Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KGF Star Yash : ‘आई-वडिलांसोबत पाहू शकत नाही असा रोमँटिक सीन…’, ‘टॉक्सिक’ वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल

KGF Star Yash : 'टॉक्सिक' चित्रपटासंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता यशचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. या मुलाखतीत यश म्हणताना दिसतो की, "आई-वडिलांसोबत बसून पाहू शकणार नाही असा कोणताही रोमँटिक सीन मी करणार नाही."

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 04, 2026 | 02:02 PM
'आई-वडिलांसोबत पाहू शकत नाही असा रोमँटिक सीन...', 'टॉक्सिक' वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल

'आई-वडिलांसोबत पाहू शकत नाही असा रोमँटिक सीन...', 'टॉक्सिक' वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • ‘टॉक्सिक’ वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल
  • रोमँटिक दृश्ये करण्यास नकार दिला होता
  • कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक
KGF Star Yash Viral Statement News Marathi : चाहते बऱ्याच काळापासून अभिनेता यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते, पण जेव्हा नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हा सर्वजण थक्क झाले. ट्रेलरमध्ये यशची अभिनेत्रींसोबतची काही रोमँटिक दृश्ये आहेत. ‘टॉक्सिक’च्या ट्रेलरला ‘शतकातील सर्वात अश्लील ट्रेलर’ असेही म्हटले गेले आणि त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, यशची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने रोमँटिक दृश्ये करण्यास नकार दिला होता आणि आपल्या कुटुंबाबद्दल एक नियम सांगितला होता.आता याच व्हायरल व्हिडीओ वरुन चाहत्यांनी यश ला घेरले आहेत.

एक काळ असा होता जेव्हा यशने जाहीरपणे सांगितले होते की, तो अशा कोणत्याही दृश्यात काम करणार नाही, जे त्याला आपल्या आई-वडिलांसोबत पाहता येणार नाही. एक दशकानंतर, अनेक चाहत्यांना वाटते की अभिनेत्याने आपले वचन मोडले आहे. ‘KGF’ मुळे पॅन-इंडिया सुपरस्टार बनण्याच्या खूप आधी, यशने ‘गूगली’, ‘गजकेसरी’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस रामचारी’ यांसारख्या हिट चित्रपटांमुळे ‘रॉकिंग स्टार’ ही उपाधी मिळवली होती. तो कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक बनला होता.

Lock Upp: लॉक अप सीझन २ ला मिळाली पहिली Wild Card स्पर्धक, होणार डबल धमाका; ‘भाभीजी’ करणार एंट्री?

यशने रोमँटिक दृश्ये

त्याच वेळी, यशने अभिनेता रमेश अरविंदच्या ‘वीकेंड विथ रमेश’ या टॉक शोमध्ये कबूल केले की, त्याला रोमँटिक दृश्ये करताना खूप अस्वस्थ वाटते. यश म्हणाला, “जेव्हा लोक मला सांगतात की मी रोमँटिक दृश्ये खूप छान करतो, तेव्हा मला आश्चर्य वाटते. अशी दृश्ये करताना मला खूप भीती वाटायची. फक्त राधिकाच नाही, तर जेव्हा मी एखादे रोमँटिक दृश्य करायचो तेव्हा अनेक लोक माझ्यावर हसायचे.” “जर मी एखादे विशिष्ट दृश्य माझ्या आई-वडिलांसोबत एकाच खोलीत बसून पाहू शकत नसेन, तर मी ते करणार नाही. कारण त्यामुळे अनेक प्रेक्षकांना अस्वस्थ वाटू शकते.”

यशने मग त्याच्या पहिल्या रोमँटिक सीनची गोष्ट सांगितली, जो त्याने टेलिव्हिजनवर काम करत असताना शूट केला होता. शने आठवण करून दिली, “माझ्या शोच्या अगदी पहिल्या शॉटमध्ये, मला मुख्य नायिकेची साडी ओढायला सांगितली होती. मी खूप घाबरलो होतो. नायिका येऊन मला प्रोत्साहन देत म्हणायच्या, ‘ठीक आहे, हा फक्त एक सीन आहे.’ मी म्हणायचो, ‘कृपया, मला जाऊ द्या.’

माझ्या शोच्या अगदी पहिल्या शॉटमध्ये, मला मुख्य नायिकेची साडी ओढायला सांगितली होती. मी खूप घाबरलो होतो. नायिका येऊन मला प्रोत्साहन देत म्हणायच्या, ‘ठीक आहे, हा फक्त एक सीन आहे.’ मी म्हणायचो, ‘कृपया, मला जाऊ द्या.’

यशने पुढे स्पष्ट केले, “माझी आई माझ्यावर वैतागायची.” ती म्हणायची, ‘तुला रोमँटिक सीन कसे करायचे हे माहित नाही.’ मग मी हेल्मेट घालून पार्कमध्ये तासनतास बसायचो आणि लोकांच्या रोमँटिक अदा बघायचो. मी माझ्या आईसोबत रोमँटिक सीनचा सरावसुद्धा करायचो, आणि ती मला हाकलून लावायची. अखेरीस, मी ते करायला शिकलो. हेल्मेट घालून पार्कमध्ये तासनतास बसायचो आणि लोकांच्या रोमँटिक अदा बघायचो. मी माझ्या आईसोबत रोमँटिक सीनचा सरावसुद्धा करायचो, आणि ती मला हाकलून लावायची.

२६ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘टॉक्सिक’मधील रोमँटिक सीनमुळे चाहते चकित

आता, यशने ‘टॉक्सिक’मध्ये अनेक रोमँटिक आणि इंटिमेट सीन केले आहेत, ज्यामुळे चाहतेही चकित झाले आहेत. त्यांच्या मते, अभिनेत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ‘टॉक्सिक’चा टीझर पाहिल्यानंतर अनेक युझर्सनी चित्रपटाला ‘टॉक्सिक’ म्हटले आणि ते तो पाहणार नाहीत असेही सांगितले. ‘टॉक्सिक’मध्ये नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया यांच्याही भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. ‘टॉक्सिक’ २६ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होईल.

Frame: ‘फ्रेम’ चित्रपटाचा होणार प्रीमियर! कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा लवकरच ZEE5 मराठीवर

Web Title: Kgf star yash old statement viral amid toxic controversy news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • entertainment
  • movie
  • viral video

संबंधित बातम्या

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार
1

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
2

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग
3

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
4

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.