Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महेश भट्ट यांचा मोठा निर्णय! आता पुन्हा कधीही दिग्दर्शन करणार नाहीत; सांगितलं ठोस कारण

जवळपास पाच दशकं आणि ४७ चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर महेश भट्ट यांनी आता पुन्हा कधीही दिग्दर्शन करणार नसल्याची घोषणा केली आहे. बदलत्या चित्रपटसृष्टीत कलाकाराच्या सर्जनशीलतेवर मर्यादा येत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 03, 2026 | 06:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांनी आपल्या दिग्दर्शन कारकिर्दीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. जवळपास पाच दशकांच्या प्रदीर्घ प्रवासात ४७ चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर आता ते पुन्हा कधीही दिग्दर्शकाची धुरा सांभाळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, निर्माता म्हणून चित्रपट आणि नाट्यनिर्मितीत सक्रिय राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. बदलत्या काळात चित्रपट निर्मितीच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Samarth Movie : सिनेमाचा म्युजिक लाँच सोहळा पडला पार! समर्थ रामदासांचे विचार आणि सुमधुर संगीत

‘कलाकाराला स्वतःची मोकळीकच उरलेली नाही’

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट यांना पुन्हा दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ठामपणे, “नाही,” असे उत्तर दिले. आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, “आज चित्रपटांचा आशय आणि दिशा आधीच निश्चित केलेली असते. ठरावीक चौकटीत राहून कंटेंट तयार करण्याचा दबाव वाढला आहे. अशा परिस्थितीत कलाकाराच्या सर्जनशीलतेला किती वाव उरतो, हा मोठा प्रश्न आहे.” सध्याच्या चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकाला स्वतंत्रपणे विचार मांडण्याची संधी कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

तरीही हिंदी चित्रपटसृष्टीबाबत ते निराश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजही चांगल्या आणि अर्थपूर्ण कथा सांगण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘बेबी लेट्स डान्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘मी होणार सुपरस्टार’ फेम अपेक्षा लोंढेचा दमदार डान्स अवतार

भारतीय सिनेमाला दिले अनेक अजरामर चित्रपट

१९७४ मध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलेल्या महेश भट्ट यांनी ‘अर्थ’, ‘सारांश’, ‘आशिकी’ यांसारखे अनेक गाजलेले आणि अजरामर चित्रपट दिले. त्यांच्या चित्रपटांमध्ये वैयक्तिक अनुभव, सामाजिक वास्तव आणि नातेसंबंधांचे प्रभावी चित्रण पाहायला मिळाले. भाऊ मुकेश भट्ट यांच्यासोबत त्यांनी ‘विशेष फिल्म्स’ची स्थापना केली. या बॅनरखाली ‘राज’, ‘मर्डर’ आणि ‘जिस्म’सारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती झाली. इतकेच नव्हे, तर अनुपम खेर, कंगना रणौत आणि इमरान हाश्मी यांसारख्या अनेक कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी संधी देण्याचे श्रेयही महेश भट्ट यांनाच जाते.

आलिया भट्टनेही निर्माण केली वेगळी ओळख

महेश भट्ट यांची कन्या आलिया भट्ट आज बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर तिने ‘हायवे’, ‘उडता पंजाब’, ‘राजी’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘डार्लिंग्स’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ यांसारख्या चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या. २०२२ मध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत विवाह केल्यानंतर त्यांना राहा कपूर ही कन्या झाली. नुकतीच ती ‘अल्फा’ या महिला-केंद्रित अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात झळकली.

Web Title: Mahesh bhatt retired as a film director

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • Film Director

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.