Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Box Office: ‘Hanuman Ansh’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! यशच्या ‘Toxic’ला दिली टक्कर, कमावला तब्बल 2600% नफा

Box Office: ‘हनुमान अंश’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत 2600% पेक्षा अधिक नफा कमावल्याचा दावा आहे. यशच्या ‘टॉक्सिक’लाही या कमी बजेटच्या चित्रपटाने टक्कर दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 02, 2026 | 08:20 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई
  • नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित चित्रपट
  • यशच्या ‘टॉक्सिक’ला मिळतेय कडवी टक्कर
Box Office: बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक मोठे चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अभिनेता यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’चीही मोठी चर्चा आहे. मात्र, कोणताही मोठा स्टार नसलेल्या आणि कमी बजेटमध्ये तयार झालेल्या एका आध्यात्मिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित कमाल केली आहे. आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या २६व्या दिवसापर्यंत तब्बल २६०० टक्क्यांहून अधिक नफा कमावल्याचा दावा केला जात आहे.

कमी बजेटचा ‘हनुमान अंश’ ठरतोय सरप्राइज हिट

‘हनुमान अंश’ हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या सुरुवातीला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये फार काळ टिकणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, जसजसे दिवस पुढे गेले, तसतशी चित्रपटाची कमाई वाढत गेली. विशेष म्हणजे, ज्या काळात बहुतांश चित्रपटांची कमाई दिवसेंदिवस कमी होत जाते, त्याच काळात ‘हनुमान अंश’च्या कमाईत सातत्याने वाढ झाल्याचे आकडे सांगतात.

नीम करोली बाबा यांना ‘महाराज-जी’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या जीवनातील दयाळूपणा, सेवा आणि आध्यात्मिक विचारांवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. कोणताही मोठा स्टार नसतानाही प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चर्चेचा विषय ठरला आहे.

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख

२ कोटींच्या बजेटमध्ये ५० कोटींचा टप्पा पार

मिळालेल्या माहितीनुसार, ‘हनुमान अंश’ची निर्मिती अवघ्या २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. मात्र, या चित्रपटाने भारतात ५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. भारतातील निव्वळ कमाई ५४.१३ कोटी रुपये, तर एकूण कमाई ६३.८२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेत ही कमाई पाहता त्याने तब्बल २६ पटींहून अधिक परतावा मिळवल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे २०२६ मधील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘हनुमान अंश’चा समावेश झाल्याची चर्चा आहे.

१६व्या दिवसापासून कमाईला वेग

‘हनुमान अंश’च्या बॉक्स ऑफिस प्रवासातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे त्याची वाढती कमाई. प्रदर्शनाच्या पहिल्या काही दिवसांत चित्रपटाने सुमारे १० लाख, १५ लाख आणि २० लाख रुपयांच्या आसपास कमाई केली होती. मात्र, त्यानंतर चित्रपटाच्या कमाईचा वेग वाढला.

१६व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत तब्बल ६३ टक्क्यांची वाढ झाली आणि त्याने सुमारे ८५ लाख रुपये कमावले. त्यानंतर १७व्या दिवशी ही कमाई थेट २.२० कोटी रुपयांवर पोहोचली. पुढील दिवसांतही चित्रपटाने चांगली कामगिरी कायम ठेवली. २४व्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने १२.७५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे आकडे सांगतात.

२६व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘हनुमान अंश’ने चौथ्या सोमवारी म्हणजेच २५व्या दिवशी ५.५० कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर २६व्या दिवशी म्हणजेच मंगळवारी चित्रपटाने ८.५० कोटी रुपये कमावल्याचे सांगितले जात आहे.

देशभरातील ७,००८ शोमधून ही कमाई झाल्याचे आकडे आहेत. यातील सर्वाधिक शो दिल्ली-एनसीआरमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे.

यशच्या ‘टॉक्सिक’लाही देतोय टक्कर?

‘हनुमान अंश’च्या वाढत्या कमाईमुळे आता त्याची तुलना मोठ्या बजेटच्या चित्रपटांशी केली जात आहे. यशचा ‘टॉक्सिक’ हा मोठ्या अपेक्षांमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट असून, ‘हनुमान अंश’ त्याच्या प्रदर्शनानंतर अवघ्या आठ दिवसांनी प्रदर्शित झाला. त्यामुळे दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कामगिरीची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, इम्रान हाश्मीच्या ‘अवारपन २’च्या कमाईचा वेग आता स्थिरावल्याचेही सांगितले जात आहे.

Lage Raho Munna Bhai: दोन दशकांनंतरही कायम ‘लगे रहो मुन्ना भाई’ची जादू; २०व्या वर्धापनदिनानिमित्त निर्मात्यांची खास पोस्ट

चित्रपटाची कथा नेमकी काय?

‘हनुमान अंश’ची कथा नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित आहे. विशाल चतुर्वेदी यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटाच्या कथेनुसार, एका दुःखी मुलाला आपल्या दिवंगत आईसोबत पुन्हा एकदा जोडले जाण्याची इच्छा असते. पुढे त्याला दैवी शक्तीचा अनुभव येतो आणि प्रेम, अन्नदान तसेच आशीर्वादाच्या माध्यमातून मानवतेची सेवा करण्याचा मार्ग तो स्वीकारतो. पुढे हाच मुलगा ‘हनुमान अंश’ अर्थात नीम करोली बाबा म्हणून ओळखला जातो.

५०००% नफ्यापर्यंत पोहोचणार?

‘हनुमान अंश’ने आतापर्यंत २६०० टक्क्यांहून अधिक नफा कमावल्याचा दावा केला जात आहे. चित्रपटाची कमाई अशीच सुरू राहिली, तर प्रदर्शनाच्या अखेरीस हा नफा ५००० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज चित्रपट तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

मोठ्या बजेटचे आणि स्टारकास्ट असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत असताना, केवळ २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘हनुमान अंश’ने मिळवलेले हे यश निश्चितच लक्षवेधी ठरत आहे.

Web Title: Hanuman ansh box office 2600 percent profit yash toxic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • bollywood movies
  • Box Office
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Nayi Naveli Box Office Collection: यामी गौतमच्या ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी वाढ
1

Nayi Naveli Box Office Collection: यामी गौतमच्या ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी वाढ

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा
2

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतच्या ‘जेलर 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; ‘धुरंधर 2’चा रेकॉर्ड मोडला, ‘ॲनिमल’लाही टाकलं मागे!
3

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतच्या ‘जेलर 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; ‘धुरंधर 2’चा रेकॉर्ड मोडला, ‘ॲनिमल’लाही टाकलं मागे!

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; राम-रावण युद्धाची भव्य झलक पाहून चाहते भारावले
4

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; राम-रावण युद्धाची भव्य झलक पाहून चाहते भारावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.