Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gana Dhav Re Trailer: केदार शिंदेंच्या ‘गणा धाव रे’चा ट्रेलर प्रदर्शित; बाप्पाच्या कथेने जिंकले मन

Gana Dhav Re Trailer: केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गणा धाव रे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 11, 2026 | 04:33 PM
गणा धाव रे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

गणा धाव रे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Follow Us
Follow Us:
  • केदार शिंदे आणि भरत जाधवचा नवा चित्रपट
  • ‘गणा धाव रे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 
  • गणपती बाप्पाची कथा 
आकाश जायसवाल/ मराठी चित्रपटसृष्टीतील अव्वल आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे नेहमीच प्रेक्षकांसाठी अनोख्या आणि आशयघन कथा घेऊन येतात. गणेशोत्सवाचा डिजिटल उत्साह आणि बाप्पावरील अथांग श्रद्धा यांची सांगड घालत त्यांच्या आगामी ‘गणा धाव रे’ या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. बाप्पाच्या आगमनाची ही कथा केवळ मनोरंजन करणारी नसून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि भावनिक अनुभव देणारी ठरेल, अशी झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा केदार शिंदे आणि भरत जाधव हे एकत्र काम करत असून त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. यासारखी दुसरी पर्वणी नक्कीच काही नाही!

भक्ती, माणुसकी आणि विश्वासाचा अप्रतिम संगम 

‘गणा धाव रे’ हा केवळ एक चित्रपट नसून, गणपती बाप्पा आणि भक्ताच्या नात्यातील एका अनोख्या प्रवासाची कथा आहे. केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेली ही कलाकृती भक्ती, माणुसकी आणि आयुष्यातील संघर्षावर प्रकाश टाकते. बाप्पाच्या साथीने कठीण प्रसंगांवर कशी मात केली जाते, हे अत्यंत संवेदनशीलतेने चित्रपटात मांडण्यात आले आहे. 

Bharat Jadhav:’ही’ भूमिका साकारताना भरत जाधव यांनाही आलं होतं टेन्शन; पहिल्या कोर्टरूम सीनचा सांगितला अनुभव

दिग्ग्ज कलाकारांचा अभिनय आणि दमदार स्टारकास्ट

या चित्रपटात मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांच्यासह अभिनेत्री प्रणाली घोगरे मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यांच्यासोबतच चित्रपटातील इतर सहकलाकारांनीही उत्तम अभिनय सादर केला आहे. भरत जाधव आणि प्रणाली घोगरे यांची जोडी आणि पात्रांमधील भावनिक गांभीर्य प्रेक्षकांना थिएटरमध्ये खिळवून ठेवेल यात शंका नाही. 

भव्य निर्मिती आणि तंत्रज्ञांची साथ

चित्रपटाची निर्मिती सूरज सिंह, सना कुकरेजा, नूतन जैन, रिचर्ड आणि अवनी यांनी केली आहे. चित्रपटाचे उत्कृष्ट संगीत, चित्तवेधक पार्श्वसंगीत आणि विलोभनीय छायांकन यामुळे चित्रपटाच्या भव्यतेत अधिक भर पडली आहे. निर्मात्यांच्या मते, ही कथा प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण करेल. 

२७ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात!

ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गणेशभक्तांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा हा भावनिक प्रवास येत्या २७ नोव्हेंबर २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बाप्पाच्या या सुंदर कलाकृतीचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा!

अभिनेता भरत जाधव दिसणार ‘खलनायकाच्या’ भूमिकेत!

Web Title: Gana dhav re trailer released kedar shinde bharat jadhav duo dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • kedar shinde
  • marathi movie

संबंधित बातम्या

Last Man in Tower: एका व्यक्तीचे अधिकार की संपूर्ण सोसायटीचं हित? ‘लास्ट मॅन इन टॉवर’मधून उलगडणार मानवी संघर्ष
1

Last Man in Tower: एका व्यक्तीचे अधिकार की संपूर्ण सोसायटीचं हित? ‘लास्ट मॅन इन टॉवर’मधून उलगडणार मानवी संघर्ष

Chikeezing Marathi Movie: एका चिमुरड्याचं मोठं स्वप्न, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीची गोष्ट; ‘चिकीझिंग’चा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित
2

Chikeezing Marathi Movie: एका चिमुरड्याचं मोठं स्वप्न, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीची गोष्ट; ‘चिकीझिंग’चा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Aamir Khan: आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंटची मोठी झेप; प्रेक्षकांसाठी आणणार नवा मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्म
3

Aamir Khan: आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंटची मोठी झेप; प्रेक्षकांसाठी आणणार नवा मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्म

Jay Bhanushali Angry: बिग बॉसच्या घरातील वादात मुलीला ओढल्याने जय भानुशाली संतापला; घेतला मोठा निर्णय, पोस्ट व्हायरल
4

Jay Bhanushali Angry: बिग बॉसच्या घरातील वादात मुलीला ओढल्याने जय भानुशाली संतापला; घेतला मोठा निर्णय, पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.