Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maha Sakthi Teaser: नयनतारा साकारणार महाकालीचा रौद्र अवतार; शेवटचे 10 सेकंद ठरणार खास, ‘रामायणम्’सोबत महाक्लॅश

Maha Sakthi Teaser: नयनताराच्या ‘मुकुथी अम्मान २ – राइज ऑफ महाशक्ती’चा टीझर रिलीज झाला. महाकालीच्या रौद्र अवतारात नयनतारा दिसणार असून ‘रामायणम्’सोबत महाक्लॅश होणार आहे

  • By अमृता यादव
Updated On: Sep 15, 2026 | 11:40 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Maha Sakthi Teaser: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची ‘लेडी सुपरस्टार’ नयनतारा आता देवी महाशक्तीच्या दिव्य आणि रौद्र अवतारात मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट तमिळ चित्रपट ‘मुकुथी अम्मान’चा सिक्वेल असलेल्या ‘मुकुथी अम्मान २ – राइज ऑफ महाशक्ती’चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. जवळपास अडीच मिनिटांच्या या टीझरमध्ये पौराणिक कथा, भक्ती आणि अॅक्शनचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो.

नयनतारा साकारणार महाकालीचा रौद्र अवतार

‘राइज ऑफ महाशक्ती’ या शीर्षकाने प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये एका प्राचीन जगाची झलक पाहायला मिळते. गावात अशांतता पसरलेली असते आणि एका तरुण राजकुमाराच्या जीवाला धोका निर्माण झालेला असतो. शत्रू राजकुमाराला ठार करण्यासाठी गावाच्या दिशेने कूच करत असल्याचे दिसते.

आपल्या मुलाचा जीव वाचावा यासाठी एक आई देवी मुकुथी अम्मान अर्थात महाकालीच्या मूर्तीसमोर प्रार्थना करते. ती देवीकडे आपल्या मुलाला वाचवण्याची विनवणी करते आणि त्यासाठी स्वतःच्या प्राणांचा त्याग करण्याची तयारी दर्शवते.

यानंतर टीझरमध्ये एक धक्कादायक प्रसंग पाहायला मिळतो. मुलाचा जीव वाचावा यासाठी ती आई स्वतःचे जीवन देवीला अर्पण करते. या त्यागानंतर कथानक एका मोठ्या युद्धाच्या दिशेने जात असल्याचे दिसते.

शेवटचे काही सेकंद वाढवतात उत्सुकता

टीझरच्या शेवटच्या काही सेकंदांमध्ये नयनताराचा महाकालीच्या रूपातील दिव्य आणि रौद्र अवतार समोर येतो. आईच्या भक्ती आणि त्यागामुळे देवीचा अवतार प्रकट होतो आणि कुटुंबाला धोका देणाऱ्या शक्तींविरोधात ती उभी ठाकते. या काही सेकंदांमध्ये दिसणारी दृश्यात्मक भव्यता आणि अॅक्शन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

टीझरमध्ये रणांगण, राजसिंहासन, घोडदळ आणि मोठ्या युद्धाची दृश्ये पाहायला मिळतात. त्यामुळे चित्रपटात चांगल्या आणि वाईट शक्तींमधील मोठा संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळतात.

 

‘मुकुथी अम्मान’पेक्षा सिक्वेलचा अंदाज वेगळा

नयनताराचा २०२० मध्ये आलेला ‘मुकुथी अम्मान’ हा देवी आणि सामान्य माणसांच्या नात्यावर आधारित कॉमेडी-ड्रामा होता. मात्र, सिक्वेलमध्ये निर्मात्यांनी भक्तीसोबत अॅक्शन आणि पौराणिक कथेचा भव्य मेळ साधला आहे.

दिग्दर्शक सुंदर सी. यांनी फ्रँचायझीला यावेळी मोठ्या व्यावसायिक चित्रपटाचे स्वरूप दिल्याचे टीझरवरून दिसून येते. पौराणिक कथा, भव्य सेट्स, अॅक्शन आणि नयनताराचा महाशक्ती अवतार यामुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Genelia Deshmukh Ganeshotsav: सासू-सुनेचं गोड बॉण्डिंग, खास फोटोशूट; जिनिलीयाने दाखवली देशमुखांच्या गणेशोत्सवाची खास झलक

‘रामायणम्’सोबत होणार थेट बॉक्स ऑफिस क्लॅश

विशेष म्हणजे, टीझरसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. ‘मुकुथी अम्मान २ – राइज ऑफ महाशक्ती’ हा चित्रपट ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये हा चित्रपट जगभरात प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याच दिवशी रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायणम्’शी या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. त्यामुळे दोन मोठ्या पौराणिक आणि भक्तीप्रधान चित्रपटांमधील हा सामना प्रेक्षकांसाठी आणि बॉक्स ऑफिससाठी विशेष ठरणार आहे.

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?

Web Title: Maha sakthi teaser nayanthara mahakali avatar ramayanam clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य
1

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत
2

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या
3

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट
4

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.