
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
१. पहिला चित्रपट ठरला फ्लॉप
कतरिनाने २००३ मध्ये ‘बूम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर तिने मेहनतीच्या जोरावर ‘नमस्ते लंडन’, ‘वेलकम’, ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’सारखे सुपरहिट चित्रपट दिले.
२. कतरिनाचं खरं नाव वेगळं आहे
अनेकांना माहिती नाही की कतरिनाचं पूर्ण नाव कतरिना टरकॉट आहे. बॉलिवूडमध्ये येताना भारतीय प्रेक्षकांना सहज लक्षात राहावं म्हणून तिने ‘कतरिना कैफ’ हे नाव स्वीकारलं.
३. सहा बहिणी आणि एक भाऊ
कतरिना मोठ्या कुटुंबातून आली आहे. तिला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे. तिची बहीण इसाबेल कैफ हिनेही बॉलिवूडमध्ये अभिनय केला आहे.
४. अनेक देशांमध्ये गेलं बालपण
कतरिनाच्या आईचं समाजकार्यामुळे कुटुंबाला सतत वेगवेगळ्या देशांत राहावं लागलं. त्यामुळे तिने हाँगकाँग, जपान, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इंग्लंडसह अनेक देशांमध्ये बालपण घालवलं. तिचं शिक्षणही प्रामुख्याने घरूनच झालं.
५. १४ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात
वयाच्या १४ व्या वर्षी हवाई येथे तिने एक सौंदर्य स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या आणि याच माध्यमातून ती बॉलिवूडपर्यंत पोहोचली.
६. ‘के ब्यूटी’ची यशस्वी उद्योजिका
२०१९ मध्ये कतरिनाने ‘के ब्यूटी’ हा ब्यूटी ब्रँड सुरू केला. भारतीय त्वचेचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या ब्रँडची लोकप्रियता मोठी आहे. २०२५ मध्ये या ब्रँडचा महसूल सुमारे १३२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जातं.
७. फिटनेसला देते प्राधान्य
कतरिना तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. स्ट्रेंथ ट्रेनिंग, पिलेट्स, कार्डिओ, योग आणि स्ट्रेचिंगचा तिच्या दैनंदिन व्यायामात समावेश असतो. तिचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
९ डिसेंबर २०२१ रोजी कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवाडा येथे अतिशय खासगी समारंभात लग्नगाठ बांधली. त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात एका पुरस्कार सोहळ्यातील मजेशीर संवादातून झाली होती. त्यानंतर दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं आणि अखेर विवाह केला. आणि २०२५ मध्ये त्यांच्या आयुष्यात वियान नावाच्या मुलाचे आगमन झाले.