Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KK Goswami: ‘विकराल और गबराल’चा गबरू आठवतोय? २३ वर्षांनी केके गोस्वामींची पुन्हा चर्चा; आता काय करतात? जाणून घ्या

KK Goswami: ‘विकराल और गबराल’मधील गबरूची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले केके गोस्वामी २३ वर्षांनी पुन्हा चर्चेत आले आहेत. जाणून घ्या त्यांच्याबद्दल आणि सध्याच्या कामाबद्दल.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 30, 2026 | 11:30 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘विकराल और गबराल’चा गबरू अचानक चर्चेत
  • कुकू कोहली यांच्या प्रेयर मीटमध्ये दिसले
  • गोस्वामींची झलक पाहून चाहत्यांना आठवलं बालपण
KK Goswami: एक काळ असा होता, जेव्हा टीव्हीवरच्या हॉरर मालिकांची क्रेझ प्रचंड होती. भुतांच्या गोष्टी, रहस्यमय घटना आणि गूढ शक्तींच्या कथा पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून टीव्हीसमोर बसायचे. ९०च्या दशकाच्या अखेरीस आणि २००० काळात ‘विकराल और गबराल’ या मालिकेने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. मालिकेतील विकराल आणि गबरू ही जोडी आजही अनेकांच्या आठवणीत आहे.

या मालिकेतील गबरूची भूमिका साकारणारे केके गोस्वामी अचानक पुन्हा चर्चेत आले आहेत. अनेक वर्षांपासून टीव्ही आणि चित्रपटांपासून काहीसे दूर असलेल्या केके गोस्वामी यांची नुकतीच एका कार्यक्रमात झलक पाहायला मिळाली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला.

Salman Khan: ‘सलमानने मला शिवी दिली अन्…’,दिग्दर्शकाने सांगितला पार्टीतील धक्कादायक किस्सा, सलीम खान यांनी असा सोडवला वाद

कुकू कोहली यांच्या प्रेयर मीटमध्ये दिसले

दिवंगत दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या प्रेयर मीटला बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात केके गोस्वामीही उपस्थित होते.

केके गोस्वामींचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यांना लगेच ओळखलं. अनेकांनी त्यांच्या जुन्या भूमिका आठवत आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, अनेकांसाठी केके गोस्वामी म्हणजे आजही ‘विकराल और गबराल’मधील गबरूच आहेत.

‘माझ्या बालपणीचा गबराल…’

केके गोस्वामींचा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका चाहत्याने कमेंट करत “माझ्या बालपणीचा गबराल, तो बेस्ट शो होता,” असं म्हटलं. दुसऱ्या एका यूजरने “हे तर ‘विकराल और गबराल’चे गबरू आहेत, इतक्या वर्षांनी दिसले,” अशी प्रतिक्रिया दिली.

काही चाहत्यांनी ‘हातिम’ आणि ‘श्श्श्श… फिर कोई है’ या मालिकांमधील त्यांच्या भूमिका आठवल्या. तर काहींनी केके गोस्वामी यांनी पुन्हा अभिनयाच्या पडद्यावर परतावं, अशी इच्छा व्यक्त केली.

३ फूट ९ इंच उंचीमुळे मिळाले टोमणे

केके गोस्वामी यांचा जन्म ३ सप्टेंबर १९७३ रोजी बिहारमधील मुजफ्फरपूर येथे झाला. त्यांचं पूर्ण नाव कृष्णकांत गोस्वामी आहे. त्यांच्या उंचीमुळेही ते कायम चर्चेत राहिले. त्यांची उंची सुमारे ३ फूट ९ इंच आहे.

अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या काळात कमी उंचीमुळे त्यांना अनेक टोमणे ऐकावे लागले. मात्र, या गोष्टींमुळे त्यांनी हार मानली नाही. अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि टीव्हीवरील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत स्थान मिळवलं.

Akshaya Gurav Divorce: ८ वर्षांचं नातं संपलं! ‘आई कुठे काय करते’ फेम अक्षया गुरवचा घटस्फोट; घटस्फोटावर पहिल्यांदाच केलं भाष्य

‘विकराल और गबराल’नंतर अनेक मालिकांमध्ये काम

२००३ मध्ये आलेल्या ‘विकराल और गबराल’ या मालिकेने केके गोस्वामींना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. यानंतर त्यांनी ‘हातिम’, ‘श्श्श्श… फिर कोई है’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलं.

केके गोस्वामी शेवटचे २०१७ मध्ये ‘त्रिदेवियां’ या मालिकेत दिसले होते. सध्या ते सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

केके गोस्वामींची नुकतीच झालेली झलक पाहून चाहत्यांना त्यांच्या आवडत्या ‘गबरू’ची पुन्हा आठवण झाली आहे. त्यामुळे आता त्यांना पुन्हा छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार का, याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.

Web Title: Kk goswami vikraal aur gabraal gabru now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Actor
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Chhota Bheem आता रंगमंचावर! मुंबईत 17 ऑक्टोबरला रंगणार पहिला भव्य म्युझिकल शो
1

Chhota Bheem आता रंगमंचावर! मुंबईत 17 ऑक्टोबरला रंगणार पहिला भव्य म्युझिकल शो

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
2

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
3

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
4

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.