Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!

Amar Prem Katha marathi movie: समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘अमर प्रेम कथा’ या रोमँटिक हॉरर कॉमेडी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. २०२७च्या व्हॅलेंटाईन डेला सिनेमा रिलीज होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 09, 2026 | 02:40 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अमर प्रेम कथा’च्या पोस्टरमध्ये प्रेम आणि हॉररची झलक
  • जिवंत हात अन् भुताटकी हात; गुलाबाभोवती काट्यांचं गूढ
  • प्रथमेश परब, ओंकार भोजनेसह तगडी स्टारकास्ट
Amar Prem Katha Marathi Movie: मराठी मनोरंजनसृष्टीत लवकरच एक आगळावेगळा रोमँटिक हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तरुणाईसाठी मनोरंजनाची खास मेजवानी ठरणाऱ्या या चित्रपटातून प्रेमकथेला हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा तडका मिळणार आहे. ‘सुपर डुपर’ सिनेमाच्या यशानंतर लेखक-दिग्दर्शक समीर आशा पाटील पुन्हा एकदा वेगळ्या विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या आगामी ‘अमर प्रेम कथा’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, पोस्टरनेच चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे.

पोस्टरमधून प्रेम आणि हॉररची झलक

‘अमर प्रेम कथा’च्या पोस्टरमध्ये एका बाजूला जिवंत हात, तर दुसऱ्या बाजूला भुताटकी हात दिसत आहे. या दोन्ही हातांच्या मध्ये काट्यांनी वेढलेलं लाल गुलाबाचं फूल पाहायला मिळतं. त्यामुळे पोस्टरमधूनच प्रेम आणि हॉररचा अनोखा संगम पाहायला मिळतो.

पोस्टरची संकल्पना पाहता, ही प्रेमकथा नेहमीच्या रोमँटिक चित्रपटांपेक्षा काहीशी वेगळी असणार असल्याची झलक मिळते. प्रेमाच्या नात्यात हॉरर आणि कॉमेडीचा ट्विस्ट नेमका कसा येणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकप्रिय कलाकारांची तगडी स्टारकास्ट

‘अमर प्रेम कथा’मध्ये मराठी मनोरंजनसृष्टीतील आजच्या घडीचे लोकप्रिय कलाकार एकत्र पाहायला मिळणार आहेत. प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, ओंकार भोजने, पार्थ भालेराव, रोहित माने, विनायक माळी आणि सयाजी शिंदे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.

या दमदार कलाकारांच्या अभिनयासोबतच चित्रपटाची वेगळी कथा आणि रोमँटिक हॉरर कॉमेडीचा फॉर्म्युला प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.

समीर आशा पाटील यांचं लेखन आणि दिग्दर्शन

‘सुपर डुपर’ या चित्रपटानंतर समीर आशा पाटील पुन्हा एकदा वेगळ्या विषयावर काम करत आहेत. ‘अमर प्रेम कथा’चं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. तर डॉ. पल्लवी जाधव, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

प्रेमकथा, हॉरर आणि कॉमेडी या तीन वेगळ्या जॉनरचा मेळ या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने ‘अमर प्रेम कथा’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा अनोखा अनुभव ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Ashok Saraf Romantic Scene: अशोक मामांसोबत रोमँटिक सीन अन् समोर निवेदिता सराफ, ‘पछाडलेला’ फेम अभिनेत्रीने सांगितला आठवणीतला किस्सा

२०२७च्या व्हॅलेंटाईन डेला होणार रिलीज

प्रेमाला एक वेगळा ट्विस्ट देणारा ‘अमर प्रेम कथा’ हा चित्रपट २०२७च्या व्हॅलेंटाईन डेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेक्षकांना प्रेम, भय आणि विनोदाची भन्नाट मेजवानी अनुभवता येणार आहे.

चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरनंतर आता त्याचा टीझर आणि ट्रेलर कधी प्रदर्शित होणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. प्रेमकथा नेमकी किती ‘डेडली’ ठरणार, याचा उलगडा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच होणार आहे.

Bigg Boss 20 First Nomination: पहिल्या नॉमिनेशनने उडवली स्पर्धकांची झोप; ४ जणांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Web Title: Amar prem katha marathi movie first poster sameer asha patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Sayaji Shinde

संबंधित बातम्या

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड
1

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!
2

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!

Kakula Movie: भय अन् सूडाची थरारक कथा; काकुळ’मध्ये नेमकं कोणतं रहस्य दडलंय?
3

Kakula Movie: भय अन् सूडाची थरारक कथा; काकुळ’मध्ये नेमकं कोणतं रहस्य दडलंय?

Ashok Saraf Romantic Scene: अशोक मामांसोबत रोमँटिक सीन अन् समोर निवेदिता सराफ, ‘पछाडलेला’ फेम अभिनेत्रीने सांगितला आठवणीतला किस्सा
4

Ashok Saraf Romantic Scene: अशोक मामांसोबत रोमँटिक सीन अन् समोर निवेदिता सराफ, ‘पछाडलेला’ फेम अभिनेत्रीने सांगितला आठवणीतला किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.