Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वाराणसी’मध्ये रामायणातील भव्य युद्धाचा थरार; लेखकाने उलगडले कथानकातील मोठे रहस्य, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

एस. एस. राजामौली यांच्या 'वाराणसी' चित्रपटाबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. चित्रपटाच्या लेखकाने रामायणातील प्रभू राम आणि कुंभकर्ण यांच्यातील भव्य युद्ध तसेच कथानकातील महत्त्वाचे रहस्य उघड केले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 07, 2026 | 10:03 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

एस.एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वाराणसी’ घोषणेपासून सतत चर्चेत आहे. चाहते चित्रपटाशी संबंधित अगदी लहानसहान गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. आता आणखी एक बातमी समोर आली आहे. यानुसार, चित्रपटात प्रभू राम आणि कुंभकर्ण यांच्यातील युद्धाचे दृश्य दाखवण्यात येणार आहे. यापूर्वी, चित्रपटात रामायणाशी संबंधित ३० मिनिटांचा एक प्रसंग असेल असे वृत्त होते.

फिल्मी फोकसने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, राजामौली यांचे वडील आणि चित्रपटाचे लेखक, विजयेंद्र प्रसाद यांनी चित्रपटाबद्दल माहिती दिली. चित्रपटातील ३० मिनिटांच्या दृश्याबद्दल, ते पौराणिक आहे की राजकीय, असे विचारले असता ते म्हणाले, “हे राम आणि कुंभकर्ण यांच्यातील युद्ध आहे. तुम्ही ते ट्रेलरमध्ये पाहिले असेलच, नाही का? तुम्ही राम आणि कुंभकर्ण यांना पाहिले.”

तुम्ही भगवान हनुमानाची शेपटी आणि त्यावरचा रथ पाहिलात. मी त्याचबद्दल बोलत आहे. हे दृश्य सर्वांना मंत्रमुग्ध करेल. चित्रपट टाइम ट्रॅव्हलवर आधारित आहे का आणि ही कल्पना कोणाची होती, असे विचारल्यावर तो म्हणाला, “आपण आता त्याबद्दल अधिक बोलू नये.”

पेड्डी’च्या शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं? जान्हवी कपूर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण, खासगी चॅट व्हायरल

एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘वाराणसी’ या चित्रपटात महेश बाबू रुद्र तसेच प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल बोलताना राजामौली नुकतेच म्हणाले, “पहिल्या दिवशी, जेव्हा महेश प्रभू रामाच्या वेशात फोटोशूटसाठी आला, तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. मी द्विधा मनःस्थितीत होतो.

महेशमध्ये कृष्णाचे आकर्षण आणि रामाची शांती दोन्ही आहेत. तरीही, माझा पूर्ण विश्वास होता. मी तो फोटो माझ्या वॉलपेपरवर लावला आणि नंतर काढून टाकला, जेणेकरून तो कोणाला दिसू नये.” या दृश्याबद्दल राजामौली म्हणाले, “आम्ही हे दृश्य ६० दिवस चित्रित केले.

Jay Jay Swami Samarth : स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून गंगा येणार, गोवर्धनला मिळणार कर्मांची शिक्षा!

प्रत्येक दिवस एक आव्हान होता. प्रत्येक गोष्टीचा नव्याने विचार करून नियोजन करावे लागत होते. सर्व अडचणींवर मात करून आम्ही अखेर हे दृश्य पूर्ण केले. मला विश्वास आहे की हे माझ्या आणि महेशच्या चित्रपटांमधील सर्वात अविस्मरणीय दृश्यांपैकी एक असेल.”

महेश बाबू प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहेत, पण पृथ्वीराज सुकुमारन कुंभकर्णाची भूमिका साकारणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, त्यांच्या पात्राचे नाव कुंभ आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा देखील असून, ती मंदाकिनीची भूमिका साकारणार आहे. ‘वाराणसी’ हा चित्रपट ७ एप्रिल २०२७ रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल

Web Title: Epic ramayana war to unfold in varanasi writer reveals major plot secret fans excitement reaches new heights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • Entertainment News
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!
1

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
2

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच;  चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज
3

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच; चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.