Gela Bapat Kunikade: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
डीजेचा दणदणाट असो, ध्वनिप्रदूषणाचा वाद असो किंवा सोशल मीडियावर चालू असलेले मीम्स… सध्या ‘बापट’ हा विषय चांगलाच गाजतोय! याच चर्चेच्या पार्श्वभूमीवर रंगभूमीवर येतंय एक भन्नाट विनोदी नाटक… ‘गेला बापट कुणीकडे’..’भरत जाधव एंटरटेनमेंट्स’ प्रस्तुत ‘ब्रह्मांडनायक पिक्चर्स’ निर्मित आणि लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचं ‘गेला बापट कुणीकडे’ हे धमाल नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. Gela Bapat Kunikade:
नाटकात मिलिंद फाटक आणि पूर्णिमा तळवळकर यांच्यासह शार्दूल सराफ, गौरी सुखटणकर, पल्लवी कदम, चिंतन लांबे, राम राणे, विजय मिरगे हे कलाकार आपल्या दमदार अभिनयाने रंगभूमीवर धमाल उडवायला तयार होतायत.
तर हा ‘बापट’ कोण? आणि तो गेला कुठे?तर हा बापट कोण? आणि तो गेला कुठे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घेण्यासाठी एका खास पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय.
अभिनेता भरत जाधव, लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे, नाटकाचे निर्माते आणि सगळी कलाकार मंडळी यावेळी हजर राहणार आहेत.पत्रकार परिषद कधी, कुठे?आपणही आवर्जून हजर रहावं ही विनंती!!
दिनांक : सोमवार, 23 नोव्हेंबर
वेळ : सकाळी 10:00 वा.
स्थळ : नवनृत्य स्टुडिओ, झी शान, ई-615, महात्मा गांधी रोड, सनसिटी सिनेमाच्या समोर, विष्णू प्रसाद सोसायटी, विलेपार्ले (पूर्व)कृपया आपली उपस्थिती कळवावी.
सध्या सोशल मीडियावर बापटवरून जे मीम्स व्हायरल होतायत, त्याचाच धागा पकडून हे नाटक बनवलंय असं वाटतंय. डीजे, आवाज, शेजाऱ्यांची भांडणं, पोलिसांची धावपळ… हे सगळं आपण रोज बघतो. तेच सगळं आता स्टेजवर हसवायला येणार आहे. भरत जाधवचं नावच नाटकाला वेगळीच उंची देतं. त्याच्यासोबत मिलिंद फाटक आणि पूर्णिमा तळवळकर सारखे जुने जाणते कलाकार असल्यामुळे नाटकात धमाल येणार हे नक्की.
राजेश देशपांडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही केलंय. त्यामुळे नाटकाची गोष्ट एकाच हातात राहिलीय. हल्ली विनोदी नाटकं कमी झालीत, त्यात हे नाटक प्रेक्षकांना पोट धरून हसवेल अशी अपेक्षा आहे.
बापट नेमका गेला कुठे, तो सापडतो का, त्याच्यामागे कोण लागलंय… हे सगळं बघण्यासाठी नाटक बघावंच लागेल. तोपर्यंत पत्रकार परिषदेत काय खुलासा होतोय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.तुम्हाला पण बापट कोण आहे, हे जाणून घ्यायचंय का? मग 23 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता विलेपार्लेला नक्की पोहोचा.






