Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Entertainment News: २९ व्या वर्षी पूर्ण केलं कोट्यवधींचं स्वप्न! कोण आहे ‘ही’ अभिनेत्री? घराच्या नावाने वेधलं लक्ष

Entertainment News: सोशल मीडियातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटरने अवघ्या २९ व्या वर्षी मुंबईतील गोरेगावमध्ये सुमारे ५ कोटी रुपयांचे स्वप्नातील घर खरेदी केले आहे. नव्या घराची झलक तिने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली असून तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 03, 2026 | 06:40 PM
Entertainment News: २९ व्या वर्षी पूर्ण केलं कोट्यवधींचं स्वप्न (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Entertainment News: २९ व्या वर्षी पूर्ण केलं कोट्यवधींचं स्वप्न (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्रीने २९ व्या वर्षी ५ कोटींचं घर घेतलं.
  • गोरेगावमधील नव्या घराची झलक शेअर केली.
  • चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Dream Home at the Age of 29 Actress: स्वतःचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. विशेषतः मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून घर खरेदी करणं ही मोठी उपलब्धी मानली जाते. सोशल मीडियातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर मनीषा राणी हिने हे स्वप्न अवघ्या 29 व्या वर्षी पूर्ण केलं आहे. नव्या घराची झलक तिने चाहत्यांसोबत शेअर केली असून तिच्या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

‘बिग बॉस OTT 2’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री

‘बिग बॉस OTT 2’मुळे घराघरात पोहोचलेल्या मनीषाने मुंबईतील गोरेगाव परिसरात आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तिने हे घर घेतलं असून, प्रत्येक कोपरा स्वतःच्या आवडीनुसार सजवण्यासाठी तिने पुरेसा वेळ दिला. घर तयार झाल्यानंतर त्याची पहिली झलक पाहून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.(Entertainment News: )

घराची किंमत सुमारे इतके कोटी

मिळालेल्या माहितीनुसार, या घराची किंमत सुमारे पाच कोटी रुपये आहे. मात्र केवळ घर घेऊन ती थांबली नाही. घराचं सौंदर्य अधिक खुलावं म्हणून इंटीरियरवरही मोठी गुंतवणूक करण्यात आली. जवळपास एका वर्षाच्या नियोजनानंतर हे काम पूर्ण झालं. घरातील सजावट, फर्निचर, प्रकाशयोजना आणि रंगसंगती यासाठी तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

17 मजल्यावर घर

मनीषाचं हे 3-BHK घर एका उंच इमारतीच्या 17 व्या मजल्यावर आहे. घरातून दिसणारं शहराचं दृश्य आणि आधुनिक पद्धतीने तयार केलेलं इंटीरियर पाहून अनेकजण प्रभावित झाले आहेत. या घराला तिने ‘आंगण’ हे नाव दिलं आहे. तिच्या मते, हे फक्त राहण्याचं ठिकाण नाही, तर कुटुंबीय, मित्र आणि आठवणींनी भरलेलं एक खास घर असावं, अशी तिची इच्छा आहे.

यूट्यूब चॅनेलवर होम टूरचा व्हिडिओ शेअर

मनीषाने तिच्या यूट्यूब चॅनेलवर होम टूरचा व्हिडिओ शेअर करत घरातील प्रत्येक भाग दाखवला. प्रवेशद्वारापासून हॉल, डायनिंग एरिया, किचन, बेडरूम आणि बाल्कनीपर्यंत प्रत्येक जागा वेगळ्या पद्धतीने सजवण्यात आली आहे. प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र रंगसंगती निवडण्यात आली असून आधुनिक शैली आणि साधेपणाचा सुंदर मिलाफ या घरात पाहायला मिळतो.

घरातील हा कोपरा तिच्यासाठी सर्वात शांत

घरात प्रवेश करताच सर्वात आधी छोटंसं मंदिर दिसतं. येथे हनुमान, गणपती, महादेव आणि लक्ष्मीमातेच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्राचा विचार करून मंदिराची जागा निश्चित करण्यात आल्याचं मनीषाने सांगितलं. घरातील हा कोपरा तिच्यासाठी सर्वात शांत आणि सकारात्मक असल्याचंही तिने नमूद केलं.

होम टूरदरम्यान अभिनेत्री भावुक

होम टूरदरम्यान मनीषा अनेकदा भावुक झालेली दिसली. एकेकाळी मुंबईत स्वतःचं घर असण्याची कल्पनाही केली नव्हती, पण आज ते वास्तवात उतरल्याचं सांगताना तिच्या भावना अनावर झाल्या. या यशामागे चाहत्यांचं प्रेम आणि पाठिंबा असल्याचं सांगत तिने सर्वांचे मनापासून आभार मानले.

सोशल मीडियावर छोटे व्हिडिओ

बिहारमधील साध्या कुटुंबातून आलेल्या मनीषाने सोशल मीडियावर छोटे व्हिडिओ तयार करत आपला प्रवास सुरू केला. तिची वेगळी शैली आणि विनोदी सादरीकरणामुळे ती लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘बिग बॉस OTT 2’, ‘झलक दिखला जा 11’ आणि विविध म्युझिक व्हिडिओंमुळे तिला मोठी ओळख मिळाली. आज स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर तिने स्वप्नातील घर उभं केलं असून तिचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

Web Title: Manisha rani buys 5 crore dream home in goregaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Entertainment marathi
  • marathi latest news

संबंधित बातम्या

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला
1

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
2

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा
3

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन
4

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.