Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितची होणारी सून कोण? मुलगा आरिनसोबत गर्लफ्रेंडला पाहून सोशल मीडियावर रंगली चर्चा

Madhuri Dixit: माधुरी दीक्षित मुलगा आरिन नेनेसोबत मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत पोहोचली. यावेळी आरिनसोबत दिसलेल्या तरुणीची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून ती त्याची गर्लफ्रेंड असल्याचा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 06, 2026 | 10:00 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Madhuri Dixit:  दिवाळीचा सण सुरू झाला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्येही दिवाळी पार्टींची धूम सुरू झाली आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी ५ नोव्हेंबर रोजी आपल्या घरी खास दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कुटुंबासह हजेरी लावली. अभिनेत्री माधुरी दीक्षितही पती डॉ. श्रीराम नेने आणि मोठा मुलगा आरिनसोबत या पार्टीत पोहोचली होती. मात्र, यावेळी माधुरीसोबत तिच्या मुलाची कथित गर्लफ्रेंडही दिसल्याने सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. आरिनसोबत तिला पाहून सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. नेटकरी तर माधुरीची होणारी सून कोण, असा प्रश्न विचारत आहेत.

माधुरी दीक्षितच्या मुलाची कथित गर्लफ्रेंड चर्चेत

मनीष मल्होत्रा यांच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षित आपल्या कुटुंबासह पोहोचली होती. यावेळी माधुरी, तिचे पती डॉ. श्रीराम नेने, मुलगा आरिन आणि त्याच्यासोबत असलेली कथित गर्लफ्रेंड असे चौघेही एकत्र दिसले. त्यांच्या स्टायलिश अंदाजाने पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, आरिनसोबत दिसलेल्या तरुणीला पाहून नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर तिच्याबाबत आणि माधुरीच्या होणाऱ्या सुनेबाबत मजेशीर कमेंट्स केल्या जात आहेत. मात्र, आरिनच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

गुलाबी साडीतील माधुरीचा ग्लॅमरस अंदाज

माधुरी दीक्षितची पारंपरिक फॅशन नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरते. यावेळीही तिने आपल्या साडी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीसाठी माधुरीने गडद गुलाबी रंगाची सॅटिन फिनिश साडी नेसली होती. साडीच्या चमकदार कापडामुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता. साडीच्या काठावर केलेले चांदीच्या आणि पांढऱ्या धाग्यांचे नाजूक भरतकाम तिच्या लूकला खास आकर्षण देत होते.

या साडीसोबत माधुरीने स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला होता. दागिन्यांमध्ये तिने हेवी स्टेटमेंट इअररिंग्स आणि डायमंड रिंग्सची निवड केली होती. तसेच मोती आणि क्रिस्टलचे काम असलेली सुंदर पोटली बॅगही तिने कॅरी केली होती. मोकळे कुरळे केस, हलका मेकअप आणि चेहऱ्यावरील गोड हास्य यामुळे माधुरीचा संपूर्ण लूक खुलून दिसत होता.

Ramayana Box Office Collection: रणबीरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग; पहिल्याच दिवशी मोडले ‘धुरंधर’,‘पठाण’चे रेकॉर्ड?

पांढऱ्या पोशाखात डॉ. श्रीराम नेने यांचा साधा-सोबर लूक

या पार्टीत माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनीही आपल्या लूकने लक्ष वेधून घेतले. त्यांनी पांढऱ्या रंगाचा आकर्षक पोशाख निवडला होता. पांढऱ्या रंगाचे भरतकाम असलेले जॅकेट, त्याला मॅचिंग शर्ट आणि सैल पँट असा त्यांचा लूक होता. त्यांचा साधा आणि मोहक अंदाज माधुरीच्या गुलाबी साडीच्या लूकसोबत छान खुलून दिसत होता.

एकीकडे माधुरीच्या सौंदर्याची आणि फॅशनची चर्चा होत आहे, तर दुसरीकडे मुलगा आरिनसोबत दिसलेल्या तरुणीमुळे सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे माधुरी दीक्षितच्या दिवाळी पार्टीतील हे फॅमिली फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Kon Honar Crorepati: आई आज असती तर माझ्या खांद्यावर ३ स्टार असते…” KBC च्या मंचावर डिलिव्हरी बॉयची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी!

Web Title: Madhuri dixit son arin girlfriend manish malhotra diwali party photo viral ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Diwali Party
  • entertainment
  • madhuri dixit

संबंधित बातम्या

King Movie: ‘दीपिका पदुकोण केवळ एक प्यादी…’; शाहरुख खानच्या ‘किंग’वरून वादाची ठिणगी, भगव्या ड्रेसवर भाजप आमदारांचा आक्षेप
1

King Movie: ‘दीपिका पदुकोण केवळ एक प्यादी…’; शाहरुख खानच्या ‘किंग’वरून वादाची ठिणगी, भगव्या ड्रेसवर भाजप आमदारांचा आक्षेप

Ramayana Box Office Collection: रणबीरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग; पहिल्याच दिवशी मोडले ‘धुरंधर’,‘पठाण’चे रेकॉर्ड?
2

Ramayana Box Office Collection: रणबीरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग; पहिल्याच दिवशी मोडले ‘धुरंधर’,‘पठाण’चे रेकॉर्ड?

Bigg Boss Marathi 7: बिग बॉस मराठी ७ मध्ये कोणाची लागणार वर्णी? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टने वाढवली उत्सुकता
3

Bigg Boss Marathi 7: बिग बॉस मराठी ७ मध्ये कोणाची लागणार वर्णी? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टने वाढवली उत्सुकता

Miss Universe 2026: मिस युनिव्हर्स २०२६ मध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर! काजिया लिझला आव्हान देणार पाकिस्तानची मिस्बाह अरशद
4

Miss Universe 2026: मिस युनिव्हर्स २०२६ मध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर! काजिया लिझला आव्हान देणार पाकिस्तानची मिस्बाह अरशद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.