(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
कियाराने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कियारा आणि सिद्धार्थने एकमेकांच्या हातावर हात ठेवला आहे. त्यांची मुलगी सराया हिनेही या दोघांच्या हातावर आपला इवलासा हात ठेवला आहे. विशेष म्हणजे तिघांच्या हातांवर एका चिमुकल्या बाळाचे इवलेसे पायमोजे दिसत आहेत.
या फोटोमधून कियारा आणि सिद्धार्थने आपल्या कुटुंबात आणखी एका नव्या सदस्याचं आगमन होणार असल्याचा संकेत दिला आहे. फोटो शेअर होताच चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
‘पुन्हा एकदा या सुंदर गिफ्टच्या रूपाने…’
कियारा आणि सिद्धार्थने हा खास फोटो शेअर करत लिहिलं, “पुन्हा एकदा या सुंदर गिफ्टच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद मिळाला आहे. आमचं हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरून गेलं आहे.”
या पोस्टद्वारे दोघांनी आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. कियाराने फोटो शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत या सेलिब्रिटी कपलचं अभिनंदन केलं.Kiara Advani- Sidharth Malhotra
View this post on Instagram
कियारा आणि सिद्धार्थ जुलै २०२५ मध्ये पहिल्यांदा आई-बाबा झाले. त्यांना मुलगी झाली असून त्यांनी तिचं नाव सराया मल्होत्रा ठेवलं. मुलीच्या जन्माची घोषणा या जोडप्याने सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट शेअर करत केली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीला आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद म्हटलं होतं.
आता मुलीच्या जन्मानंतर जवळपास दीड वर्षांनी सिद्धार्थ आणि कियाराने पुन्हा एकदा चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांच्या कुटुंबात लवकरच आणखी एका नव्या सदस्याचं आगमन होणार असल्याने चाहत्यांमध्येही उत्सुकता पाहायला मिळत आहे.






