Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Koffee With Karan 9 Finale: ‘कॉफी विथ करण ९’च्या फिनालेमध्ये मोठं सरप्राइज! शाहरुख खानसह करण जोहरची जुळी मुलंही झळकणार

Koffee With Karan 9 Finale: ‘कॉफी विथ करण ९’च्या ग्रँड फिनालेमध्ये शाहरुख खान आणि सुहाना खान दिसणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर करण जोहरची जुळी मुलं रुही आणि यश यांचंही शोमध्ये पदार्पण होणार असल्याचं वृत्त आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 17, 2026 | 08:41 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Koffee With Karan 9 Finale: दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर सध्या त्याच्या लोकप्रिय ‘कॉफी विथ करण ९’ या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत त्यांच्या आयुष्यातील मजेशीर किस्से, वैयक्तिक अनुभव आणि अनेक गुपितांचा खुलासा करताना दिसतात. आता या शोच्या आगामी एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच शोच्या ग्रँड फिनालेबाबतही एक खास बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान या फिनालेमध्ये हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.

‘कॉफी विथ करण ९’च्या फिनालेमध्ये शाहरुख खान दिसणार?

‘व्हरायटी इंडिया’च्या वृत्तानुसार, शाहरुख खान ‘कॉफी विथ करण ९’च्या अंतिम भागात काही काळासाठी दिसणार आहे. सध्या शाहरुख त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने त्याच्याकडे जास्त वेळ उपलब्ध नव्हता. त्यामुळे तो या एपिसोडमध्ये थोड्या वेळासाठी सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खानदेखील या शोचा भाग असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

करण जोहरच्या जुळ्या मुलांचंही होणार पदार्पण?

या फिनालेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे करण जोहरची जुळी मुलं रुही आणि यश यांचं शोमधून पदार्पण होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भागात करण आपल्या मुलांसोबत काही खास क्षण शेअर करताना दिसू शकतो. मात्र, या एपिसोडबाबत निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Sankarshan Karhade: अशोक सराफांचा ‘तो’ किस्सा ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही! सांगताना मात्र संकर्षणच्या डोळ्यांत पाणी

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी रंगवला होता शो

दरम्यान, ‘कॉफी विथ करण ९’च्या अलीकडील भागात करीना कपूर आणि सैफ अली खान पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या दोघांनीही शोदरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. त्यांच्या गप्पांचा चाहत्यांनीही आनंद घेतला.

सध्या शाहरुख खान, सुहाना खान आणि करण जोहरची मुलं या शोच्या फिनालेमध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अंतिम भागाचा प्रोमो अद्याप प्रदर्शित झालेला नाही. तसेच शाहरुख खान किंवा करण जोहर यांनीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

 

Adinath Kothare: ‘रामायण’मधील भरत मिलाप सीनआधी नेमकं काय घडलं? आदिनाथने सांगितला पडद्यामागचा किस्सा

Web Title: Koffee with karan 9 finale shah rukh khan karan johar twins entry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • entertainment
  • karan johar
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Mrudgandh Award 2026: लोककलेचा वारसा जपणाऱ्या कलावंतांचा गौरव! ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’साठी ‘या’ मान्यवरांची निवड
1

Mrudgandh Award 2026: लोककलेचा वारसा जपणाऱ्या कलावंतांचा गौरव! ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’साठी ‘या’ मान्यवरांची निवड

Panchayat Season 5: १ कोटी झेंडूंचा हार घाला, मगच रिलीज डेट सांगणार! बनराकसने प्राइम व्हिडिओसमोर ठेवली भन्नाट अट
2

Panchayat Season 5: १ कोटी झेंडूंचा हार घाला, मगच रिलीज डेट सांगणार! बनराकसने प्राइम व्हिडिओसमोर ठेवली भन्नाट अट

Actress Nimmi: जुहूमध्ये दोन आलिशान फ्लॅट, कोट्यवधींची FD अन् सोन्या-चांदीचे दागिने! अभिनेत्रीच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद सुरू
3

Actress Nimmi: जुहूमध्ये दोन आलिशान फ्लॅट, कोट्यवधींची FD अन् सोन्या-चांदीचे दागिने! अभिनेत्रीच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद सुरू

Suraj Chavan Daughter Name: सूरज चव्हाणच्या लेकीच्या नामकरणाची जोरदार चर्चा! ठेवलं अनोखं नाव, जाणून घ्या या नावाचा सुंदर अर्थ
4

Suraj Chavan Daughter Name: सूरज चव्हाणच्या लेकीच्या नामकरणाची जोरदार चर्चा! ठेवलं अनोखं नाव, जाणून घ्या या नावाचा सुंदर अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.