(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Jennifer Winget Wedding: टीव्ही आणि ओटीटी अभिनेत्री जेनिफर विंगेट पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. जेनिफरने तिचा पती विल्यम इश्माएल याच्यासोबत गोव्यात पुन्हा लग्नगाठ बांधली आहे. याआधी दोघांनी यूकेमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. आता भारतात भारतीय पद्धतीनेही त्यांनी लग्नाचा सोहळा केला. या खास सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जेनिफर आणि विल्यम यांच्या गोव्यातील लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. एका व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. यावेळी त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत असून, दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.
जेनिफरने या खास प्रसंगासाठी व्हाइट गाऊन परिधान केला होता. डीप नेक गाऊनसोबत तिने मोती आणि क्रिस्टल्सने सजवलेला टियारा घातला होता. हातात पांढऱ्या आणि हिरव्या फुलांचा बुके घेत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर अनेक पोझ दिल्या.
जेनिफरसोबत विल्यम इश्माएलचाही लूक चर्चेत आहे. त्याने ऑलिव्ह ग्रीन रंगाचा ब्लेझर, ऑफ-व्हाइट शर्ट आणि लाईट बेज ट्राऊजर असा स्टायलिश लूक केला होता. दोघांची जोडी या वेडिंग सेलिब्रेशनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
View this post on Instagram
जेनिफरच्या आनंदात सेलिब्रिटी मित्रांची हजेरी
जेनिफर आणि विल्यमच्या या खास सोहळ्यात त्यांच्या जवळच्या मित्रपरिवारासह इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, करण वाही, ऐश्वर्या सखूजा, आशीष चौधरी, मंदिरा बेदी आणि मुश्ताक शेख यांसारख्या कलाकारांनी या सेलिब्रेशनला हजेरी लावली.
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जेनिफर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आनंद साजरा करताना दिसत आहे.
आधी यूकेमध्ये केलं होतं ख्रिश्चन पद्धतीने लग्न
जेनिफर विंगेट आणि विल्यम इश्माएल यांनी यापूर्वी यूकेमध्ये ख्रिश्चन पद्धतीने इंटिमेट वेडिंग केलं होतं. आता गोव्यात भारतीय पद्धतीने लग्नाचा सोहळा पार पडल्याने जेनिफरच्या चाहत्यांमध्ये या सेलिब्रेशनची चर्चा रंगली आहे.
याआधी जेनिफरने २०१२ मध्ये अभिनेता करण सिंह ग्रोवर याच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
‘शक: ट्रस्ट नो वन’मध्ये दिसणार जेनिफर
वर्कफ्रंटवर जेनिफर विंगेट लवकरच ‘शक: ट्रस्ट नो वन’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज २४ सप्टेंबर २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. परिणीती चोप्रा, ताहिर राज भसीन, सोनी राजदान, अनूप सोनी, हरलीन सेठी आणि सुमीत व्यास यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Salman Khan Katrina Kaif: कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खानचा संताप; कॅमेऱ्यासमोरच व्यक्त केला राग






