Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हास्याचा फुल ऑन डोस! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा धमाकेदार टीझर आऊट, अंकुश, कुशल, अभिजीत अन् संतोषची भन्नाट गँगमस्ती

मैत्री, मस्ती आणि मनोरंजनाचा फुल ऑन डोस घेऊन 'मामाच्या गोव्याला जाऊया' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण यांच्या धमाकेदार भूमिकांनी सजलेल्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 25, 2026 | 02:05 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री, मस्ती आणि भन्नाट मनोरंजनाचा फुल ऑन डोस घेऊन ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याच्या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिका आयोजित ‘बालगंधर्व रंगमंदिर’च्या ५८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत या टीझरचे भव्य अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपटातील कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये रंगलेल्या संवादामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.

याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण आणि प्रवीण तरडे यांच्या सोबत जबरदस्त संवाद रंगला. या चित्रपटाचा टीझर पाहिल्यावर, हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा फुल ऑन राडा असणार अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.

Gautami Patil New Song: लावणीचा तडका अन् आधुनिक अंदाज; गौतमी पाटीलचं ‘लागला ठसका ४४०चा झटका’ नवं गाणं रिलीज

टीझरची सुरुवातच एका भन्नाट आणि नॉस्टॅलजिक गोव्याच्या वाईब्सने होते. यात ‘स्ट्रगलर साला’चे तीन जिगरी मित्र कुशा, बाबा आणि संत्या आणि त्यात नव्याने सहभागी झालेला मामा दिसतोय. मराठीतील मनोरंजनाचे चार हुकमी एक्के म्हणजेच अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण आणि संतोष जुवेकर एकत्र आल्यावर पडद्यावर काय राडा होऊ शकतो, याची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. मित्रांची जुनी मैत्री, गोव्‍याची ट्रिप, त्यात येणारे मजेशीर ट्विस्ट आणि टर्न्स आणि सोबतीला कडक बॅकग्राउंड म्युझिक यामुळे हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले की, हा चित्रपट प्रत्येक मित्रांच्या ग्रुपशी जोडला जाईल. मैत्री, आठवणी, गोंधळ आणि भरपूर हशा यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना दोन तासांची धमाल सफर घडवणार आहे.

 Vaishnavi Kalyankar : “माणसासारखी आकृती दिसली अन्…”, वैष्णवीने रात्री २:३० वाजता केला पती किरण गायकवाडला फोन, म्हणाली…

‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. तर पटकथा आणि संवाद लेखनात राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांची साथ लाभली आहे.मैत्रीचा जल्लोष, गोव्याची मजा आणि मनोरंजनाचा तुफान राडा अनुभवण्यासाठी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट ३१ जुलैपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Full on dose of laughter mamachya govyala jauya teaser out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Ankush Choudhary
  • kushal badrike
  • marathi movie

संबंधित बातम्या

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
1

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
2

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
3

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?
4

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.