Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manisha Koirala: ‘माझा मृत्यू जवळ आला…’; कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये सोसला एकटेपणा, अभिनेत्रीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

Manisha Koirala: कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये मनीषा कोईरालाला ‘मृत्यू जवळ आला आहे’ असं वाटत होतं. नुकताच अभिनेत्रीने आजारपणातील एकटेपणा आणि संघर्ष सांगितला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 01, 2026 | 03:19 PM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Manisha Koirala: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्याच्या आणि कर्करोगाशी दिलेल्या लढ्याच्या भावनिक आठवणी शेअर केल्या आहेत. २०१२ मध्ये त्यांना चौथ्या स्टेजमधील अंडाशयाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी करण्यात आली. या उपचारांनंतर त्यांनी कर्करोगावर मात केली. मात्र, आजाराचं निदान झाल्यानंतर रुग्णालयात घालवलेली ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयावह अनुभवांपैकी एक होती.

नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये मनीषा कोईराला यांनी त्या काळातील अनुभव सांगितला. आजाराबद्दल समजल्यानंतर आपण एका खोल अंधारात जात असल्यासारखं वाटत होतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

‘मृत्यू जवळ आला आहे, असं वाटत होतं’

रुग्णालयातील त्या रात्रीची आठवण सांगताना मनीषा कोईराला म्हणाल्या की, त्या वेळी त्यांच्या मनात मृत्यूची भीती सतत होती. गंभीर आजारातून जाताना निर्माण होणारी भीती आणि एकटेपणा शब्दांत सांगणं कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं.

कर्करोगासारखा गंभीर आजार केवळ शरीरावर परिणाम करत नाही, तर त्याचा मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतो, हे या अनुभवातून जाणवल्याचं मनीषाने सांगितलं. आजूबाजूला अनेक लोक असतानाही एखाद्या व्यक्तीला आतून एकटं वाटू शकतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कॅन्सरनंतर बदलला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन

कर्करोगावर मात केल्यानंतर मनीषा कोईरालाच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला. आयुष्याने पुन्हा जगण्याची संधी दिल्यानंतर आपल्या तत्त्वांशी जुळत नसलेल्या अनावश्यक गोष्टींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

आजारपणापूर्वी आपण आपल्या आरोग्याकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष करत होतो, अशी कबुलीही मनीषाने दिली. आता मात्र आरोग्य, कुटुंब, निसर्ग आणि देवाप्रती कृतज्ञता यांना त्या अधिक महत्त्व देतात. मोठ्या मित्रपरिवारापेक्षा मोजक्या विश्वासू आणि खास व्यक्तींसोबत वेळ घालवणं त्यांना अधिक पसंत असल्याचं त्यांनी सांगितलं.

दिवसाचे १८ तास काम करत होती मनीषा

आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाबद्दलही मनीषाने या पॉडकास्टमध्ये भाष्य केलं. एका काळात त्या एकाच वेळी अनेक चित्रपटांमध्ये काम करत होत्या आणि दिवसाचे तब्बल १८ तास काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

सततच्या कामाच्या ताणामुळे मानसिकदृष्ट्याही थकवा जाणवत होता. त्यामुळे काही चुकीच्या चित्रपटांची निवड झाल्याचंही त्यांनी मान्य केलं. मात्र, कर्करोगाचं निदान झाल्यानंतर जगभरातील चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या. त्यावेळी आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केल्याची जाणीव त्यांना झाली.

यानंतर मनीषाने चित्रपटांची संख्या वाढवण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.

Rashmika Mandanna Mysaa Movie: चेहऱ्यावर रक्त अन् नजरेत..; रश्मिका मंदानाचा आजवरचा सर्वात रौद्र अवतार!

‘सौदगर’ ते ‘हीरामंडी’पर्यंतचा दमदार प्रवास

मनीषा कोईरालाने १९९१ मध्ये ‘सौदगर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’, ‘बॉम्बे’, ‘खामोशी’, ‘गुप्त’, ‘दिल से…’ आणि ‘कंपनी’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली.

कर्करोगातून बऱ्या झाल्यानंतर त्यांनी ‘डिअर माया’ आणि ‘संजू’ यांसारख्या चित्रपटांमधून दमदार पुनरागमन केलं. त्यानंतर ‘हीरामंडी: द डायमंड बझार’ या वेब सीरिजमध्ये साकारलेल्या मल्लिकाजानच्या भूमिकेसाठी त्यांचं विशेष कौतुक झालं.

कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करून पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात दमदारपणे उभं राहण्याचा मनीषा कोईरालाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Natya Lekhan Protsahan Yojana: मराठी नाटककारांसाठी मोठी संधी! ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसं

Web Title: Manisha koirala cancer fourth stage emotional podcast revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त
4

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.