
फोटो सौजन्य सोशल मीडिया
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ,युक्रेनकडून मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले करण्यात आले . या हल्ल्यांमध्ये रशियाच्या १६ वेगवेगळ्या प्रदेशांना लक्ष करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे . रशियन हवाई संरक्षण दलांनी या ड्रोनचा सामना करत मोठ्या संख्येने ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे . १३३६ ड्रोन पाडल्याची आकडेवारी समोर आल्याने या हल्ल्याची व्याप्ती किती मोठी होती , याचा अंदाज येतो ,मात्र या आकडेवारीची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही .
रशिया युक्रेन युद्धात ड्रोन हे अत्यंत महत्वाचे शस्त्र बनले आहे . सुरवातीच्या काळातच प्रामुख्याने क्षेपणास्त्रे , लढाऊ विमाने आणि जमिनीवरील सैन्याच्या हालचालींवर भर होता . मात्र कालांतराने दोन्ही देशांनी मानवरहित हवाई वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवला आहे .
तुलनेने कमी खर्चात तयार होणारे ड्रोन शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेला आव्हान देऊ शकतात . युक्रेनने रशियाच्या हद्दीत लांब पर्यंत ड्रोन पोहोचवण्याची क्षमता विकसित केल्याचे यापूर्वीही विविध हल्ल्यामधून दिसून आले आहे . त्यामुळे रशियाला आपल्या महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी अधिक तैनात करावी लागत आहेत .
एकाच हल्ल्यात एवढ्या मोठ्या संख्येने ड्रोन पाडल्याचा रशियाचा दावा असला , तरी अशा हल्ल्यांमुळे देशाच्या हवाई संरक्षण व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होतो . अनेक दिशांनी एकाच वेळी येणाऱ्या ड्रोन्सचा मागोवा घेणे आणि त्यांना रोखणे हे संरक्षण दलासाठी आव्हानात्मक असते .
खासकरून राजधानी मोस्कोसह महत्वाच्या लष्करी आणि औद्योगिक परिसरांच्या सुरक्षेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे . या हल्ल्यामुळे युद्धाचे स्वरूप बदलत आहे . असे पुन्हा एकदा अधोरेखित होते . आगामी काळात दोन्ही देशांकडून ड्रोन हल्ल्यांची तीव्रता वाढते का , याकडे आंतराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे .