Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govinda-Sunita: गोविंदा-सुनीता वादाच्या चर्चेत सुनेची ‘ती’ पोस्ट! प्रेमावरचा विश्वास डळमळला? एका वाक्याने वाढवल

Govinda-Sunita: अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहूजा यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान कश्मीरा शाहच्या एका सोशल मीडिया पोस्टने नवं गूढ निर्माण केलं आहे. कश्मीरा ही गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकची पत्नी आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 17, 2026 | 06:25 PM
Govinda-Sunita: गोविंदा-सुनीता वादाच्या चर्चेत सुनेची ‘ती’ पोस्ट (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Govinda-Sunita: गोविंदा-सुनीता वादाच्या चर्चेत सुनेची ‘ती’ पोस्ट (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गोविंदा-सुनीता चर्चेदरम्यान कश्मीरा शाहची पोस्ट व्हायरल
  • प्रेम, लग्न आणि विश्वासावर कश्मीराने मांडले विचार
  • पोस्टमध्ये नाव नसल्याने सोशल मीडियावर तर्क-वितर्कांना उधाण
 

Govinda-Sunita Ahuja Controversy: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहूजा यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. दोघांच्या वक्तव्यांमुळे हे प्रकरण वारंवार चर्चेत येत आहे. कधी सुनीता गोविंदाबद्दल बोलताना दिसते, तर कधी अभिनेता स्वतःची बाजू मांडताना दिसतो.

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह हिची एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. कश्मीराने आपल्या पोस्टमध्ये प्रेम, लग्न आणि विश्वास या विषयांवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने कोणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यामुळे तिच्या या पोस्टचा नेमका संबंध कोणाशी आहे, याबाबत सोशल मीडियावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

थोडी नाराजी आणि निराशाही जाणवते..

कश्मीराने इन्स्टाग्रामवर आकाशातील हृदयासारखा दिसणारा ढग असलेला फोटो शेअर केला. मात्र फोटोपेक्षा त्यासोबत लिहिलेला मजकूर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. तिच्या शब्दांत प्रेमाबद्दलची उत्सुकता तर आहेच, पण त्यासोबत थोडी नाराजी आणि निराशाही जाणवते. तिने आपल्या पोस्टमधून असा सवाल केला की खरं प्रेम आजही जगात आहे का? एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराला विशेष वाटावं म्हणून त्याच्यासाठी मनापासून काही करू शकते का? पैसा खर्च करणं, काळजी घेणं आणि समोरच्या व्यक्तीला महत्त्व देणं, हेच प्रेमाचं खरं रूप आहे का, असे प्रश्न तिने मांडले.

दोन्ही गोष्टींचा संबंध जोडण्यास सुरुवात

कश्मीराने पुढे लग्नाची नाती तुटताना आणि लोकांकडून एकमेकांचा विश्वासघात होताना पाहिल्याने प्रेमाबद्दलचा आपला विश्वास काहीसा कमी झाल्याचंही व्यक्त केलं. त्यामुळे तिची ही पोस्ट वाचल्यानंतर अनेकांनी तिच्या मनात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न विचारला.

विशेष म्हणजे कश्मीराची ही पोस्ट अशावेळी समोर आली आहे, जेव्हा गोविंदा आणि सुनीता यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी दोन्ही गोष्टींचा संबंध जोडण्यास सुरुवात केली. मात्र कश्मीराने आपल्या पोस्टमध्ये गोविंदा किंवा सुनीता यांचं नाव कुठेही घेतलेलं नाही. त्यामुळे ही पोस्ट त्यांच्यासाठी होती, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही.

मनोरंजन क्षेत्रात चांगलीच चर्चा

काही काळापासून सुनीता आहूजा यांच्या मुलाखती आणि वक्तव्यांमुळेही गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होत आहे. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी लग्नातील विश्वास आणि नात्यांबद्दल आपली मतं मांडली होती. त्याचवेळी गोविंदाच्या कथित प्रेमसंबंधांबाबतही त्यांनी काही दावे केले होते.

फ्लॉपचा शिक्का OTTवर पुसला! ‘या’ चित्रपटाला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, नंबर 1 वर ट्रेंडिंग

काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सुनीता यांनी गोविंदासोबत काम करणाऱ्या एका तरुण अभिनेत्रीबाबतही टिप्पणी केली होती. त्यांनी अभिनेत्याला त्या अभिनेत्रीचा ‘शुगर डॅडी’ असा उल्लेख केल्याचं समोर आलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनोरंजन क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली.

कोणताही खुलासा केलेला नाही..

यानंतर गोविंदानेही व्हिडीओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली होती. पत्नीच्या काही वक्तव्यांमुळे आपली प्रतिमा खराब होत असल्याचं त्याने म्हटलं होतं. तसेच एखादी अभिनेत्री एखाद्या अभिनेत्यासोबत काम करते किंवा दिसते म्हणून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत, असा अंदाज बांधणं योग्य नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं होतं.

Gunmaster G9: इमरान-जिनिलियाची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर! ‘आवारापन २’नंतर अभिनेत्याचा नवा प्रोजेक्ट चर्चेत

आता कश्मीराच्या पोस्टमुळे या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे. तिच्या मनातील भावना नेमक्या कोणत्या प्रसंगातून आल्या आहेत, याबाबत तिने कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे तिची पोस्ट गोविंदा-सुनीता यांच्या नात्यावर अप्रत्यक्ष भाष्य आहे की तिच्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांशी संबंधित आहे, हे सध्या स्पष्ट नाही. मात्र एका साध्या फोटोसोबत लिहिलेल्या काही ओळींनी सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू केली आहे. प्रेम, लग्न आणि विश्वास याबद्दलचा कश्मीराचा प्रश्न अनेकांना विचार करायला लावणारा ठरला आहे.

Web Title: Kashmera shahs cryptic post sparks speculation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Govinda
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur Sport :व्हीएचएला पुन्हा धक्का; हॉकी मैदानाचा भाडेपट्टा रद्द
1

Nagpur Sport :व्हीएचएला पुन्हा धक्का; हॉकी मैदानाचा भाडेपट्टा रद्द

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
2

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत  ‘युवा निर्धार मेळावा’
3

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत ‘युवा निर्धार मेळावा’

Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश
4

Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.