Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lara dutta : ‘रामायण’च्या ट्रेलरमधील लारा दत्ताच्या लूकवरून सोशल मीडियावर वाद; नेटकऱ्यांनी का केलं ट्रोल?

'रामायण'च्या ट्रेलरमधील कैकेयीच्या भूमिकेत दिसलेल्या लारा दत्ताच्या लूकवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. तिच्या वेशभूषेवर नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित करत ट्रोलिंग सुरू केलं. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 31, 2026 | 02:46 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Lara dutta: निर्माते नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण: पार्ट १’ चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतानाच त्यातील काही गोष्टींवर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. विशेषतः कैकेयीची भूमिका साकारणाऱ्या लारा दत्ता हिच्या पेहरावावर अनेक नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

ट्रेलरमध्ये लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत खड्यांची नक्षी असलेली साडी आणि साधा रेशमी ब्लाउज परिधान केलेली दिसते. मात्र, ही कथा त्रेतायुगातील असल्याने तिचा पोशाख त्या काळाशी सुसंगत नसल्याचं अनेक सोशल मीडिया युजर्सचं मत आहे. काहींनी हा लूक टीव्ही मालिकेतील वेशभूषेसारखा असल्याची टीका केली.

एका युजरने सोशल मीडियावर लिहिलं, “लारा दत्ता ‘रामायण’साठी नव्हे, तर एखाद्या टीव्ही मालिकेचं शूटिंग करत असल्यासारखी दिसते.” तर दुसऱ्या युजरने, “त्रेतायुगाऐवजी तिने आधुनिक साडी नेसल्यासारखं वाटतं,” अशी प्रतिक्रिया दिली. अनेकांनी चित्रपटाच्या कॉस्च्युम डिझाइनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मात्र, काही चाहत्यांनी रणबीर कपूरचा प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील लूक वाल्मिकी रामायणापासून प्रेरित असल्याचं सांगत त्याचं कौतुकही केलं.

दरम्यान, ‘रामायण: पार्ट १’ यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रणबीर कपूर (प्रभू श्रीराम), साई पल्लवी (सीता), यश (रावण), सनी देओल (हनुमान), लारा दत्ता (कैकेयी), अरुण गोविल (राजा दशरथ), विवेक ओबेरॉय, इंदिरा कृष्णन, सौरभ सचदेवा, अजिंक्य देव, शीबा चड्ढा आणि कुणाल कपूर यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

Vidyutjiva in Ramayana: रामायणातील ‘विद्युतजीव’ कोण? ‘या’ रहस्यमय पात्राबद्दल जाणून घ्या खास गोष्टी; विवेक ओबेरॉय साकारणार भूमिका

ट्रेलरमधील आणखी एका पात्रानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भगवान विष्णूंच्या झलकमुळे ही भूमिका नेमकी कोण साकारत आहे, याबाबत सोशल मीडियावर तर्कवितर्क सुरू आहेत. यापूर्वी रणबीर कपूर प्रभू श्रीरामांसोबत परशुरामाची भूमिकाही साकारणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे ट्रेलरमध्ये दिसणारे भगवान विष्णू रणबीर कपूरच असावेत, असा अंदाज काही चाहत्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Ramayana Star Cast : ‘रामायण’मध्ये भगवान विष्णूंच्या भूमिकेत कोण? महेश बाबू-राजामौलींच्या ‘वाराणसी’शी काय आहे खास कनेक्शन?

Web Title: Lara dutta why is the actress being trolled over her look in the ramayana trailer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?
1

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?

Ghamasaan: अरशद वारसींच्या ‘महाराज’ लूकमागचं गुपित काय? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा
2

Ghamasaan: अरशद वारसींच्या ‘महाराज’ लूकमागचं गुपित काय? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा

Friday OTT Release: घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ सिनेमे आणि सीरिज
3

Friday OTT Release: घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ सिनेमे आणि सीरिज

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव
4

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.