
Aarti Solanki On Sai Tamhankar: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
या सिनेमामुळे एका मराठी अभिनेत्रीने तर तिच्या प्रेमातच पडल्यासारखं तिचं कौतुक केलं. आरती सोलंकीने मांडलं मनातलं ‘फू बाई फू’ मधून घराघरात पोहोचलेली कॉमेडी क्वीन आरती सोलंकी नेहमीच रोखठोक बोलण्यासाठी ओळखली जाते. तिने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून सईचं भरभरून कौतुक केलं आहे. पण फक्त कौतुकच नाही तर तिने मराठी प्रेक्षकांना पण खडे बोल सुनावले आहेत.
आरती तिच्या पोस्टमध्ये म्हणाली, “अडकित्ता बघितला आणि सईचा पूर्ण प्रवास डोळ्यासमोर आला. फू बाई फू पासून तिचा प्रवास बघ आले. कधी बोल्ड रोल, कधी अगदी साधी बाई, कधी आयटम साँग तर कधी सूत्रसंचालन आणि नंतर हिंदी सिनेमे… सईने सगळं केलंय.” मराठी प्रेक्षक छोट्या मनाचे आहेत का? आरती इथेच थांबली नाही.
Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती ..
तिने पुढे लिहिलंय की, “हे सगळं बघून वाटतं की मराठी प्रेक्षक म्हणून आपण किती छोट्या मनाचे आहोत. आपल्याला कौतुक फक्त बॉलिवूडच्या हिरोईनचंच येतं. त्यांना जरी अभिनयातला ‘अ’ येत नसला तरी आपण त्यांना डोक्यावर घेतो आणि सुपरस्टार म्हणतो. पण आपल्याच मराठी मुलींनी एवढं मोठं काम करूनही आपण त्यांना किंमत देत नाही.” आरतीचा हा टोला थेट त्या प्रेक्षकांना होता जे फक्त बॉलिवूडच्याच मागे धावतात. तिचं म्हणणं अगदी खरं पण आहे. आपल्याकडे सई सारख्या कितीतरी गुणी अभिनेत्री आहेत पण आपण त्यांना तितकं मोठं करत नाही.
तिच्या पोस्टमध्ये आरतीने आणखी काही नावं घेतली. ती म्हणाली, “आपल्याकडे सई ताम्हणकर, प्रिया बापट, छाया कदम, अमृता खानविलकर सारख्या किती तरी अभिनेत्री आहेत. या फक्त मराठी सिनेमातच नाही तर बॉलिवूड, वेब सिरीज, नाटक सगळीकडे काम करत आहेत. अनेक वर्ष स्ट्रगल करून त्यांनी हे नाव कमावलं आहे. मग आपण प्रेक्षक म्हणून पण मन मोठं करायला हवं आणि आपल्याच अभिनेत्रींना सुपरस्टार म्हणायला हवं.”
Aarti Solanki: ‘बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं…’; गणेशमूर्तींच्या …
आरतीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून तिला पाठिंबा दिला आहे. सई ताम्हणकरने पण या पोस्टवर रिप्लाय केला आहे. सईचा ‘अडकित्ता’ सध्या चर्चेत आहे आणि आरतीने केलेल्या या कौतुकामुळे त्या सिनेमाची चर्चा आणखी वाढली आहे.खरंच, आरतीने जे म्हटलंय त्यावर विचार करायला हवा. आपल्या मराठी कलाकारांचं कौतुक आपणच नाही केलं तर कोण करणार?