Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Himanshi Khurana On Asim Riyaz: धर्मांतराच्या वादावरून असीम-हिमांशी आमनेसामने, ‘CCTV, रेकॉर्डिंग’चा उल्लेख करत अभिनेत्रीचा पलटवार

Himanshi Khurana On Asim Riyaz:असीम रियाझच्या आरोपांनंतर हिमांशी खुरानाचा पलटवार; अभिनेत्रीने CCTV फुटेज आणि रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला असून तिची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 25, 2026 | 12:03 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Himanshi Khurana On Asim Riyaz: हिमांशी खुराना आणि असीम रियाझ यांचं जुनं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दोघांच्या नात्यातील वाद आता सोशल मीडियावर उघडपणे समोर येत असून, दोघांकडूनही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अलीकडेच हिमांशीने पारस छाब्राच्या पॉडकास्टवर असीमसोबतच्या नात्याबद्दल भाष्य करत त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर असीमने हे आरोप फेटाळून लावत हिमांशीला प्रत्युत्तर दिलं. आता हिमांशीने पुन्हा एकदा असीमच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.

हिमांशीने असीमवर केले होते गंभीर आरोप

पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये हिमांशी खुरानाने असीमसोबतच्या पूर्वीच्या नात्याबद्दल खुलासा केला. या नात्यात आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचं सांगताना तिने असीमवर विषारी आणि हिंसक वर्तन केल्याचा आरोप केला.

हिमांशीच्या या वक्तव्यानंतर असीम रियाझने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. त्याने हे आरोप फेटाळून लावत हिमांशीला सवाल केला की, जर तो हिंसक होता, तर ब्रेकअपनंतर तिने पुन्हा त्याच्यासोबत पॅच-अप करण्याचा प्रयत्न का केला?

असीमने आपल्या पोस्टमध्ये त्यांच्या चॅट्सचे पुरावे आपल्याकडे असल्याचंही म्हटलं.

“माझ्याकडे CCTV फुटेज आणि रेकॉर्डिंग आहेत”

असीमच्या या वक्तव्यानंतर हिमांशीनेही सोशल मीडियावरून त्याला प्रत्युत्तर दिलं. अभिनेत्रीने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, पुराव्यांचीच चर्चा करायची असेल तर तिच्याकडेही अनेक पुरावे आहेत.

हिमांशीने म्हटलं, “जर आपण पुराव्यांबद्दल बोलणार असू, तर माझ्याकडे CCTV फुटेज आणि रेकॉर्डिंग आहेत. मी ते शेअर करण्यास तयार आहे.”

तिने पुढे दावा केला की, “माझ्या नात्यात मला सहन कराव्या लागलेल्या हिंसेचे सर्व पुरावेही माझ्याकडे आहेत.”

pic.twitter.com/izmeQ142kS — Himanshi khurana (@realhimanshi) August 24, 2026


Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या स्क्रीनिंगला खऱ्या अर्थाने गोंधळ! ३०० सीट्स, ६५० हून अधिक प्रेक्षक; जागा न मिळाल्याने नाराजी

“आतापर्यंत शांत राहिले, पण आता गप्प बसणार नाही”

हिमांशीने यावेळी आपण आतापर्यंत शांत राहिल्याचं सांगत आता मात्र आपल्यावर होत असलेला अपमान सहन करणार नसल्याचं म्हटलं आहे.

अभिनेत्रीने असा आरोपही केला की, अनेक लोकांनी असीमला वाचवण्यासाठी त्याच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता परिस्थिती बदलली असून ती यापुढे गप्प बसणार नसल्याचा इशारा तिने दिला आहे.

‘बिग बॉस १३’मध्ये सुरू झालं होतं नातं

हिमांशी आणि असीम यांच्या नात्याची सुरुवात ‘बिग बॉस १३’च्या काळात झाली होती. शोमध्ये दोघांची जवळीक वाढली आणि त्यांच्या नात्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. शो संपल्यानंतर दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं.

मात्र, कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघे वेगळे झाले. आता अनेक वर्षांनंतर त्यांच्या जुन्या नात्याबाबत दोघांकडून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.

Kangana Ranaut Abhijeet English: १२वी पास कंगना की अमेरिकेतून परतलेला अभिजीत दिपके? कोणाची इंग्रजी भारी? अभिनेत्रीने दिला पुरावा

Web Title: Himanshi khurana asim riyaz conversion controversy cctv recording

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Pehla Pyaar Doosri Baar: नवे चेहरे, नवी प्रेमकहाणी अन् लव रंजन; ‘पहला प्यार दूसरी बार’ची रिलीजआधीच चर्चा
1

Pehla Pyaar Doosri Baar: नवे चेहरे, नवी प्रेमकहाणी अन् लव रंजन; ‘पहला प्यार दूसरी बार’ची रिलीजआधीच चर्चा

Arun Govil Ramayana:  प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर
2

Arun Govil Ramayana: प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ
3

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत
4

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.