Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Natya Lekhan Protsahan Yojana: मराठी नाटककारांसाठी मोठी संधी! ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसं

Natya Lekhan Protsahan Yojana: मराठी नाटककारांसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर. उत्कृष्ट अप्रकाशित दोन अंकी नाट्यसंहितांना रोख बक्षिसं मिळणार.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 01, 2026 | 02:03 PM
(फोटो सौजन्य-चॅटजीपीटी)

(फोटो सौजन्य-चॅटजीपीटी)

Follow Us
Follow Us:
  • मराठी नाटककारांसाठी ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’
  • उत्कृष्ट नाट्यसंहितांना मिळणार रोख पारितोषिक
  • नाट्यसंहिता पाठवण्यासाठी ‘या’ अटी
शीतलकुमार शिंदे, धाराशिव : मराठी रंगभूमीवर आपल्या लेखणीची छाप उमटवू इच्छिणाऱ्या नवोदित आणि अनुभवी नाटककारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यंदाही ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत दर्जेदार आणि अप्रकाशित दोन अंकी मराठी नाट्यसंहिता मागवण्यात आल्या असून, इच्छुक नाटककारांनी आपल्या संहिता २० ऑक्टोबरपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन नाट्य परिषदेचे मध्यवर्ती नियामक मंडळ सदस्य तथा धाराशिव शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी केले आहे. Natya Lekhan Protsahan Yojana

बदलत्या सामाजिक वास्तवाला, नातेसंबंधांना आणि आजच्या काळातील विविध प्रश्नांना नाटकाच्या माध्यमातून मांडणाऱ्या नव्या लेखनाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. नवोदितांसोबतच अनुभवी नाटककारांनाही आपल्या लेखनाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

उत्कृष्ट नाट्यसंहितांना रोख पारितोषिक

या योजनेत निवड होणाऱ्या उत्कृष्ट नाट्यसंहितांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये, तर चतुर्थ क्रमांकासाठी ३ हजार रुपये असे पारितोषिक देण्यात येईल.

याशिवाय संगीत नाटकासाठी स्वतंत्र ११ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे संगीत नाटक लिहिणाऱ्या नाटककारांनाही या योजनेतून प्रोत्साहन मिळणार आहे.

पारितोषिकप्राप्त संहितांचे प्रकाशन होणार

या योजनेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पारितोषिकप्राप्त नाट्यसंहितांचे प्रकाशन करण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे. याबाबत केंद्रीय अध्यक्ष प्रशांत दामले यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे लेखकांना केवळ आर्थिक पारितोषिकच नव्हे, तर त्यांच्या लेखनाला व्यापक व्यासपीठ मिळण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

नाट्यसंहिता पाठवताना ‘या’ अटी महत्त्वाच्या

योजनेत सहभागी होण्यासाठी नाटककारांनी नाट्यसंहितेच्या दोन टंकलिखित किंवा सुवाच्य प्रती पाठवणे आवश्यक आहे. नाट्यसंहिता मराठी भाषेतील आणि दोन अंकी असावी. तसेच संबंधित संहिता यापूर्वी कोणत्याही माध्यमातून प्रकाशित झालेली किंवा नाट्यप्रयोगासाठी सादर केलेली नसावी.

इच्छुक नाटककारांनी आपली संहिता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, मामा परमानंद मार्ग, माटुंगा, मुंबई या पत्त्यावर २० ऑक्टोबरपूर्वी पाठवावी.

Aarti Solanki: ‘बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं…’; गणेशमूर्तींच्या बदलत्या ट्रेंडवर आरती सोलंकी संतापली, पोस्ट व्हायरल

प्रवेश अर्ज आणि योजनेची सविस्तर माहिती नाट्य परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

धाराशिवमधील नाटककारांनी संधीचा लाभ घ्यावा

धाराशिव जिल्ह्यात नाट्यलेखनाची समृद्ध परंपरा असून, अनेक हौशी आणि नवोदित लेखकांकडे रंगभूमीला नवा आशय देण्याची क्षमता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नाटककारांनी या योजनेत सहभागी होऊन आपल्या लेखणीतील कथा रंगभूमीपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन विशाल शिंगाडे यांनी केले आहे.

मराठी रंगभूमीवर नव्या कथा आणि नव्या लेखकांना संधी देण्याच्या दृष्टीने ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ महत्त्वाची ठरणार असून, इच्छुक नाटककारांनी अंतिम मुदतीपूर्वी आपल्या नाट्यसंहिता पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Rohit Sharma: क्रिकेटच्या मैदानानंतर रोहित शर्माची नवी इनिंग; ‘फॅमिली फुल हाऊस’मधून करणार मनोरंजनविश्वात पदार्पण

Web Title: Natya lekhan protsahan yojana marathi natak lekhak rokh bakshis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Dharashiv News
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.