Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक खुलासा! लग्नाआधीच समोर आलं बॉयफ्रेंडचं रहस्य, वेगळ्याच मुलीला केलं गरोदर; Lock Upp 2’मध्ये खुलासा

Pamela Serena Lock Upp: 'लॉकअप' शोमध्ये दुबईची मॉडेल पामेला सेरेनाने प्रियकराच्या विश्वासघाताचा धक्कादायक खुलासा केला. गर्भवती प्रेयसीचा फोन आल्यानंतर तिचं लग्न मोडलं, अशी भावनिक कबुली तिने दिली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 29, 2026 | 11:56 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शो ‘लॉकअप’ मध्ये स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील धक्कादायक अनुभव उघड करत आहेत. यावेळी दुबईची मॉडेल आणि सौंदर्यवती पामेला सेरेना हिने तिच्या प्रेमसंबंधात विश्वासघात झाल्याचा खुलासा केला आहे.

पामेलाने सांगितले की, पाच वर्षांपूर्वी ती एका प्रतिष्ठित व्यावसायिकासोबत नात्यात होती. दोघे तब्बल आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता आणि लवकरच ते लग्न करणार होते. मात्र, अचानक तिच्या आयुष्यात असा प्रसंग आला, ज्यामुळे तिची सर्व स्वप्ने एका क्षणात तुटली.

तिने सांगितले की, तिच्या प्रियकराची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी दोघांचेही कुटुंबीय लंडनमध्ये असल्याने रुग्णालयात त्याची काळजी पामेलाच घेत होती. याच काळात तिच्या प्रियकराच्या मोबाईलवर एका तरुणीचा फोन आला.

त्या तरुणीने फोनवर सांगितले, “मी गेली दोन वर्षे त्याच्यासोबत नात्यात आहे आणि मी त्याच्या बाळाची आई होणार आहे.” हे ऐकताच पामेलाच्या पायाखालची जमीनच सरकली. सत्य समोर आल्यानंतर तिने नातं संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रियकराची प्रकृती गंभीर असल्याने ती त्याला त्या अवस्थेत सोडून जाऊ शकली नाही.

Ramayana Trailer Release Date: अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ शुभ ब्रह्ममुहूर्तावर होणार ‘रामायण’चा ट्रेलर रिलीज; तारीख आणि वेळ जाहीर

दीड महिना त्याची सेवा केल्यानंतर तो पूर्णपणे बरा झाला. त्याच दिवशी पामेलाने आपले सामान घेतले आणि कायमचे त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

या घटनेनंतर तिचा प्रेमावरील आणि नात्यांवरील विश्वासच उडाला, असे पामेलाने सांगितले. त्यानंतर आयुष्यात इतर नाती आली, पण ती पुन्हा कधीच कोणावर पूर्ण विश्वास ठेवू शकली नाही, अशी भावनिक कबुली तिने दिली.

Assam Floods: ‘दरवर्षी हे घडतं, तरीही आपण…’; सलमाननंतर आलिया भट्टही आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली; केली खास विनंती

पामेलाचा हा खुलासा ऐकून शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुख यांच्यासह अनेक स्पर्धक भावूक झाले. अभिनेत्री आकांक्षा चमोलाने तिला मिठी मारत धीर दिला. ‘लॉकअप’मधील हा भाग प्रेक्षकांसाठीही अत्यंत भावनिक ठरला असून, आगामी भागात स्पर्धकांच्या आयुष्यातील आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: In lock upp 2 model pamela serena made a shocking revelation about her boyfriends betrayal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Netflix
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
1

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
2

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
3

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
4

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.