Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sasare Bapre Marathi Movie : प्रेम, लग्न अन् कौटुंबिक गोंधळ! ‘सासरे बापरे’चा धमाल प्रवास 5 फेब्रुवारीपासून

Sasare Bapre Marathi Movie : भरत जाधव, सायली संजीव आणि उपेंद्र लिमये यांच्या भूमिका असलेला ‘सासरे बापरे’ हा मराठी चित्रपट ५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार. प्रेम, कुटुंब, विनोद आणि मानसिक आरोग्याची अनोखी गोष्ट याच चित्रित करण्यात आली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 21, 2026 | 09:00 PM
Sasare Bapre Marathi Movie : प्रेम, लग्न अन् कौटुंबिक गोंधळ! 'सासरे बापरे'चा धमाल प्रवास 5 फेब्रुवारीपासून

Sasare Bapre Marathi Movie : प्रेम, लग्न अन् कौटुंबिक गोंधळ! 'सासरे बापरे'चा धमाल प्रवास 5 फेब्रुवारीपासून

Follow Us
Follow Us:
  • भरत जाधवचा दमदार अभिनय
  • एक आगळी-वेगळी लव्हस्टोरी
  • माणसांमधील हळुवार बाजू मांडण्याचा प्रयत्न
 

प्रेमकथा म्हटलं की, सगळं काही सुरळीत आणि परफेक्ट असावं, असं नाही. प्रेमासोबत येणारा गोंधळ, नात्यांमधले मतभेद, एकमेकांना समजून घेण्याची धडपड आणि या सगळ्यात कुटुंबाची होणारी मजेशीर घुसमट, अशाच काहीशा भन्नाट आणि हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन ‘सासरे बापरे’ (Sasare Bapre Marathi Movie) हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा झाली असून ‘सासरे बापरे’ हा चित्रपट येत्या 5 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

एक आगळी-वेगळी लव्हस्टोरी

‘एक बाप… आणि एक बाप लव्हस्टोरी!’ अशी कॅची ओळ घेऊन येणाऱ्या या चित्रपटाचं शीर्षकच उत्सुकता वाढवणारं आहे. नावातला मिश्कीलपणा आणि त्यामागची कौटुंबिक गोष्ट यामुळे ‘सासरे बापरे’ मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता पहिल्याच घोषणेत निर्माण झाली आहे. प्रेम आणि नात्यांच्या या गोष्टीत विनोदाची रंगत असली, तरी माणसांच्या भावविश्वाकडे आणि मानसिक आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयाकडेही संवेदनशील नजरेने पाहाण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

भरत जाधव म्हणजे विनोदाचा अचूक टायमिंग. आणि या सिनेमात विनोदा सोबत आतापर्यंत त्यांच्या न पाहिलेल्या छटा अनुभवायला मिळणार आहेत. भरत जाधव यांच्या अभिनयाचा हा नवा रंग प्रेक्षकांसाठी नक्कीच पर्वणी असेल. भरत जाधव, सायली संजीव, सुव्रत जोशी, मिलिंद गवळी, विजय निकम, अश्विनी महांगडे, रेणूका दफ्तरदार, प्रफुल्ल सामंत, चंद्रशेखर सांडवे, संदीप गायकवाड, प्रियंका हांडे अशा दमदार कलाकारांची फळी आणि सोबतच एका वेगळ्या भूमिकेत उपेंद्र लिमये यांना पाहताना येणारी मजा ‘सासरे बापरे’च्या कथेला आणखी रंगतदार बनवणार आहे.

Dhasal Movie Teaser Out : धम्मा फेस्टिव्हलमध्ये ‘ढसाळ’चा हुंकार; ललित प्रभाकरचा दमदार लूक समोर

माणसांमधील हळुवार बाजू मांडण्याचा प्रयत्न

दिग्दर्शक विशाल विलास सुर्वे म्हणतात, प्रेमकथा म्हणजे एखादी परफेक्ट व्यक्ती शोधण्याची गोष्ट नाही. तर अपूर्ण, अनपेक्षित आणि तरीही खऱ्या व्यक्तीवर प्रेम करण्याचं धैर्य म्हणजे प्रेम. ‘सासरे बापरे’मधून गोंधळाच्या परिस्थितीतही नात्यांमध्ये टिकून राहाण्याची ताकद आणि माणसांमधली हळुवार बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी चित्रपटांनी नेहमीच गजबजलेल्या घरातलं माणूसपण आणि त्यातील उबदारपणा सुंदरपणे मांडला आहे. त्याच उबदारपणातून मानसिक आरोग्यासारख्या विषयाकडे पाहाण्याचा हा प्रयत्न आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना हसवेल, भावूक करेल आणि कदाचित आपल्या जवळच्या माणसांकडे थोडं अधिक संयमाने पाहायला लावेल.

चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकेत तांडेल यांचे आहेत. मुश्ताक खान प्रस्तुत आणि चेतन जगन्नाथ शिंदे, विशाल विलासिनी सुर्वे, सचिन शिंदे, प्रीत शिंदे, मुश्ताक खान, मोहसिन खान, सत्या अय्यर या चित्रपटाचे निर्माते असून सुनील जागेटिया, विनोद रामचंद्र गुरसळे आणि आकाश रवींद्रनाथ गुरसळे सहनिर्माते आहेत. एलएससीए क्रिएटिव्हज, सिंधिया एंटरटेनमेंट, सिनेमॅटिक किडा, सरवणा स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विलास सुर्वे यांनी केले आहे. सोबतच चेतन जगन्नाथ शिंदे यांनी छायाचित्रणाची बाजू साभाळली आहे.

Jay Jay Swami Samarth: स्वामींच्या अनुपस्थितीत स्वामीस्थानात अवधूतची अनपेक्षित एंट्री! रणजीतला थेट आव्हान देणारा हा बालक कोण आहे?

प्रेम, कुटुंब, नात्यांमधली गुंतागुंत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंमती-जमतींचा हा अनोखा प्रवास 5 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. त्यामुळे ‘सासरे बापरे’मध्ये नेमकी कोणाची लव्हस्टोरी आणि कोणाचा बापरे, असा अनुभव देणारा गोंधळ आहे, हे पाहाण्यासाठी प्रेक्षकांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे 5 फेब्रुवारीची.

Web Title: Sasare bapre marathi movie release date bharat jadhav rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Bharat Jadhav
  • marathi movie
  • sayali sanjeev

संबंधित बातम्या

Miranda Warning : फार्महाऊसवरील खुनाचं गूढ उलगडणार! आदिनाथ कोठारेच्या ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरारक टीझर रिलीज
1

Miranda Warning : फार्महाऊसवरील खुनाचं गूढ उलगडणार! आदिनाथ कोठारेच्या ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरारक टीझर रिलीज

Akshaya Naik: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अक्षयाने सांगितला आयुष्यातील ‘सोनेरी क्षण’; या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार अभिनेत्री
2

Akshaya Naik: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अक्षयाने सांगितला आयुष्यातील ‘सोनेरी क्षण’; या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार अभिनेत्री

Prajakta Mali Gauri Movie: ‘फुलवंती’नंतर प्राजक्ता माळीची नवी निर्मिती; ‘गौरी’तून मांडणार स्त्रीशक्तीचा विचार
3

Prajakta Mali Gauri Movie: ‘फुलवंती’नंतर प्राजक्ता माळीची नवी निर्मिती; ‘गौरी’तून मांडणार स्त्रीशक्तीचा विचार

Rinku Rajguru New Movie: कपाळावर चंद्रकोर, नजरेत अनुत्तरित प्रश्न! रिंकूच्या ‘जिजाई’च्या पोस्टरनं वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
4

Rinku Rajguru New Movie: कपाळावर चंद्रकोर, नजरेत अनुत्तरित प्रश्न! रिंकूच्या ‘जिजाई’च्या पोस्टरनं वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.