गोविंदाच्या अफेअरवर भडकली पत्नी सुनीता (फोटो सौजन्य - Instagram)
जेव्हा पापाराझींनी गोविंदा आणि कोमलच्या चित्रपटाच्या प्रमोशनबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा सुनीताने नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली की, साधारणपणे चित्रपट तयार झाल्यावर प्रमोशन सुरू होते, पण इथे तर चित्रपट तयार होण्याआधीच ते एकत्र फिरत आहेत. आपला संताप व्यक्त करत सुनीता म्हणाली की, गोविंदा आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरत आहे आणि त्याला याची लाज वाटली पाहिजे. इतकेच नाही तर, सुनीताने कोमलच्या दिसण्यावर टिप्पणी केली आणि गोविंदाला ‘शुगर डॅडी’ म्हणत टोला लगावला. ती म्हणाली की, तिचा ‘शुगर डॅडी’ इतका श्रीमंत असल्याने, त्या मुलीने किमान सभ्य कपडे तरी घालावेत. सुनीता पुढे म्हणाली की, गोविंदाचे डोके पूर्णपणे फिरले आहे.
यापूर्वी, जेव्हा गोविंदा पहिल्यांदा कोमलसोबत दिसला होता, तेव्हा सुनीताने ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ ही म्हण उद्धृत करत म्हटले होते की, गोविंदाचे डोके फिरले आहे. ‘हिरो नं. १’ आता ‘चीटर नं. १’ झाला आहे, असे म्हणणाऱ्या चाहत्यांच्या प्रतिक्रियेबद्दल जेव्हा पापाराझींनी तिला विचारले, तेव्हा सुनीताने सडेतोड उत्तर दिले. गोविंदाच्या अफेअरच्या अफवांवरून तिला पूर्वी ट्रोल करणाऱ्या सर्व चाहत्यांना तिने धारेवर धरले. सुनीताने स्पष्ट केले की, या विषयावर कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तिला आता रस नाही.
सुनीता आहुजा हिने देखील एका जुन्या मुलाखतीत ‘कोमल’ या नावाविषयी आपला तीव्र तिरस्कार व्यक्त केला होता. जेव्हा वाद वाढला, तेव्हा गोविंदाने एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या सह-कलाकाराचा बचाव केला. गोविंदा म्हणाला की, या वादात विनाकारण ओढले जाऊनही कोणाबद्दलही वाईट न बोलल्याबद्दल तो कोमलचा अत्यंत आभारी आहे. गोविंदाच्या मते, कोमल एक शांत आणि संयमी कलाकार आहे, जी अशा वादांमधून रातोरात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत नाही.
तसंच एका मुलाखतीमध्ये सुनीता माझ्यावर कितीही रागवली आणि काहीही बोलवली तरी मी ते अत्यंत शांतपणेच घेतो कारण तिच्या शिव्याही मला ओव्याच वाटतात असंही गोविंदाने सांगितलं आहे. मात्र सुनीता दिवसेंदिवस त्याच्याविरोधात बोलत असल्याने आता चाहत्यांनाही चिंता वाटू लागली आहे.

