Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhota Bheem आता रंगमंचावर! मुंबईत 17 ऑक्टोबरला रंगणार पहिला भव्य म्युझिकल शो

Chhota Bheem : ग्रीन गोल्ड ॲनिमेशन आणि नीमट्री एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या 'छोटा भीम : द म्युझिकल' या भव्य संगीतनाट्याचा प्रयोग १७ ऑक्टोबर रोजी मुंबईतील नेहरू सेंटर सभागृहात होणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 14, 2026 | 06:03 PM
Chota Bheem आता रंगमंचावर! मुंबईत 17 ऑक्टोबरला रंगणार पहिला भव्य म्युझिकल शो

Chota Bheem आता रंगमंचावर! मुंबईत 17 ऑक्टोबरला रंगणार पहिला भव्य म्युझिकल शो

Follow Us
Follow Us:
  • 17 ऑक्टोबरला मुंबईत प्रयोग
  • 30 कलाकारांचा सहभाग, आकर्षक वेशभूषा, एलईडी दृश्यरचना
  • तिकिटे BookMyShow वर उपलब्ध 
 

लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेले Chhota Bheem हे ॲनिमेटेड पात्र आता थेट रंगमंचावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ग्रीन गोल्ड ॲनिमेशन आणि नीमट्री एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या ‘छोटा भीम : द म्युझिकल’ या भव्य संगीतनाट्याचा प्रयोग १७ ऑक्टोबर रोजी मुंबईतील नेहरू सेंटर सभागृहात होणार आहे. गेल्या आठवड्यात सादर झालेल्या तीन प्रयोगांना मुलांसह पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबईतील प्रयोगाची घोषणा करण्यात आली आहे.

भीम आणि मित्रांची रंगमंचावर साहसी मोहीम

या संगीतनाट्यात ढोलकपूरमधील भीम आणि त्याच्या मित्रांची रोमांचक मोहीम साकारण्यात आली आहे. राजकुमारी इंदुमतीला ‘थुंडाझॉर्क’ च्या तावडीतून मुक्त करण्यासाठी भीम आणि त्याचे मित्र जादुई जंगले, पाण्याखालील राज्ये, जादुई बेटे, वाळवंटे आणि बर्फाच्छादित पर्वत असा साहसी प्रवास करतात. या प्रवासातील थरारक प्रसंग, आकर्षक पात्रे आणि नेत्रदीपक दृश्यरचना हे या संगीतनाट्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

Udta Teer Trailer: कॉमेडी, अ‍ॅक्शन अन् देशभक्तीचा तडका! आयुष्मान खुरानाच्या ‘उडता तीर’चा दुसरा ट्रेलर रिलीज

30 कलाकारांसह भव्य निर्मिती

‘छोटा भीम : द म्युझिकल’ या निर्मितीमध्ये 30 कलाकार, 12 जणांचा रंगमंचामागील चमू आणि सहा तांत्रिक कर्मचारी सहभागी आहेत. भूमी नाथवाणी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली असून, अमात्य गोराडिया यांनी दिग्दर्शन केले आहे. श्रुती शर्मा यांनी सर्जनशील प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

प्रेक्षकांना कथानकातील विविध ठिकाणांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी आकर्षक वेशभूषा, एलईडीच्या माध्यमातून साकारलेली दृश्ये आणि कल्पक प्रकाशयोजनेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबासाठी हा एक वेगळा मनोरंजक अनुभव ठरण्याची अपेक्षा आहे.

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ

छोटा भीम कुटुंबांचा अविभाज्य भाग

ग्रीन गोल्ड ॲनिमेशनचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चिलाका म्हणाले, एखाद्या लोकप्रिय पात्राची खरी ताकद त्याच्या मूळ माध्यमापलीकडे जाऊन प्रेक्षकांशी जोडले जाण्यात असते. छोटा भीमचा प्रवास एका ॲनिमेटेड पात्रापासून सुरू झाला; मात्र आज तो लाखो मुले आणि त्यांच्या कुटुंबांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

‘छोटा भीम : द म्युझिकल’ चा प्रयोग 17 ऑक्टोबर रोजी मुंबईतील नेहरू सेंटर सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाची तिकिटे BookMyShow या ऑनलाइन तिकीटविक्री मंचावर उपलब्ध आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: छोटा भीम : द म्युझिकलचा प्रयोग मुंबईत कधी होणार आहे?

    Ans: या संगीतनाट्याचा प्रयोग १७ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.

  • Que: छोटा भीम : द म्युझिकलची निर्मिती कोणी केली आहे?

    Ans: ग्रीन गोल्ड ॲनिमेशन आणि नीमट्री एंटरटेनमेंट यांनी संयुक्तपणे या संगीतनाट्याची निर्मिती केली आहे.

  • Que: छोटा भीमच्या म्युझिकल शोची तिकिटे कुठे मिळतील?

    Ans: तिकिटे BookMyShow या ऑनलाइन तिकीटविक्री मंचावर उपलब्ध असल्याचे आयोजकांनी दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.

Web Title: Chhota bheem the musical mumbai nehru centre october 17 2026 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • Actor
  • Family Drama
  • Indian Music

संबंधित बातम्या

Entrepreneur Ajay Bijli : कॉर्पोरेट विश्वातील बड्या उद्योजकाची आता संगीतात धडक! अजय बिजलींचा ‘हे मां’ भक्ती अल्बम लाँच
1

Entrepreneur Ajay Bijli : कॉर्पोरेट विश्वातील बड्या उद्योजकाची आता संगीतात धडक! अजय बिजलींचा ‘हे मां’ भक्ती अल्बम लाँच

दर्शनच्या अडचणी वाढल्या? Ranukaswami Murder Case प्रकरणी साक्षीदारबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
2

दर्शनच्या अडचणी वाढल्या? Ranukaswami Murder Case प्रकरणी साक्षीदारबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

Nana Patekar Death : अखेरचा अलविदा! निधनानंतर २०२६ मधील ‘हे’ ठरले नाना पाटेकर यांचे शेवटचे चित्रपट
3

Nana Patekar Death : अखेरचा अलविदा! निधनानंतर २०२६ मधील ‘हे’ ठरले नाना पाटेकर यांचे शेवटचे चित्रपट

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या पत्नी कोण आहेत? घटस्फोट न घेता ३५ वर्षे का राहतात वेगळे? अभिनेत्याने स्वतःच सांगितले होते कारण
4

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या पत्नी कोण आहेत? घटस्फोट न घेता ३५ वर्षे का राहतात वेगळे? अभिनेत्याने स्वतःच सांगितले होते कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.