Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर वर्षभरानंतर ‘झी मराठी’ने उलगडलं ‘इच्छाधारी नागीण’चं रहस्य; हिंदी मालिकांमधून गाजलेली गौरी साकारणार प्रमुख भूमिका

झी मराठीच्या ‘इच्छाधारी नागीण – सूडाची प्रेमगाथा’ मालिकेतील मुख्य भूमिकेत गौरी शेळगांवकर झळकणार आहे. नव्या प्रोमोमधून तिचा नागीण अवतार समोर आला असून नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 16, 2026 | 09:03 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने मी कात टाकली या मालिकेची घोषणा केली होती. या मालिकेच्या घोषणनेंतर झी मराठीने साधारण वर्षभरापूर्वी घोषणा केलेल्या इच्छाधारी नागीण मालिकेचा मुहूर्त नुकताच पार पडला असून, मालिकेचा नवा प्रोमोही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन्ही मालिकांच्या टीझर्सवरून कथानकात ‘नागीण’ हा समान धागा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या दोन मालिकांबाबत उत्सुकता वाढली आहे.

झी मराठीने सर्वप्रथम नोव्हेंबर २०२४ मध्ये इच्छाधारी नागीण – सूडाची प्रेमगाथा या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये मालिकेचा एक वेगळा आणि रहस्यमय प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, त्यानंतर बराच काळ या मालिकेबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नव्हती.

दरम्यानच्या काळात वाहिनीवर अनेक नव्या मालिका सुरू झाल्याने ‘इच्छाधारी नागीण’ हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात साकार होणार की नाही, अशी शंका अनेक प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. सोशल मीडियावरही मालिकेबाबत विविध चर्चा रंगत होत्या.

अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम देत गेल्याच आठवड्यात मालिकेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. मालिकेच्या सेटवर मुहूर्त पूजा पार पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामुळे ‘इच्छाधारी नागीण’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बहुचर्चित मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री गौरी शेळगांवकर प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून गौरीचा नागीण अवतार प्रथमच प्रेक्षकांसमोर आला.


गौरीने यापूर्वी हिंदी मालिकाविश्वात आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रथाओं की ओढ़े चुनरी: बींदणी आणि सफल होगी तेरी आराधना यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. आता ती एका पूर्णपणे वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे.

साध्या आणि सोज्वळ भूमिकांसाठी ओळखली जाणारी गौरी आता इच्छाधारी नागीणच्या रहस्यमय रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेम, सूड आणि अलौकिक शक्तींनी भरलेल्या या कथेत तिची भूमिका नेमकी कशी असेल, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, गौरीच्या नव्या लूकचे अनेकांनी कौतुक केले आहे. त्यामुळे ‘इच्छाधारी नागीण – सूडाची प्रेमगाथा’ ही मालिका प्रेक्षकांच्या अपेक्षा कितपत पूर्ण करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dishani Chakraborty Engaged: मिथुन चक्रवर्तींच्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे! दिशानी चक्रवर्तीचा साखरपुडा पार; होणारा पती कोण?

“नागलोकाची अद्भूत राणी, रूपाने मोहिनी… लवकरच अवतरणार भूतलावर पूर्ण करण्या तिच्या सूडाची प्रेम कहाणी! इच्छाधारी नागीण – सूडाची प्रेमगाथा” असं कॅप्शन या नव्या प्रोमोला देण्यात आलं आहे. या प्रोमोमधून अभिनेत्री गौरी शेळगांवकरचा नागीण अवतार प्रथमच प्रेक्षकांसमोर आला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

‘Dhamaal 4’चं ‘फुलौरी बिना चटणी’ गाणं रिलीज; अजय देवगण, रितेश देशमुख आणि अरशद वारसींचा भन्नाट अंदाज

दरम्यान, प्रोमोला नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेकांनी गौरीच्या लूकचं कौतुक करत ती इच्छाधारी नागीणच्या भूमिकेसाठी योग्य निवड असल्याचं म्हटलं आहे. तिच्या अभिनयावर विश्वास व्यक्त करत मालिकेबद्दल उत्सुकता वाढल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. मात्र, काही नेटकऱ्यांनी वेगळं मत व्यक्त केलं आहे. नागीणसारख्या दमदार आणि रहस्यमय भूमिकेसाठी गौरीचा लूक तितकासा प्रभावी वाटत नसल्याचं काहींचं मत आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रोमोवरूनच प्रेक्षकांमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत.

आता मालिका प्रत्यक्ष प्रसारित झाल्यानंतर गौरी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात कितपत यशस्वी ठरते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: Finally after a year zee marathi unveils the mystery of ichchadhari nagin popular hindi tv actress gauri to play the lead role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.