Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krishna Shroff: महिला सक्षमीकरणाची सुरुवात सामर्थ्यापासून! कृष्णा श्रॉफने मुलींना सांगितला कॉम्बॅट स्पोर्ट्सचा मंत्र

Krishna Shroff: महिला सक्षमीकरणासाठी मुलींना लहान वयातच कॉम्बॅट स्पोर्ट्स शिकवण्याचा सल्ला कृष्णा श्रॉफने दिला. आत्मविश्वास, शिस्त आणि मानसिक ताकदीबद्दल तिने सांगितलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 12, 2026 | 02:30 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Krishna Shroff: महिलांच्या सुरक्षिततेचा विषय समोर आला की अनेकदा संरक्षणाच्या उपाययोजनांवर चर्चा केली जाते. मात्र, महिलांना केवळ सुरक्षित कसं राहायचं हे शिकवण्याऐवजी स्वतःमध्ये सामर्थ्य आणि आत्मविश्वास कसा निर्माण करायचा, यावरही भर दिला पाहिजे, असं फिटनेस उद्योजिका आणि MMA Matrixच्या सह-संस्थापक कृष्णा श्रॉफ हिचं मत आहे.

अलिकडच्या काळात भारतातील महिलांमध्ये कॉम्बॅट स्पोर्ट्स आणि फिटनेसविषयीची आवड वाढताना दिसत आहे. बॉक्सिंग, मिक्स्ड मार्शल आर्ट्स आणि ब्राझिलियन जिउ-जित्सूसारख्या खेळांकडे महिला मोठ्या प्रमाणात वळत आहेत. या माध्यमातून केवळ शारीरिक ताकदच नव्हे, तर आत्मविश्वास, शिस्त आणि मानसिक लवचिकताही विकसित होत असल्याचं पाहायला मिळतं.

‘महिलांना केवळ कसं जगायचं हे शिकवणं थांबवलं पाहिजे’

MMA Matrixच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून कॉम्बॅट स्पोर्ट्सला प्रोत्साहन देणाऱ्या कृष्णा श्रॉफच्या मते, महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामर्थ्य हा महत्त्वाचा पाया आहे.

कृष्णा म्हणते, “आपण महिलांना केवळ कसं जगायचं हे शिकवणं थांबवलं पाहिजे. त्यांना स्वतःला सामर्थ्यवान कसं वाटेल हे शिकवलं पाहिजे. सामर्थ्य म्हणजे केवळ कठीण परिस्थितीत स्वतःचं संरक्षण करणं नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी आत्मविश्वासाने वावरणं.”

तिच्या मते, स्वतःमध्ये सामर्थ्य असल्याची जाणीव महिलांना अनेक परिस्थितींमध्ये अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास मदत करू शकते.

Sai Godbole: अभिनेत्री किशोरी गोडबोलेंच्या लेकीची कमाल! सई गोडबोले बनली इंटरनॅशनल ब्रँडचा नवा चेहरा, आईचा आनंद गगनात मावेना

लहान वयातच कॉम्बॅट स्पोर्ट्सची ओळख व्हावी

तरुण मुलींना लहान वयातच कॉम्बॅट स्पोर्ट्सची ओळख करून दिल्यास त्याचे अनेक फायदे होऊ शकतात, असं कृष्णाचं मत आहे. मार्शल आर्ट्समधून विकसित होणारी शिस्त, एकाग्रता आणि मानसिक लवचिकता मुलींना दैनंदिन आयुष्यातही उपयोगी पडू शकते.

शिक्षण असो, करिअर असो किंवा वैयक्तिक नातेसंबंध, स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि आव्हानांचा सामना करण्याची मानसिकता या प्रशिक्षणातून विकसित होऊ शकते.

महिलांच्या सक्षमीकरणाला नवा दृष्टिकोन

देशभरात महिला सक्षमीकरणावर चर्चा होत असताना मुलींना स्वतःचं सामर्थ्य कोणताही संकोच न बाळगता स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं कृष्णा श्रॉफ सांगते.

महिलांना प्रत्येक परिस्थितीत स्वतःचं संरक्षण कसं करायचं, यासोबतच स्वतःवर विश्वास ठेवणं, आत्मविश्वासाने वावरणं आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होणं याबाबतही शिकवलं गेलं पाहिजे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाची सुरुवात केवळ सुरक्षिततेपासून नव्हे, तर सामर्थ्य आणि आत्मविश्वासापासून व्हावी, असा कृष्णाचा संदेश आहे.

Madhuri Dixit : माधुरी झाली ‘कोण होणार करोडपती’ची होस्ट; पोस्टर पाहताच पती श्रीराम नेनेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

Web Title: Krishna shroff explains the benefits of teaching combat sports to girls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Jackie Shroff

संबंधित बातम्या

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं
1

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं

Divya Vinekar Death: मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी! ‘डार्लिंग्स’ फेम अभिनेत्रीचे ४० व्या वर्षी निधन
2

Divya Vinekar Death: मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी! ‘डार्लिंग्स’ फेम अभिनेत्रीचे ४० व्या वर्षी निधन

Isha Koppikar: नवरात्रीत अभिनेत्रीने जपली अनोखी परंपरा; तृतीयपंथींना घरी बोलावून केली अर्धनारीश्वराची पूजा, VIDEO व्हायरल!
3

Isha Koppikar: नवरात्रीत अभिनेत्रीने जपली अनोखी परंपरा; तृतीयपंथींना घरी बोलावून केली अर्धनारीश्वराची पूजा, VIDEO व्हायरल!

Tiger Shroff Attack: मुलगा टायगरवरील हल्ल्यानंतर जॅकी श्रॉफ यांची पहिली प्रतिक्रिया; प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची अपडेट
4

Tiger Shroff Attack: मुलगा टायगरवरील हल्ल्यानंतर जॅकी श्रॉफ यांची पहिली प्रतिक्रिया; प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.