्दा मांडला. भारतात साडी नेसण्याच्या अनेक पारंपरिक पद्धती असून, प्रत्येक पद्धतीचं स्वतःचं वैशिष्ट्य असल्याचं तिने सांगितलं.

“मला याची गंमत वाटते की भारतीय परंपरेमध्ये आणि संस्कृतीमध्ये साडी नेसण्याच्या १०० हून अधिक वेगवेगळ्या पद्धती आहेत. मधुराई, सीधा पल्लू, कुर्गी, मेखला, पारसी गारा अशा अनेक पद्धती आहेत. फक्त राज्याप्रमाणेच नाही, तर महाराष्ट्रातही वेगवेगळ्या भागांमध्ये साडी नेसण्याच्या पद्धती बदलतात. सहावार, नऊवार अशा पद्धती आहेत. मधल्या काळात धोती स्टाइल, मरमेड अशा फ्युजन पद्धतीही आल्या. हेच तर साडीचं सौंदर्य आहे. तिच्यात इतकं वैविध्य आहे, म्हणून ती सुंदर आहे,” असं ऊर्मिलाने म्हटलं.

MTDC Guhagar Film City : कोकणात तयार होणार नवी ‘फिल्म सिटी’! गुहागरच्या पालशेतमध्ये प्रकल्प उभारणार; आशिष शेलार यांचे निर्देश

बनारसी कोरा सिल्कची साडी नेसण्यामागचं कारण काय?

कार्यक्रमासाठी तिने ही साडी का निवडली, याचं कारणही ऊर्मिलाने स्पष्ट केलं. ही बनारसी कोरा सिल्कची हँडलूम साडी असल्याचं तिने सांगितलं. या साडीचे रंग अतिशय सुंदर दिसतात; मात्र ती पारदर्शक आणि निसरडी असल्यामुळे नेसणं आव्हानात्मक असतं, असंही तिने नमूद केलं.

“या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी प्युअर हँडलूम कोरा सिल्कची बनारसी साडी घेतली होती. या साडीची दोन वैशिष्ट्यं आहेत. ती पारदर्शक असते आणि तिचे रंग अतिशय सुंदर दिसतात. ही साडी खूप सुळसुळीत असते आणि नेसण्यासाठी कठीण असते. ती नेसणं खूप आव्हानात्मक आहे,” असं ऊर्मिलाने सांगितलं.


Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड

‘तू सेक्स वर्कर झाली आहेस का?’ म्हणत महिलेची टिप्पणी

साडी नेसण्याच्या पद्धतीवरून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देताना ऊर्मिलाने एका महिलेने केलेल्या टिप्पणीचाही उल्लेख केला. शरीराचा कोणता भाग दिसतो, यावरून एखाद्या महिलेच्या संस्कारांचं किंवा चारित्र्याचं मूल्यमापन करणाऱ्या मानसिकतेवर तिने प्रश्न उपस्थित केला.

ऊर्मिला म्हणाली, “आपल्या मनामध्ये असतं की आज माझ्या डाव्या बाजूची कंबर दिसली, तर तुम्हाला मी अतिशय सज्जन, संस्कारित आणि संस्कृती टिकवणारी वाटते. पण उजव्या बाजूची कंबर दाखवली, तर ‘माय गॉड!’ एका बाईने तर मला ‘तू सेक्स वर्कर झाली आहेस का आता?’ असंही म्हटलं. मला यावर इतकं हसू येत होतं की काय बोलावं तेच कळत नव्हतं. कारण तिला हे माहितीच नाही की आपल्या भारतीय इतिहासामध्ये साडी नेसण्याच्या असंख्य सुंदर पद्धती आहेत. त्यातलीच ही एक पद्धत आहे.”

ऊर्मिलाने शेअर केलेल्या या अनुभवामुळे सोशल मीडियावरील ट्रोलिंग, महिलांच्या कपड्यांवरून केल्या जाणाऱ्या टिप्पण्या आणि ऑनलाइन धमक्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साडी नेसण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे एखाद्या महिलेला अशा प्रकारच्या धमक्यांना सामोरं जावं लागणं, ही बाब निश्चितच गंभीर आहे.

Web Title: Marathi actress urmila nimbalkar trolled saree style shocking experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress

संबंधित बातम्या

Exclusive: ‘आताची स्त्री ही स्वतःसह कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी आहे…’, अनघा ठाकूरचं परखड मत
1

Exclusive: ‘आताची स्त्री ही स्वतःसह कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी आहे…’, अनघा ठाकूरचं परखड मत

Hema Malini: वयाच्या ७७व्या वर्षी हेमा मालिनींचा दुर्गा अवतार! नृत्यातून साकारलं देवीचं रौद्ररूप
2

Hema Malini: वयाच्या ७७व्या वर्षी हेमा मालिनींचा दुर्गा अवतार! नृत्यातून साकारलं देवीचं रौद्ररूप

Ramayana Movie: ‘रामायणम्’मध्ये जटायूची दमदार एंट्री! अनुपम खेर देणार आवाज; नवे पोस्टर प्रदर्शित
3

Ramayana Movie: ‘रामायणम्’मध्ये जटायूची दमदार एंट्री! अनुपम खेर देणार आवाज; नवे पोस्टर प्रदर्शित

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच
4

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.