Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jahnavi Killekar : “जास्त शहाणपणा करू नकोस, अक्कल नाही का?” छोट्या पुढारीच्या कमेंटवर जान्हवीचा संताप, नेमकं प्रकरण काय?

जान्हवी किल्लेकर आणि ओम यादव यांच्या व्हिडिओवर छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडेने केलेल्या कमेंटवर जान्हवी भडकली असून तो काय म्हणाला, ते जाणून घेऊया.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 08, 2026 | 09:53 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठी सीझन ५ ची माजी स्पर्धक अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बेधडक आणि रोखठोक म्हणून ओळखली जाते. ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सध्या तिचा आणि अभिनेता ओम यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे एक चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

अभिनेता ओम यादवने सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ओम यादव आणि कुटुंबीयांसोबत जान्हवी नुकतीच जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेली होती. यावेळी जान्हवी आणि ओमने एकत्र भंडारा उधळला आणि देवाचं दर्शन घेतलं. हा व्हिडीओ पोस्ट करताना ओम यादवने “जेजुरी दर्शन” असे कॅप्शन दिले होते. त्यावर जान्हवीने “यळकोट यळकोट जय मल्हार” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जाऊ लागले.

बंपर Weekend! ‘तुंबाडची मंजुळा’ची बॉक्स ऑफिसवर मुसंडी; दुसऱ्या दिवशी ओपनिंगपेक्षा जवळपास दुप्पट कमाई

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांसोबत छोट्या पुढारीनंही कमेंट केली आहे. यावर आता जान्हवी किल्लेकर चांगलीच संतापली असून तिने छोट्या पुढारीला तिने चांगलच झापले आहे.व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने, “नक्कीच तुमची छान मैत्री असू शकते… पण जेवढ्या प्रमाणात तुमचे व्हिडिओ येत आहेत त्यावरून लोकांना प्रश्न नक्कीच पडणार ना… बाकी तुमचं जे असेल ते,” अशी कमेंट केली.

दरम्यान, सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे यानेही या चर्चेत उडी घेतली. त्याने कमेंट करत, “ओम दादा हे बरोबर नाही बरं… तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे… मी तुमचा लहान भाऊ आहे त्यामुळे मला काय बोलायचं आहे ते समजलं असेल… पण देवाला आमचा एक निरोप द्या… आम्हालाही एक वहिनी आली पाहिजे आता,” असे मिश्किलपणे म्हटले.

घनश्यामच्या या कमेंटला ओम यादवनेही तितक्याच मजेशीर अंदाजात उत्तर दिले. “नक्कीच घनश्याम. तू लग्न केलंस की मी लगेच करणार लग्न… प्रॉमिस,” असे उत्तर ओमने दिले.

मात्र, ही कमेंट जान्हवीला पसंत पडली नाही. तिने थेट घनश्यामला सुनावत, “जास्त शहाणपणा करू नकोस… लोकांचं ठीक आहे… पण तुलाही अक्कल नाहीये का?” असे स्पष्ट शब्दांत म्हटले.

बंपर Weekend! ‘तुंबाडची मंजुळा’ची बॉक्स ऑफिसवर मुसंडी; दुसऱ्या दिवशी ओपनिंगपेक्षा जवळपास दुप्पट कमाई

जान्हवीच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. काही चाहत्यांनी तिच्या भूमिकेचे समर्थन केले असून, वैयक्तिक आयुष्याबाबत अनावश्यक चर्चा टाळल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी हा संवाद केवळ मित्रांमधील हलका-फुलका विनोद असल्याचे म्हटले आहे.

 

52 व्या वर्षीही अविवाहित असलेल्या गीता कपूर यांचा खुलासा; ‘डान्स करून प्रपोज केलं तर…’

ओम यादव आणि जान्हवी किल्लेकर यांच्यातील वाढती मैत्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असली तरी दोघांनीही याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र चाहत्यांच्या कमेंट्स आणि त्यावर झालेल्या मजेशीर संवादामुळे हा विषय सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

Web Title: Janhavi killekar angry on chota pudhari ghanshyam darode comment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Janhvi Killekar
  • Jejuri Khandoba Temple

संबंधित बातम्या

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
1

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
2

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार
3

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी
4

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.